24/05/2023
ग्लोबल (एम. बी. ए.) च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर येथील व्यवस्थापनशास्त्र क्षेत्रातील अग्रगण्य अश्या ज्ञानवर्धीनी शिक्षण संस्था, संगमनेर संचलित ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, वेल्हाळे, संगमनेर येथे संचालक म्हणून कार्यरत असणारे डॉ. पराग सराफ यांची राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक), बंगलोर यांकडून मूल्यांकनकर्ता म्हणून नॅक कमिटीवर निवड करण्यात आली.
राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक), बंगलोर ही उच्च शिक्षण तसेच इतर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देणारी संस्था आहे. मूल्यांकन आणि मान्यता याद्वारे कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा 'दर्जा' आणि 'शैक्षणिक गुणवत्ता' ओळखली जाते व हे देण्याचे काम हि संस्था करत असते. दरवर्षी नॅक शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक प्रक्रियेची कामगिरी, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन कार्य आणि विद्याशाखा, सदस्यांचे प्रकाशन, मूलभूत सुविधा आणि संसाधनांची स्थिती, संस्था, प्रशासन, आर्थिक स्थिती आणि विद्यार्थी सेवा इत्यादीची तपासणी व त्यांना दर्जा देण्याची जबाबदारी घेत असते आणि याअंतर्गतच डॉ. पराग सराफ यांची राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक), बंगलोर यांकडून मूल्यांकनकर्ता म्हणून निवड करण्यात आली आहे.
यंदा संपूर्ण भारतातून जवळपास ३० लोकांना ही संधी मिळाली आहे त्यात डॉ. पराग सराफ यांचे नाव अग्रक्रमाने आहे त्यांना नॅक या संस्थेने नॉर्थ-इस्ट इंडिया रीजनवर असणाऱ्या महाविद्यालयांची तपासणी व त्यांना दर्जा देण्याची जबाबदारी सोपविलेली आहे.
डॉ. पराग सराफ अतिशय अभ्यासू, कष्टाळू व हुशार आहेत तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी छान आहे व याचाच परिपाक म्हणून त्यांची हि निवड झाली आहे असे मत यावेळी ज्ञानवर्धीनी शिक्षण संस्थेचे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. के. डी मुळे सर यांनी प्रदर्शित केले. नॅक कमिटीवर जाण्यासाठी कायम माझ्या मागे लागून त्याचा पाठपुरावा करणारे व वेळोवेळी मार्गदर्शन करणारे श्री. के. डी. मुळे सर (मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्ञानवर्धीनी शिक्षण संस्था, संगमनेर) यांनी दिलेल्या प्रोत्साहनानेच हे शक्य झाले असल्याचे डॉ. पराग सराफ यांनी यावेळी नमुद केले.
डॉ. पराग सरांच्या या यशाबद्दल ज्ञानवर्धीनी शिक्षण संस्था, संगमनेर चे अध्यक्ष श्री. अभिजित येवले, सचिव श्री. तुषार येवले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. के. डी. मुळे सर यांनी डॉ. पराग यांच्या कार्यकर्तृत्वाचा आम्हाला खूप अभिमान आहे व त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना अशीच आणखीन यश शिखरे पादक्रांत करावीत या शब्दांत शुभेछया देऊन कौतुक केले.