16/08/2026
*श्री बसवेश्वर प्रशालेत स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...*
श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट 2026 रोजी 80 वा स्वातंत्र्यदिन सोहळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री शंकरराव पाटील हे होते. यावेळी ध्वजारोहण सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री प्रमोद बिराजदार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. प्रतिमा पूजन निम्बर्गी गावचे पोलीस पाटील श्री राजकुमार बिराजदार यांच्या शुभहस्ते झाले.
सदर कार्यक्रमास निम्बर्गी गावचे सरपंच श्री श्रीदीप हसापुरे, संस्थेचे सदस्य श्री सोमशेखर बिराजदार, ब्रह्मदेव माने बँकेचे संचालक श्री गंगाधर बिराजदार, उपसरपंच श्री पिराप्पा हवालदार, तसेच गावातील बहुसंख्य ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालक आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशालेचे प्राचार्य श्री नितीन झाडबुके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर मनोगतातून उपस्थितांचे स्वागत व प्रशालेच्या विविध उपक्रमांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी श्री प्रमोद बिराजदार यांनी आपल्या मनोगताद्वारे प्रशालेतील विविध उपक्रमांचे व गुणवत्तेचे कौतुक केले. तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांची मनोगते झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व सहशिक्षक, अधिव्याख्याते, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री काकासाहेब जगताप यांनी केले.