26/01/2025
आज लोकप्रभा महाविद्यालय नरखेड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दत्तात्रय वाटमोडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यानंतर झालेल्या कार्यक्रम मध्ये
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दत्तात्रय वाटमोडे हे होते
मुख्य अतिथी म्हणून रामकिशन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री लोकपाल जी चापले, तसेच सत्कारमूर्ती श्री विनायक जी रेवतकर ( मां नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेले) , तसेच जयंत जी चापले, विकास जी कहाते हे मंचावर उपस्थित होते .
विद्यार्थिनीनी स्वागत गीताने व दीपप्रज्वलन ने सुरूवात झाली, महाविद्यालयातर्फे श्री विनायकजी रेवतकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,
डॉ दत्तात्रय वाटमोडे सर यांनी विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच श्री विनायक जी रेवतकर यांनी विद्यार्थांना भगतसिंग यांच्या सारखे देशप्रेम शिकले पाहिजे असे प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांपैकी तेजस्विनी सूर्यवंशी हिने मनोगत व्यक्त केले
सूत्रसंचालन. कू आरती उईके, हिने केले तर आभार प्रा. प्रज्वल खंडारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीेततेसाठी प्रा नेहा धर्मे, प्रा. पुनम टापरे, प्रा. भूमी लुंगे तसेच राम मेतकर, सुजल नरेटे, दिगांबर लीखार यांनी प्रयत्न केले