04/07/2026
Proud Moment! Students of Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded, Shine at the State Drama Competition!
We are thrilled to announce that the talented student artists of SRTM University, Nanded, have bagged 5 prestigious awards at the 64th Maharashtra State Drama Festival!
🎬 Play: 'To, Ti Aani Manohar' (A two-act social drama)
🏆 Awards Won:
• Best Drama Production (3rd Prize)
• Best Direction
• Best Music
• Best Acting
• Best Lighting Design
The university's Vice Chancellor, Dr. Manohar Chaskar, and Pro-Vice Chancellor, Dr. Ashok Mahajan, personally congratulated the students for this remarkable achievement. The student team also received a ₹40,000 cheque from the government.
✍️ Playwright: Atul Salwe
🎭 Cast & Crew: Vijay Gajbhare, Manikchand Thorat, Atul Dudhate, Rahul More, Sapna Waghmare, Mansi Belapurkar, Chandrakant Torane, and Karan Gundewar.
The production was mentored under the guidance of Dr. Prithviraj Taur, Director of the Lalit & Prayogjivi Kala Sankul. Dignitaries including Dr. Dnyaneshwar Pawar, Narayan Chaudhari, Dr. Surwase, and veteran theatre personality Dr. Ashwini Bhale kar-Yevle were also present to encourage the young artists.
Heartiest congratulations to all the students, teachers, and staff for this incredible achievement! Your hard work and passion have made the university proud! 👏🎉
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राज्य नाट्य स्पर्धेत पाच पारितोषिके पटकावली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ललित व प्रयोगजीवी कला संकुल, नाट्य व चित्रपट विभागाने निर्मित केलेल्या 'तो, ती आणि मनोहर' या दोन अंकी सामाजिक नाटकाने उल्लेखनीय यश संपादन करत एकूण पाच पारितोषिकांवर आपले नाव कोरले.
विजेत्या विद्यार्थी कलावंतांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व प्र-कुलगुरू डॉ अशोक महाजन यांनी कौतुक केले.
ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ पृथ्वीराज तौर यांच्यासह सर्व विद्यार्थी नाट्यकलावंतांनी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची भेट घेऊन त्यांना उत्कृष्ट नाट्य निर्मितीचे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शासनाकडून प्रदान करण्यात आलेला चाळीस हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य नारायण चौधरी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. बी.एस. सुरवसे, ललित व प्रयोगजिवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अश्विनी भालेकर-येवले यांची सन्माननीय उपस्थिती होती.
नांदेड केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत या नाटकाला उत्कृष्ट नाट्यनिर्मिती (तृतीय) पारितोषिक मिळाले.
नाटकाचे दिग्दर्शक अतुल साळवे यांना उत्कृष्ट दिग्दर्शक (तृतीय) तसेच उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (द्वितीय) ही दोन वैयक्तिक पारितोषिके प्राप्त झाली.
नाटकातील कलाकार विजय गजभारे यांना उत्कृष्ट अभिनयाचे प्रमाणपत्र,
तर माणिकचंद थोरात आणि अनिल दुधाटे यांना उत्कृष्ट प्रकाशयोजना (प्रथम)
या पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले.
प्रा राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल साळवे यांनी या नाटकाचे लेखन- दिग्दर्शन केले आहे. विजय गजभारे, माणिकचंद थोरात, अनिल दुधाटे, राहुल मोरे, सपना वाघमारे, मानसी बेलापूरकर, चंद्रकांत तोरणे आणि करण गुंडेवार यांनी या नाटकात भूमिका व तंत्रसाह्य केले आहे.
** #शैक्षणिक_यश #सांस्कृतिक_वारसा #रंगभूमी #नाट्य_स्पर्धा #नांदेड_विद्यापीठ