Swami Vivekanand Junior College, MIDC, Latur

Swami Vivekanand Junior College, MIDC, Latur Our moto is to achieve academic excellence in professional education as per leading National and Int

06/12/2025

06 डिसेंबर
#भारतरत्न #डॉ. #बाबासाहेब #आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस
#महापरिनिर्वाण_दिनानिमित्त #विनम्र_अभिवादन 🙏🙏🙏

Jspm Group Of Institute's Latur

05/12/2025

मुलींनो भावनिक, आत्मजाणीव व सकारात्मक विचार जोपासा !!

_मानसोपचार तज्ञ ज्योती पाटील

दि. 04/12/2025 - श्री स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज एमआयडीसी, लातूर महाविद्यालयीन मुलींसाठी *'जाणिवांचा प्रवास सक्षम वर्तनाची दिशा'* यावरती परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मारुती सुर्यवंशी, प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य गोविंद शिंदे व मुख्याध्यापक सुर्यकांत चव्हाण, प्रमुख मार्गदर्शक ज्योती पाटील उपस्थित होते.

प्राचार्य मारुती सुर्यवंशी म्हणाले की, विद्यार्थीनी भावनिक बदलाबरोबरच सुरक्षितता याचे आत्मभान ठेवून पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून महाविद्यालयात अभ्यासाबरोबरच ध्येय ठेवून येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा देऊन यशस्वी व्हावे असेही ते म्हणाले.

प्राचार्य गोविंद शिंदे म्हणाले की, विद्यार्थीनींनी स्वावलंबी बनायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यार्थीनींमध्ये आपल्या मुलींना पित्यासमान काळजी घेतात हे अधोरेखित करत मुलींनी आत्मनिर्भर झाले पाहिजे असेही ते म्हणाले.

याप्रसंगी मु.अ. सुर्यकांत चव्हाण म्हणाले की, मुलींनी स्वंयशिस्त बरोबरच आई वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून जगावे असे म्हणाले.

प्रमुख मार्गदर्शक मानसोपचार तज्ञ ज्योती पाटील म्हणाल्या की, विद्यार्थीनींनी जबाबदारीचे वर्तन
ठेवून भविष्यातील निर्णय घेतल्यास आपले व्यक्तिमत्त्व चांगले घडतील. त्यांनी किशोरवयातील बदलाची व भावनिक बुद्धीमत्ता तसेच सक्षम वर्तन व आत्मसन्मान आणि आत्मविश्वास व सुरक्षितता आणि वैयक्तिक मर्यादा यावर प्रभावी विचार मांडले.

याप्रसंगी उपप्राचार्य संजय अंकुश, उपप्राचार्य मनोज गायकवाड, प्रा. हणमंत बद्दे, प्रा. निवृत्ती गौंडगावे, प्रा. अंजली आकुसकर, प्रा. पुजा जोशी आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रा. सुचिता घाडगे यांनी मांडले.
Jspm Group Of Institute's Latur Jspm Latur Govind Shinde Maruti Suryawanshi

18/11/2025

📚 ओपन डे आयोजित 📚

JSPM लातूर संचालित श्री स्वामी विवेकानंद जूनिअर कॉलेज, लातूर येथे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या ११वी व १२वीच्या विद्यार्थी–पालक–शिक्षक यांच्यातील संवादासाठी Open Day चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा, मार्गदर्शन आणि अभ्यासातील सुधारणा यावर भर देण्यात आला.
पालक व शिक्षकांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
---

16/11/2025

*श्री स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, लातूर येथे “Medical Safety Week 2025” आणि “Career in Pharmacy” विषयांवरील माहितीपूर्ण सेमिनार उत्साहात संपन्न..*

लातूर : JSPM, लातूर अंतर्गत चालणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, लातूर येथे Medical Safety Week 2025 निमित्ताने “Career in Pharmacy” या विषयावर अत्यंत उपयुक्त व माहितीपूर्ण सेमिनाराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक ८ नोव्हेंबर २०२५, शनिवार रोजी कॉलेजच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न...

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मारुती सूर्यवंशी, प्रमुख पाहुणे प्राचार्य गोविंद शिंदे, व मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रद्युम्न इगे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
प्राचार्य मारुती सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात विद्यार्थ्यांना औषधांच्या सुरक्षित वापराचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, *“औषध हे जीवन वाचवणारे असते, परंतु चुकीच्या वापरामुळे ते धोकादायक ठरू शकते.* म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने ‘Medication Safety’ बद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे.”

प्राचार्य गोविंद शिंदे यांनी फार्मसी क्षेत्रातील करिअर संधींवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, *“फार्मसी हे फक्त औषधे तयार करण्याचे क्षेत्र नाही, तर संशोधन, औषध नियंत्रण, क्लिनिकल रिसर्च आणि हॉस्पिटल फार्मसी अशा अनेक शाखांमध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. योग्य शिक्षण आणि जबाबदारीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पुढे जावे.”*

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते *डॉ. प्रद्युम्न इगे यांचे प्रेरणादायी व्याख्यान. त्यांनी “Medication Safety” आणि “Pharmacy क्षेत्रातील संधी” या विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.* त्यांनी औषध वापरात होणाऱ्या सामान्य चुका, त्या टाळण्यासाठीचे उपाय, तसेच फार्मासिस्टची जबाबदारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणात त्यांनी वास्तविक उदाहरणांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज गायकवाड यांनी कुशलतेने केले. त्यांनी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी परस्परसंवादी प्रश्नोत्तर सत्र घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सर्व पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास विज्ञान शाखेतील सर्व शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून आपले शंकानिरसन केले. कार्यक्रमाचा समारोप “Medication Safety Pledge” घेऊन झाला. सर्व उपस्थितांनी एकमुखाने “ Safe Medicines, Safe Lives!” ही प्रतिज्ञा उच्चारली व औषध वापरामध्ये जबाबदार राहण्याचा संकल्प केला.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरला असून त्यांनी औषधांच्या योग्य वापराविषयी जागरूकता मिळवली. फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या विविध वाटा व संधी याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल कॉलेज प्रशासन व विज्ञान विभागाचे सर्व शिक्षक यांचे उपस्थितांनी कौतुक केले.

हा सेमिनार औषध सुरक्षा जनजागृती आणि फार्मसी क्षेत्रात करिअर करण्यास प्रेरणा देणारा ठरला.
---















इ.12 नंतर   कंपनीमध्ये   च्या संधीवर कार्यशाळा संपन्न.लातूर, दि.05.11.2025पदवी व पदव्युत्तर शिक्षणानंतर करिअर ही संकल्पन...
06/11/2025

इ.12 नंतर कंपनीमध्ये च्या संधीवर कार्यशाळा संपन्न.

लातूर, दि.05.11.2025
पदवी व पदव्युत्तर शिक्षणानंतर करिअर ही संकल्पना आता कालबाह्य ठरत असून इ.12वी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच IT कंपन्यामध्ये जॉब करत उच्च शिक्षण घेता येते आणि अशी संधी कंपनीने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. असे प्रतिपादन चे डेप्युटी मॅनेजर महाराष्ट्र श्रीकांत सरडे यांनी श्री स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज, एमआयडीसी, लातूर येथे आयोजित कार्यशाळेत बोलताना केले.
JSPM Latur द्वारा संचलित
श्री स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज, लातूर येथे प्राचार्य मारुती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात नियमितपणे विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स सेमिनार आयोजित केले जातात. यानिमित्त कॉलेजमध्ये दि. 4 November 2025 रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत "इ.12वी नंतर IT कंपनीमध्ये जॉब करत उच्चशिक्षण घेण्याची व स्वावलंबी बनण्याची संधी" या विषयावर HCL Tech च्या श्रीकांत सरडे सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

श्रीकांत सरडे पुढे म्हणाले की, HCL Tech कंपनी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची IT कंपनी असून पूर्णपणे भारतीय कंपनी आहे. सध्या 60 देशांमध्ये कार्यरत असणारी Multi National Company असून विद्यार्थ्यांना वयाच्या 18व्या वर्षापासून Information Technology क्षेत्रामध्ये शिक्षण घेत कमावण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. इच्छुक नोंदणीकृत विद्यार्थ्यांची स्क्रीनिंग टेस्ट मधून निवड करून त्यांना जॉब करत भारतातील नामांकित IIT Guwahati, NIIT, BITS Pilani व इतर अशा नामांकित शैक्षणिक संस्थांमधून उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देते. त्यामुळे प्रचलित शैक्षणिक पद्धतीनुसार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणानंतर करिअर करण्यासाठी लागणारा अधिकचा वेळ लक्षात घेऊन पदवी / पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होण्याची वाट न पाहता IT क्षेत्रामध्ये करिअर करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले.

उपप्राचार्य मनोज गायकवाड यांनी प्रास्ताविक केले व शेवटी आभार मानले. कार्यशाळेस इयत्ता बारावीचे विज्ञान व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

08/09/2025

Unit Test-1 @
JSPM Latur's
Shri Swami Vivekanand Junior College, Latur
#लातूर

 #लातूर (दि. 5 सप्टेंबर 2025):श्री स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, एमआयडीसी, लातूर येथे  #शिक्षक_दिन मोठ्या उत्साहात सा...
06/09/2025

#लातूर (दि. 5 सप्टेंबर 2025):
श्री स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, एमआयडीसी, लातूर येथे #शिक्षक_दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य गोविंद शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,

“शिक्षक दिन साजरा करताना शिक्षकांचा सन्मान व्हायलाच हवा, मात्र शिक्षण क्षेत्रातील आव्हानांचाही विचार करणे गरजेचे आहे. आजच्या घडीला अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या भौतिक सुविधा, तंत्रज्ञानाचा अभाव, शासनाची धोरणे व शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे ही गंभीर समस्या आहेत. बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होत आहे. स्पर्धात्मक शिक्षण, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, मानसिक ताण व वाढता कार्यभार यामुळे शिक्षकाला ‘मार्गदर्शक’ न मानता ‘सर्व्हिस प्रोव्हायडर’ म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसून येते.”

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य मारूती सूर्यवंशी म्हणाले,

“शिक्षक तोच जो नवनवीन आव्हाने स्वीकारून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण ज्ञानदान करतो. सैनिक, डॉक्टर, अभियंता, खेळाडू, पत्रकार, कलाकार, वैमानिक, अभिनेता असे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व घडवण्याचे काम शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या स्वकौशल्याला दिशा देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल घडवणे हेच शिक्षकांचे ध्येय आहे. शिक्षणातील आव्हानांवर मात करून विद्यार्थ्यांच्या यशातच शिक्षकाचे खरे समाधान आहे.”

प्रस्ताविकात उपप्राचार्य विठ्ठल चेवले यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना चांगल्या पदावर पोहोचवणे हेच शिक्षकाचे अंतिम ध्येय आहे.
उपप्राचार्य सुनिल मुचवाड यांनी विद्यार्थ्यांच्या मनाचा चिकित्सक अभ्यास शिक्षकांनी करावा असे प्रतिपादन केले.
तसेच उपप्राचार्य संजय अंकुश, उपप्राचार्य मनोज गायकवाड व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुचिता घाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अंजली अकुसकर यांनी मानले.

यावेळी प्रा. वैजनाथ जाधव, प्रा. निवृत्ती गौडगावे, प्रा. सुरेश सुडे, प्रा. हणमंत बद्दे, प्रा. विरेष स्वामी, प्रा. प्रशांत बेंडगे, प्रा. परमेश्वर भंगे, प्रा. पुजा जोशी, प्रा. सुरज सोनटक्के, प्रा. धनंजय चव्हाण, प्रा. यशवंत क्षिरसागर, प्रा. युवराज वाघमारे, प्रा. अंभग मनाळे, प्रा. लता भोसले, प्रा. अर्चना मोमले, प्रा. वनिता बादाडे, प्रा. रामनाथ बडे यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Address

JSPM Campus, , P-74, MIDC, Kalamb Road
Latur
413531

Opening Hours

Monday 10am - 4pm
Tuesday 10am - 4pm
Wednesday 10am - 4pm
Thursday 10am - 4pm
Friday 10am - 4pm
Saturday 10am - 4pm

Telephone

+919850645163

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand Junior College, MIDC, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Swami Vivekanand Junior College, MIDC, Latur:

Share