Mahila Mahavidyalay, Tasgaon

Mahila Mahavidyalay, Tasgaon COURSES
- BCA, BA, BCOM

29/05/2024

BCA Admission Open-2024/25

29/05/2024
तासगावच्या महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मोफत महिला आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न दि. 14/09/23 तासगावच्या कला वाण...
23/09/2023

तासगावच्या महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मोफत महिला आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

दि. 14/09/23

तासगावच्या कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयातील बीसीए संगणक विभाग व वर्ल्ड चॅम्पियन एम्पायर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य विषयक साक्षरता हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून मुलींसाठी मोफत महिला आरोग्य शिबिर - एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये बीसीए विभागातील एकूण 200 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये मुलींना महिलांसंबंधी विविध आजाराविषयी माहिती देण्यात आली. तसेच ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे सांगण्यात आले. मुलींच्या आरोग्यविषयक तक्रारीचे निवारण करण्यात आले. महिला आरोग्य संदर्भात घ्यावयाच्या काळजीसाठी मुलींना ट्रेनिंग देण्यात आले. यावेळी नारी शक्ती फाउंडेशन व वर्ल्ड चॅम्पियन एम्पायर कंपनीचे चेअरमन मा. श्री. अमर नाळे व कंपनी संचालक श्री. संजय चव्हाण आणि श्री. शुभम पवार यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. या शिबिराचे नियोजन बीसीए विभाग प्रमुख. प्रा. एस. पी. म्हमाणे यांनी केले.
यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य एच. एल. कांबळे यांचे सहकार्य लाभले. विभागातील सर्व प्राध्यापक कार्यशाळेसाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. मिस. आर. ए. तांबोळी यांनी मानले. असे कार्यक्रम वेळोवेळी घेण्यात यावेत अशी मोलाची प्रतिक्रिया विद्यार्थिनिं कडून देण्यात आली.

Address

Vidyaniketan Campus
Campus
416312

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahila Mahavidyalay, Tasgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share