25/12/2025
माजी विद्यार्थ्यांसाठी शालेय जीवन पुन्हा जगण्याची सुवर्णसंधी! 🎓
रामकृष्ण क्रीडा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती
आनंदाने साजरा करीत आहे
✨ माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचा महायोग ✨
शालेय जीवन म्हणजे आठवणींचा अमूल्य ठेवा…
ती सकाळची प्रार्थना,
तो वर्ग, ती बाकं,
वर्गशिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन,
सरांची ती छडी आणि मनात पेरलेले ज्ञानाचे बीज…
याच आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी
या स्नेहसंमेलनामध्ये —
माजी विद्यार्थ्यांचे मनोगत,
सांस्कृतिक कार्यक्रम,
पुन्हा त्या प्रार्थनेला उभे राहण्याची संधी,
पुन्हा त्या वर्गात बसण्याची संधी,
आणि पुन्हा भेट त्या गुरुजनांची,
ज्यांनी आपल्याला घडवले, शिकवले आणि जीवनाची दिशा दिली.
आज आपण जे काही घडलो, जे काही साध्य केले,
ते केवळ आपल्या शिक्षकांच्या संस्कारांमुळे.
त्याच गुरुजनांचा पुन्हा एकदा सन्मान आणि सहवास
या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अनुभवण्याचा हा दुर्मिळ क्षण आहे.
📅 दिनांक : 11 जानेवारी
सन 2010 पूर्वी
रामकृष्ण क्रीडा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती
येथे शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी
आवर्जून उपस्थित राहून
पुन्हा एकदा ते शालेय जीवन जगावे,
आणि जुन्या आठवणींना नवे रंग द्यावेत,
असे मनापासून आवाहन.
🙏 आपली उपस्थितीच या स्नेहसंमेलनाचे खरे यश ठरेल. 🙏
आयोजक :
रामकृष्ण क्रीडा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती