कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत

  • Home
  • कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत

कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत Education to All

प्रामाणिक व निष्ठावान कर्मचारी हे संस्थेचे भूषणक. का. वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथील सेवापूर्ती कार्यक्रमातमविप्र ...
16/04/2025

प्रामाणिक व निष्ठावान कर्मचारी हे संस्थेचे भूषण
क. का. वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथील सेवापूर्ती कार्यक्रमात
मविप्र सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे यांचे प्रतिपादन

प्रामाणिक, निष्टवान कर्मचारी हे संस्थेचे भूषण असतात. कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे यश हे तेथील विद्यार्थी शिक्षक त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर अवलंबून असते. महाविद्यालयाच्या यशात शिक्षक सेवकांसोबतच शिक्षकेतर सेवकांचा देखील तितकाच महत्त्वाचा वाटा असतो. संस्थेला चांगले सेवक भेटणे हे संस्थेच्या भविष्यासाठी, वाटचालीसाठी महत्त्वाचे असते. मविप्र संस्थेतील प्रत्येक सेवक आपल्या कामाचा ठसा निर्माण करत असतो. कार्यालयीन अधीक्षक आनंदा पवार यांनी प्रामाणिकपणे सेवा देत संस्थेचा नावलौकिक वाढविला. निष्ठेने काम केले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी समाजाची सेवा करावी संस्थेला मदत होईल असे कार्य करावे. प्रामाणिक व निष्ठावान कर्मचारी हे संस्थेचे भूषण असतात असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगांव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक श्री. आनंदराव पवार यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मविप्र संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार शिरीष कोतवाल, संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड, प्रवीणनाना जाधव, ॲड.लक्ष्मण लांडगे, प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र मोरे, उल्हास मोरे, प्राचार्य डॉ.आर.डी दरेकर,प्राचार्य डॉ. ए.के. शिंदे,प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ,प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे,प्राचार्य डॉ डी बी शिंदे प्राचार्य डॉ महेश वाघ ,रमेश पवार सेवापूर्ती कार्यालयीन अधीक्षक आनंदराव पवार, सौ. अनिता पवार, पिंपळगांव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य श्री. दिलीप माळोदे आदी उपस्थित होते.
संचालक डॉ सयाजीराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पिंपळगाव बसवंत या महाविद्यालयात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्याची भूमिका पवार यांनी ठेवली असे विचार मांडले.
आमदार शिरीष कोतवाल यांनी आनंदराव अजातशत्रू, मितभाषी असे पवार यांनी आपल्या कामातून दाखविली असे विचार मांडले.
सेवपूर्ती मनोगतात आनंदा पवार म्हणाले की, मविप्र संस्थेत नोकरीच्या निमित्ताने असंख्य माणसे जोडली. प्रत्येकाकडून नाविन्यपूर्ण शिकायला मिळाले असे विचार मांडत आपल्या बत्तीस वर्षीय कालावधीतील आठवणींना उजळा दिला.
अध्यक्षीय मनोगतात मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे म्हणाले की, संस्थेने ग्रामीण भागातील बहुजन समाजातील अनेक कुटुंबांना सेवेची संधी देऊन त्याच्या कुटुंबाची काळजी वाहिली. त्यांना स्थिरपणा दिला. त्यांच्या भावी पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी पोषक असे वातावरण तयार केले म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी संस्थेशी आपली नाळ कायम ठेवून संस्थेच्या विकासात सहकार्य करावे असे विचार मांडले.
प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना आनंदा पवार हे एक कार्यतत्पर, मितभाषी असणारे, प्रामाणिकपणे सेवा बजावणारे गुणी सेवक होते असे विचार मांडले. यावेळी अधिक्षक आनंदा पवार यांनी मविप्र समाज संस्थेला ५० हजार व पिंपळगाव महाविद्यालयला गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी ५० हजार ठेव असे एकूण एक लाख रुपयांची देणगी त्यांनी दिली. यावेळी डॉ.एन.यू.पाटील, प्रा.नामदेव गावित, उपप्राचार्य दिलीप माळोदे, प्रा आर के पाटील, वाल्मीक पवार, माजी प्राचार्य पी. व्ही. रसाळ, नात अनुष्का बोराडे, माजी प्राचार्य डॉ.आर.डी दरेकर, श्रीमती कांचन जाधव, गणेश निंबाळकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनंजय देशमुख यांनी केले तर सौ. ऐश्वर्या विजय पवार यांनी आभार यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षतेत्तर सेवक व पवार परिवाराचे मित्र व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिनेते सागर कारंडे यांनी मिमिक्रीतून प्रेक्षकांची मने जिंकली  क. का. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव ब येथे आयोजित  वार्षिक ग...
07/04/2025

अभिनेते सागर कारंडे यांनी मिमिक्रीतून प्रेक्षकांची मने जिंकली

क. का. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव ब येथे आयोजित वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

कला हा जीवनाचा भाग आहे. प्रत्येकात कला असते फक्त त्याला योग्य दिशा वा व्यासपीठ मिळाले तर आपण आपले व्यक्तिमत्त्व फुलवू शकतो. यावेळी सुप्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते सागर कारंडे यांनी जीवनातील प्रसंगांचे वर्णन आपल्या नाट्य अभिनयातून सादर केली. निळू फुले, मकरंद अनासपुरे,नाना पाटेकर यांच्या आवाजाची प्रत्यक्ष मिमिक्री करून प्रेक्षकांची मने जिंकली.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान महाविद्यालय, पिंपळगांव बसवंत येथे वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक शिवाजी गडाख, श्रीमती शोभाताई बोरस्ते, भागवतबाबा बोरस्ते, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र मोरे, सुनील पाटील, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, चेतन मोरे, अरुण मोरे, शामराव मोरे, राजेंद्र निरगुडे, विकास बनकर, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, स्नेहा संमेलन प्रमुख प्रा. नामदेव गावित आदी मान्यवर उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, शहरी भागासारखे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी मविप्र संस्थेचे गावोगावी शिक्षणाच्या सुविधा सुरू केल्या त्यामधील पिंपळगाव महाविद्यालय हे देखील ग्रामीण भागातील उच्च शिक्षणासाठी गणले जाणारे महाविद्यालयात आहे या महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवत आहेत. आज विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली ध्येय निश्चित करता येऊ शकते विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे असे विचार मांडले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे म्हणाले की, मविप्र संस्थेच्या उभारणीमध्ये कर्मवीरांचे योगदान हे वाखण्यजोगे आहे. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी कर्मवीरांनी ही संस्था उभी केली आज तिचा वटवृक्ष झाला आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात सद्गुण, परिश्रम आणि नैतिकतेला महत्त्व द्यावे. केवळ शैक्षणिक गुणवत्ता ही महत्वाची नाही, तर सामाजिक दायित्व, सहकार्य, आणि आत्मविकास देखील महत्त्वाचे आहेत. जीवनात यश मिळविण्यासाठी प्रेरणा, प्रयत्न आणि संयम आवश्यक आहे, आणि प्रत्येकाने आपल्या क्षमतेचा सर्वोत्तम उपयोग करावा. विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असतो. यशवंत विद्यार्थी हे महाविद्यालयाला व संस्थेला नावलौकिक मिळवून देत असतात. गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा व आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी भारतीय सेनादलात व पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर महाविद्यालयात वर्षभरात क्रीडा तसेच विविध स्पर्धात अभूतपूर्व यश मिळविलेले विद्यार्थी तसेच वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त आयोजित स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच वर्षभरात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवकांना ‘सर्वोत्कृष्ठ सेवक पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तसेच कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांची जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी केले. पाहुण्याच्या परिचय स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. नामदेव गावित यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र खांडगे व प्रा.धनंजय देशमुख यांनी केले तर आभार प्रा.हेमंत पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतिहास संशोधनासाठी मोडी लिपी शिकणे आवश्यकप्रा. रामनाथ रावळ यांचे प्रतिपादन क. का. वाघ पिंपळगाव (ब.) महाविद्यालयात “मोडी ...
03/04/2025

इतिहास संशोधनासाठी मोडी लिपी शिकणे आवश्यक
प्रा. रामनाथ रावळ यांचे प्रतिपादन
क. का. वाघ पिंपळगाव (ब.) महाविद्यालयात “मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग” कार्यशाळा संपन्न

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अनेक पैलू आजही मूळ दस्तऐवजांच्या स्वरूपात दप्तरखान्यात धुळ खात पडलेले आहेत. मोडी लिपी शिकून त्या कागदपत्रांचे खऱ्या अर्थाने संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढे येऊन मोडी लिपी शिकून छ. शिवाजी महाराजांच्या कार्याचा अभ्यास करून ते कार्य समाजापुढे आणावे. तसेच विद्यार्थ्यांनी मोडी लिपीकडे बघतांना इतिहास संशोधना बरोबरच आर्थिक दृष्टीने सक्षम बनण्यासाठीही मोडी लिपी शिकणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मोडी लिपी तज्ञ प्रा. रामनाथ रावळ यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या क. का. वाघ पिंपळगाव (ब.) महाविद्यालयात “मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग” कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, समन्वयक प्रा. उत्तम जाधव, सह समन्वयक प्रा. संदीप पगार, डॉ. संदीप माळी, प्रा. धनंजय देशमुख आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले की, आजही कोट्यावधी मोडी लिपीतील कागदपत्रे पुणे, तंजावर, मुंबई, धुळे, लंडन या ठिकाणी मोडी लिपी वाचकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे युवा पिढीने मोडी लिपीचा अभ्यास करून इतिहास संशोधनातून मराठ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अज्ञात असलेला इतिहास समाजापुढे आणावा हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना ठरेल, असे विचार मांडले.
महाविद्यालयात ‘मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग’ दि. १७ मार्च २०२५ पासून सुरु होते. या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गात महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग प्रा. उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग समन्वयक प्रा. उत्तम जाधव यांनी केले. प्रा. धनंजय देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रा. संदीप पगार यांनी मानले. यावेळी डॉ. संदीप माळी, प्रा. शिवाजी गांगुर्डे हे उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

सस्नेह निमंत्रण
03/04/2025

सस्नेह निमंत्रण

विद्यार्थिनींनो स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या निर्भय बना...उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती थविल यांचे प्रतिपाद...
31/03/2025

विद्यार्थिनींनो स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या निर्भय बना...
उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती थविल यांचे प्रतिपादन
क. का. वाघ पिंपळगाव ब. महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न

कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी पदवीपर्यंतचे शिक्षण गरजेचे असते. यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेत आपले ध्येय निश्चित करून त्याचा पाठलाग करायला शिका. कोणतेही काम करताना जिद्द, चिकाटी, आणि परिश्रम घेण्याची तयारी असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात आपला नावलौकिक मिळू शकतो. त्यासाठी नियमित वाचन, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिकांचा सराव, नवनवीन घडामोडींचे अद्यावत ज्ञान, सोशल मीडियाचा वापर हुशारीने करा, नियमित वाचन करा, संधीची कवाडे उघडी ठेवा, भाषेवर प्रभुत्व मिळवा त्यातून आपल्याला उत्तम संधी उपलब्ध होऊ शकते. जीवनातील आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड द्या. स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या निर्भय बना, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती थविल यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय निर्भय कन्या अभियान कार्यशाळेत स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कोंडाजी चिवडा, मार्केटिंग प्रमुख सोनल वावरे, कु.रसिका वावरे, वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. वैशाली कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्ञानोबा ढगे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. उत्तम जाधव, समन्वयक डॉ.छाया भोज, गुलाब थविल आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेचे दुसरे पुष्पगुंपताना वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. वैशाली कदम म्हणल्या की, शिक्षण हे केवळ नोकरी पुरतेच नकोत. मुलगी ही दोन पिढ्यांची संस्कार देणारी प्रतिनिधी असते. म्हणून आपल्या शिक्षणाचा उपयोग सुसंस्कृत पिढ्या घडवण्यासाठी आवश्यक करा. मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा. जिजाऊ ते सावित्रीचा वारसा जोपासा. मुलगा मुलगी मध्ये कुठलाही भेदभाव करू नका. त्यांना समान वागणूक द्या.
या कार्यशाळेचे तिसरे पुष्पगुंतांना श्रीमती सोनल वावरे यांनी विद्यार्थिनींनी स्वतःच्या पायावर कसे उभे राहावे यासंदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. जीवनाकडे सकारात्मकतेने बघा, कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, स्वतःला व्यस्त ठेवा, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. जीवनाचे उद्दिष्ट निश्चित करा आणि लिहून ठेवा. आपले फेल्युअर सेलिब्रेट करा, निराश होऊ नका. नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय निर्माण करून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात वाव आहे त्यासाठी अखंड परिश्रम घेण्याची तयारी ठेवा व स्वतःला सिद्ध करायला शिका असे विचार मांडले.
यावेळी कु. रसिका वावरे यांनीही विद्यार्थिनींना कायद्याचा अभ्यास किती महत्त्वाचा असतो या संदर्भात मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थिनींनी परिश्रम घेऊन आपले स्वप्न पूर्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. मविप्र संस्था व महाविद्यालय विद्यार्थी प्रिय उपक्रम राबवत असते. याचाच फायदा घेऊन आपणही आपल्या आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. उत्तम जाधव यांनी केले. निर्भय कन्या अभियान समन्वयक डॉ. छाया भोज यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रा. संगीता कुशारे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

व्यक्तीच्या आंतरिक शक्तीतून सर्वांगीण विकासाला चालना मिळते.डॉ.भाऊसाहेब गमे यांचे प्रतिपादन क. का. वाघ पिंपळगाव ब. महाविद...
31/03/2025

व्यक्तीच्या आंतरिक शक्तीतून सर्वांगीण विकासाला
चालना मिळते.
डॉ.भाऊसाहेब गमे यांचे प्रतिपादन
क. का. वाघ पिंपळगाव ब. महाविद्यालयात बहि: शाल शिक्षण मंडळांतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यान संपन्न

व्यक्तिमत्व विकास म्हणजे फक्त बाह्य रूपाचं आकर्षण नव्हे, तर त्याच्या मागे असलेल्या विचारशक्ती, आचारधर्म आणि आत्मविश्वासाचा विकास आहे. एक व्यक्तिमत्व जितके शुद्ध आणि सकारात्मक विचारांनी परिपूर्ण असते, तितकेच ते समाजात प्रभावी आणि प्रेरणादायी ठरत असते. तुमचे व्यक्तिमत्व तुमच्या विचारांवर आधारित असते. जर तुमचे विचार सकारात्मक आणि प्रगल्भ असतील, तर तुमचे व्यक्तिमत्व देखील उज्जवल असेल. यासाठी जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी कठोर परिश्रम घेऊन ते ते मिळविता आले पाहिजे. त्या व्यक्तीच्या आंतरिक शक्तीतून सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन डॉ. भाऊसाहेब गमे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथे बहि: शाल शिक्षण मंडळ अंतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेत 'व्यक्तिमत्व विकास' या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, बहि:शाल व्याख्यानमालेचे प्रमुख डॉ. पोपट कुदनर, डॉ. पवनजय सुदेवाड, डॉ. ज्ञानेश्वर सातभाई, डॉ. संदीप माळी, डॉ.दीपा कुचेकर, डॉ. छाया भोज, प्रा. कुवरसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले की, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास व्यक्तिमत्व विकास घडतो. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणात आपल्याला शिकायला व अनुभवायला मिळते असते. त्याचा उपयोग जीवनात केला तर आपले व्यक्तिमत्त्व अधिक खुलत जाते असे विचार त्यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. पोपट कुदनर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.कुवरसिंग चव्हाण यांनी केले तर आभार प्रा. भरत जाधव यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

वेगवान जीवनासाठी एआय रोबोटीक्स अपरीहार्य: प्राचार्य डॉ अरूण पाटीलजगातील सर्वात हुशार मेंदू म्हणजे नॅचरल इंटेलिजन्स (एनआय...
31/03/2025

वेगवान जीवनासाठी एआय रोबोटीक्स अपरीहार्य: प्राचार्य डॉ अरूण पाटील

जगातील सर्वात हुशार मेंदू म्हणजे नॅचरल इंटेलिजन्स (एनआय) भारतीय स्त्रीयांचा आहे असे सर्वे सांगतात. जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ भारतात सुरू होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने एआय शिकणे अपरीहार्य आहे. इच्छाशक्तिच्या जोरावर विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स व एआय मध्ये स्टार्टअप सुरू करून अर्थार्जन करावे. आर्थिक व्यवहारात टेक्नॉलॉजीचा वापर नैतिकतेने होणे गरजेचे आहे. वेगवान जीवनासाठी एआय रोबोटीक्स अपरीहार्य आहे असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्या मंदीर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाडचे प्राचार्य डॉ. अरूण पाटील यांनी केले. मविप्र क.क.वाघ महाविदयालयात इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) तर्फे आयोजित तीन दिवसीय रोबोट वर्कशॉप व कॉम्पिटीशन अंतर्गत 'एडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स टैक्नॉलॉजी स्कोप अॅंड ऑपर्च्युनिटीज' या विषयावर प्राधयापक व विद्यार्थांना मार्गदर्शनपर विशेष व्याख्यान देतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे होते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), रोबोटीक्स, फाईव्ह जी, वायरलेस कम्युनिकेशन, ब्लॉक चेन, क्लासिकल व क्वांटम कॉम्प्युटींग, फिनटेक, ड्रायव्हरलेस कार, रिनोव्हेबल एनर्जी टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी आदी विविध इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी बद्दल माहिती त्यांनी दिली. तसेच इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करीयर व रोजगार संधीं
बाबत देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिम्युलेटेड एआयचे प्रात्यक्षित देखील डॉ. अरूण पाटील यांनी दाखविले.

प्रास्ताविकात आयक्यूएसी कोऑर्डीनेटर व इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागप्रमुख प्रा. भगवान कडलग यांनी कार्यशाळा आयोजनाबाबत भुमिका स्पष्ट केली. प्रा. निलम उफाडे परीचय, प्रा. राणी जगताप सुत्रसंचलन केले. प्रा. किरणकुमार जोहरे यांनी आभार मानले.

कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. भगवान कडलग, प्रा. प्रियांका निकम, प्रा. धनंजय कडलग, प्रा. निलम उफाडे, प्रा. राणी जगताप, प्रा. गायत्री वीर, प्रा. किरणकुमार जोहरे, नामदेव बोराडे, अनिल गवळी, शिवप्रसाद गवळी,ऋतुजा जाधव, निकीता गायकवाड, कामिनी शिंदे, ज्योती आहेर, निशा आहेर, अविनाश कापसे, साक्षी ताकाटे, ऋतुजा जेऊघाले, सेजल पगार, निकीता कुशारे, पंकज गवळी आदींनी परिश्रम घेतले.

म्युच्युअल फंड व स्टॉक मार्केट गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय रुपेश वाघ यांचे प्रतिपादन क. का. वाघ पिंपळगाव ब. महाविद्यालयात...
31/03/2025

म्युच्युअल फंड व स्टॉक मार्केट गुंतवणुकीसाठी
उत्तम पर्याय
रुपेश वाघ यांचे प्रतिपादन
क. का. वाघ पिंपळगाव ब. महाविद्यालयात वाणिज्य शाखेअंतर्गत म्युचलफंड अवअरनेस या विषयावर व्याख्यान संपन्न

आधुनिक काळात गुंतवणुकीचे विविध प्रकार उपलब्ध आहे. मात्र अभ्यासपूर्ण गुंतवणूक ही भविष्याची उत्तम पर्याय म्हणून उत्पन्नाचा चांगला मार्ग मिळवून देऊ शकतो. पूर्वीपेक्षा आता गुंतवणूक करणे सोपे झालेले आहे. मोबाईल, इंटरनेट, वेबसाईट वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला गुंतवणूक करता येऊ शकते. आजच्या म्युच्युअल फंड व स्टॉक मार्केट गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय उपलब्ध आहे असे प्रतिपादन एच.एस.बी.सी. म्युचलफंड उपाध्यक्ष रुपेश वाघ यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य शाखेअंतर्गत म्युचलफंड अवअरनेस या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर म्युचलफंड फंडचे डिस्ट्रीब्यूटर लकी दीक्षित, युनिट मॅनेजर अभिषेक बकरे, प्राचार्य डॉ.ज्ञानोबा ढगे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. एस. के. मोरे, प्रा. विनय कदम, प्रा. एस.एस. बेजेकर आदी उपस्थित होते.
रुपेश वाघ यांनी गुंतवणुकी संदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. स्टॉक मार्केटमध्ये लहान व छोट्या कालावधीत चढउतार होऊ शकतात, परंतु दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यास त्यात स्थिर वाढ होऊ शकते. तसेच म्युच्युअल फंडांच्या निवडीसाठी त्यांनी विविध प्रकार जसे रिस्क प्रोफाइल, रिटर्न्स आणि गुंतवणूक करणार या क्षेत्रातील क्षमता. त्यांनी म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी विवेकबुद्धी वापरण्याचे महत्व सांगितले. डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे ? गुंतवणूक करायची असेल तर सेबीचा सारथी ॲप मोबाईल ॲप त्यावर चौकशी करून गुंतवणूक करावी. जेवढ्या लवकर आपण इव्हेन्समेंट सुरू करू तेवढ्या प्रमाणात आपल्याला परतावा ही जास्त प्रमाणात मिळतो. भविष्यकालीन गुंतवणूक आजच्या काळात करायचे असेल तर सर्वार्थाने म्युच्युअल फंड हा पर्याय उत्तम आहे. याचे भविष्यकालीन फायदे आणि गरज व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ.ज्ञानोबा ढगे म्हणाले की, म्युच्युअल फंडांचा महत्त्वाचा रोल आणि त्याचे फायदे यावर प्रकाश टाकला. गुंतवणूक आणि विविधता: म्युच्युअल फंड एक उत्तम पर्याय आहेत, कारण ते विविध प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात. यामुळे गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ विविधतेने भरला जातो, ज्यामुळे जोखीम कमी होते. नवीन गुंतवणूकदारांसाठी महत्त्व: म्युच्युअल फंड नव्या गुंतवणूकदारांसाठी योग्य असतात, कारण त्यात तज्ञांचे मार्गदर्शन मिळते. त्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट तसेच यशस्वी गुंतवणूक करण्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन होते. त्यांनी म्युच्युअल फंड गुंतवणूक दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
यावेळी म्युचलफंड फंडचे डिस्ट्रीब्यूटर लकी दीक्षित, युनिट मॅनेजर अभिषेक बकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. एस.के. मोरे यांनी केले. आभार प्रा. विनय कदम यांनी मानले. यावेळी वाणिज्य शाखेचे बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सामान्य माणूस केंद्रवर्ती ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्थिक नीती अवलंबली.डॉ. विजय खरे यांचे प्रतिपादन क. का. वाघ पि...
31/03/2025

सामान्य माणूस केंद्रवर्ती ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्थिक नीती अवलंबली.
डॉ. विजय खरे यांचे प्रतिपादन

क. का. वाघ पिंपळगाव महाविद्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्थिक धोरण’ या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न

राज्य हे जनतेचे आहे, त्यांना सुलभता निर्माण व्हावी या दृष्टीने महाराजांनी संरक्षनात्मक धोरण, संरक्षनात्मक आक्रमण धोरण, संपूर्ण आक्रमण धोरणाचा अवलंब केला. यासंदर्भात तत्कालीन कालखंड आणि नंतरच्या कालखंडात जी राजेशाही होऊन गेली, त्या राजेशाहिनी सामान्य माणूस केंद्रवर्ती ठेवून राज्य कारभार केला असल्याचे दिसून येत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेच्या हिताच्या दृष्टीने असलेले निर्णन, आर्थिक धोरण, त्याची अंबलबजावणी, जनतेचा विश्वास त्यांनी प्रत्यक्ष मिळवून सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीने आपले आर्थिक धोरण निर्माण केले. म्हणून सामान्य माणूस केंद्रवर्ती ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्थिक नीती अवलंबली असे चर्चासत्राचे बीजभाषक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मानव्यविद्या शाखा अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचे आर्थिक धोरण' या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे बीजभाषणात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर्विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, मविप्र संचालक प्रसाद सोनवणे, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, स्था.व्य.स. अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे, डॉ सुनील उगले, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहन कांबळे, डॉ.छाया भोज, प्रा. भगवान कडलग, प्रा. धनंजय देशमुख आदी उपस्थित होते.
डॉ. विजय खरे पुढे म्हणाले की, जनतेत एकता निर्माण व्हावी यासाठी शिवरायांचा ध्येयवाद, निस्वार्थीपणा, सहिष्णुता आणि माणुसकी ही मुल्ये केंद्रवर्ती ठेवून धोरण निर्माण केले. त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, हिंदू- मुस्लीम यांच्यात एकच न्याय पद्धती त्यांनी निर्माण केली होती असे विचार नमूद केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्थिक धोरण याविषयी बोलताना डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. यात त्यांनी शेतकरी, समाज, धर्म नीती, आर्थिक धोरण, उद्योगधंदे, बाजारपेठा, देशी व आंतरराष्ट्रीय व्यापार, जलनीती, मनुष्यबळ संघटन तत्त्व यासर्वांचा सर्वसमावेशक विचार करून जनहित समोर ठेवून निर्णय घेतले. इतिहास कधीच अंतिम नसतो. इतिहासाचे पुनर्लेखन सातात्याने झाले पाहिजे तरच इतिहास जिवंत राहतो असे विचार मांडले.
यावेळी संचालक डॉ. प्रसाद सोनावणे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ले हे आपल्यासाठी ऐतिहासिक ठेवा असून त्यांची जोपासना व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजचे कार्य आणि विचार हे आजच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनात अंगिकरारावे असे आवाहन त्यांनी केले.
चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध लेखक गिरीश जाखोरिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 'आर्थिक व्यवस्थापन व व्युव्हरचना' विषयावर बोलताना समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण या त्रिकोणाच्या तीन कडा ह्या महाराजांनी सातत्याने जोपासल्या, म्हणून महाराजांच्या प्रत्येक मोहिमा यशस्वी पार पडल्या असे विवेचन केले.
चर्चासत्राच्या तिसऱ्या सत्रात डॉ. सुभाष सावंत 'शेतीचे आर्थिक धोरण' याविषयी बोलताना म्हणाले की, शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले. शेतीशी निगडित असणाऱ्या समाजातील घटकाला योग्य ती कामे उपलब्ध करून दिली व शेती विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्नवादी राहिले. महाराजांचे आर्थिक, व्यवस्थापन, टॅक्स हॉलिडे, शिलकीचे अंदाजपत धोरण आदी विषयी माहिती त्यांनी दिली.
चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी मविप्र शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके म्हणाले की, भारतात शेतीची औद्योगिक क्रांतीचे जनक हे छत्रपती शिवाजी महाराज होते. कसेल त्याची जमीन, शेतीला भांडवल देणे, बियाणे उपलब्ध करून देणे हे काम महाराजांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे पैलू संशोधनाच्या अंगाने अभ्यासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी डॉ.नितीन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची नीतीमूल्ये, नैतिकता याविषयावर विस्तृत मांडणी केली.
समारोप सत्राचे अध्यक्षीय मनोगता व्यक्त करताना मविप्र उपसभापती देवराम मोगल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात जे आर्थिक व्यवस्थापन केले ते फक्त शेतकरी, व्यापारी, सैनिक यांना फायदा देणारेच नव्हते तर संपूर्ण राज्याच्या समृद्धीसाठी दिशा ठरविणारे होते. त्यांनी वित्तीय स्थिरता महसूल प्रणाली, व्यापार आणि उद्योगांना प्रोत्साहन यासंबंधी जे निर्णय घेतले त्यांचे महत्त्व आजही कमी झालेले नाही असे विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर प्रा. कैलास शिंदे, डॉ. नारायण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या चर्चासत्रात एकूण ५८ संशोधक प्राध्यापक व पदव्युत्तर वर्गाचे ८७ संशोधक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी प्राध्यापक डॉ. नारायण शिंदे, संशोधक विद्यार्थी तुषार महाले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातील छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्ञानोबा ढगे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहन कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.धनंजय देशमुख तर आभार प्रा.भगवान कडलग यांनी मानले.
या चर्चासत्रात प्रा. कवरशिंग चव्हाण, प्रा. सागर भंडारे, प्रा. समाधान वायकंडे, प्रा. संगीता कुशारे, प्रा. धनश्री देशमुख, प्रा.राजेंद्र जाधव आदींनी मेहनत घेतली. यावेळी चर्चासत्रात राज्यभरातून बहुसंख्य संशोधन प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Address

Bombay Agra Hay Way

422209

Alerts

Be the first to know and let us send you an email when कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your university to be the top-listed University?

Share