Pratap Vidya Mandir

Pratap Vidya Mandir Pratap Vidya Mandir , Chopda , ( Dist. Jalgaon ) celebrating it's centenary.

Pratap Vidya Mandir - primary, secondary & english medium school & madhyamik vidyalaya Nagalwadi celebrates the 77th Rep...
26/01/2026

Pratap Vidya Mandir - primary, secondary & english medium school & madhyamik vidyalaya Nagalwadi celebrates the 77th Republic Day of India

26 January 2026

11/09/2025

११ सप्टेंबर २०२५
संध्याताई मयूर, माजी सचिव, चोपडा एज्युकेशन सोसायटी यांच्या १६ व्या स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌿🌷

PVM junior college rocks againHSC Exam results Science 100%Commerce 100%Arts 97.14%Vocational 87.33%Congratulations to a...
05/05/2025

PVM junior college rocks again
HSC Exam results
Science 100%
Commerce 100%
Arts 97.14%
Vocational 87.33%
Congratulations to all students and teachers ...... !!

05/05/2025

HSC Exam Feb 2025 Results
PVM Junior College Rocks ......
Congratulations to all students and teachers ... !!!

*!!!! हार्दिक अभिनंदन !!!!* प्रताप विद्या मंदिरात कार्यरत उपशिक्षक श्री विजय गोसावी आणि आमचा विद्यार्थी स्पर्श दिगंबर पा...
06/09/2024

*!!!! हार्दिक अभिनंदन !!!!*

प्रताप विद्या मंदिरात कार्यरत उपशिक्षक श्री विजय गोसावी आणि आमचा विद्यार्थी स्पर्श दिगंबर पाटील (इयत्ता ८ वी ई) यांचे हार्दिक अभिनंदन !!

DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
REGISTEREd
MINISTRY OF CORPORATE AFFAIRS
(GOVT. OF INDIA) ग्राहक संरक्षणावर आधारलेली *जागो ग्राहक जागो* जळगाव धुळे नंदुरबार, संभाजीनगर या जिल्ह्यातील विद्यार्थी गटासाठी आयोजित *निबंध स्पर्धेत स्पर्श डिगंबर पाटील इ. ८ वी ई च्या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक* प्राप्त करून सन्मानचिन्ह व रोख रक्कम प्राप्त केली तर खुल्या गटात प्रताप विद्या मंदिरातील उपशिक्षक *श्री व्ही.ए. गोसावी यांनी प्रथम* प्राप्त केला. या दोघांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम *मा.श्री अंबादासजी जोशी लोकआयुक्त गोवा राज्य, निवृत्त न्यायमूर्ति मुंबई हायकोर्ट व इतर मान्यवर* यांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप मंगल कार्यालय चाळीसगाव येथे संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.....

श्री विजय गोसावी आणि स्पर्श पाटील या दोन्ही यशस्वीतांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐💐

अभिनंदन !!राज्य स्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल प्रताप विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी प्रिय‌ व उपक्र...
23/07/2024

अभिनंदन !!

राज्य स्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल प्रताप विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी प्रिय‌ व उपक्रमशील शिक्षक श्री विजय गोसावी सरांचे मन:पूर्वक खूप खूप अभिनंदन !!!!

🌹🌹🌹🌹🌹🌹

16/07/2024

प्रताप विद्या मंदिर - उच्च माध्यमिक विभाग, गावातील विभाग व दुपार विभाग या तिन्ही विभागांनी तीन वेगवेगळ्या विषयांवर शहरातील तीन ठिकाणी समाज प्रबोधनात्मक पथनाट्य सादरीकरण केले.

दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त शाळेतर्फे असे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येतात.

शाळेच्या उच्च माध्यमिक विभागाने " हे ची दान देगा देवा - तुझा विसर न व्हावा" या विषयावर राणी लक्ष्मीबाई चौकात,
गावातील विभागाने "पर्यावरण रक्षण " या विषयावर चिंच चौकात तर
दुपार विभागाने " मोबाईलचे अतिक्रमण आणि हरवलेले बालपण" या विषयावर शिवाजी चौकात आपापले कलाविष्कार दाखवले.

समाज मनाला भिडणारे विषय आणि सर्व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास पूर्ण सहभाग यामुळे लोकांचा उत्तम प्रतिसाद या पथनाट्यांना मिळाला.

आषाढी एकादशी निमित्त शाळेत अभंग गायन स्पर्धाही घेण्यात आली.

सर्व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून खूप खूप कौतुक...

🌹🌹🌹🌹🌹🌹

आषाढी एकादशी निमित्त शाळेतील कला शिक्षकांनी केलेले सुंदर फलक लेखन👌👌👌👌
16/07/2024

आषाढी एकादशी निमित्त शाळेतील कला शिक्षकांनी केलेले सुंदर फलक लेखन
👌👌👌👌

हसत खेळत मजेशीर गणित या उपक्रमांतर्गत, सध्या आपल्या नागलवाडी येथील शाळेत प्रा.रामकृष्णन व प्रा.रुबीताई रोज काही गमतीशीर ...
28/06/2024

हसत खेळत मजेशीर गणित या उपक्रमांतर्गत, सध्या आपल्या नागलवाडी येथील शाळेत प्रा.रामकृष्णन व प्रा.रुबीताई रोज काही गमतीशीर कोडी फळ्यावर लिहून ठेवतात आणि त्यावर विचार करायला विद्यार्थ्यांना प्रवृत्त करतात, प्रोत्साहन देतात.
थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकवले तर नावडता विषय, कठीण वाटणारा विषय सुद्धा विद्यार्थ्यांना सोपा वाटू लागतो. सोबतच्या क्षणचित्रांवरुन विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग लक्षात येतो.
अशा वेळी भाषेची अडचणही येत नाही. हे मुद्दाम सांगण्याचे कारण म्हणजे प्रा. रामकृष्णन सरांना मराठी येत नाही, तरी सुद्धा हिंदी, इंग्रजीतून विद्यार्थ्यांशी उत्तम संवाद साधत गणित विषयाची आवड निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात, विद्यार्थीही त्यांना उत्तम प्रतिसाद देतात.

हसत खेळत मजेशीर गणित गणित हा विषय विद्यार्थ्यांनाच काय आपल्या पैकी बहुतेकांना अवघड वाटतो, गणिताची नेहमी भिती वाटते. हि भ...
27/06/2024

हसत खेळत मजेशीर गणित

गणित हा विषय विद्यार्थ्यांनाच काय आपल्या पैकी बहुतेकांना अवघड वाटतो, गणिताची नेहमी भिती वाटते. हि भिती कमी व्हावी , गणित विषयाची आवड निर्माण करुन ती टिकून रहावी म्हणून आपल्या
माध्यमिक विद्यालय नागलवाडी या शाळेत पहिल्यांदाच छोटी छोटी मजेशीर कोडी घालून विद्यार्थ्यांना तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायला प्रोत्साहन दिले जात आहे.

दररोज वर्गातील फळ्यांवर काही कोडी लिहिली जातात सोबतच शाळेच्या कॉरीडॉरमधील फळ्यांवरसुद्धा ते लिहीलेले असते, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर ते राहील आणि कोड्यांचे उत्तर काय असू शकेल याचा विचार विद्यार्थी करत राहतील. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना बोलतं करुन, त्यांना वेगवेगळे क्लू देऊन , विविध प्रकारचे प्रश्न विचारुन, या कोड्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि पुन्हा नविन कोडी फळ्यावर लिहीली जातात.

पुस्तकातील साचेबद्ध उदाहरणे घेऊन, त्यांची उत्तरे फळ्यावर लिहून देण्याच्या प्रक्रियेत वर्गातील काही ठराविक विद्यार्थ्यांचाच बहुतेकदा फक्त हुशार विद्यार्थ्यांचाच सहभाग असल्याचे आढळते. मात्र अशा पद्धतीने कोडी सोडवण्याच्या प्रक्रियेत संपूर्ण वर्गच उत्साहाने सक्रिय सहभाग नोंदवत असल्याचे दिसून येते.

विद्यार्थ्यांची विचार शक्ती thinking ability, creativity वाढवण्याचा हा अतिशय उत्तम उपाय आहे.

या उपक्रमाची संकल्पना प्रा. रुबी आर.पी. यांची आहे. त्या़ंच्या सोबत प्रा्. रामकृष्णन यांचेही विशेष मार्गदर्शन लाभत आहे.
प्रा. रामकृष्णन हे पुणे येथील एस.पी.कॉलेज तसेच आबेदा इनामदार कॉलेज मध्ये गणित विषय शिकवतात. भास्कराचार्य प्रतिष्ठान, पुणे, येथे गणित ऑलिम्पीयाड साठी सुद्धा ते मार्गदर्शन करतात.

विद्यार्थ्यां एवढाच नागलवाडी शाळेच्या संपूर्ण स्टाफचाही या उपक्रमात उत्साहपूर्ण सहभाग आहे.

या पोस्ट सोबतच गेल्या दोन, तीन दिवसांतली फळ्यावर लिहीलेली कोडी शेअर केली आहेत, बघा तुम्ही पण जरा आपली विचार शक्ती stretch करुन 😅 ........,

तुम्ही तुमच्या उत्तरासाठी किंवा प्रश्नांसाठी किंवा अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधू शकता -

प्रा. रामकृष्णन - ७४९८४५८९७४
प्रा. रुबी - ९८२३२३९१८८

✖️ ➕ ➖ ➗ 🟰 ➰ 🔢 🔣 🔣 ✖️➕ ➖

Address

Shirpur Road
Chopda
425107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratap Vidya Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share