28/12/2025
#➡️*9th State Level Abacus Exam 2025* कॉम्पिटिशनमध्ये #ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश
#स्टेट लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूल (BBIS) च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध मानाचे पारितोषिके पटकावली.
या स्पर्धेत
➡️हुरदळे हिरण्या या विद्यार्थिनीला Student of the Year पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
➡️पूर्वी बोडके हिने Grand Topper Award मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला.
➡️खोजे दिव्या हिने Third Topper Award प्राप्त केला.
तसेच
➡️ ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूलला Best Abacus School of the Year हा मानाचा पुरस्कार मिळाला.
➡️ आपल्या शाळेतील अबॅकस टीचर ज्योती चालवड मॅडम यांना Best Abacus Teacher and Trainer of the Year या पुरस्काराने गौरविण्यात आले.
➡️या स्पर्धेत 51 विद्यार्थी सहभागी झालेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा शाळेसाठी अभिमानाचा क्षण आहे.
या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच प्रकारे यशाची भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा दिल्या आहेत...