SVIT Solapur

SVIT Solapur Swami Vivekanand Institute Of Technology Polytechnic, Solapur
16/2, Solapur-Barshi Road,Dist- Solapur

08/03/2026
मागील वर्षी प्रमाणे आपण ह्या वर्षी सुद्धा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 14 मार्च 2026 रोजी केले आहे. आपण...
07/03/2026

मागील वर्षी प्रमाणे आपण ह्या वर्षी सुद्धा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 14 मार्च 2026 रोजी केले आहे.

आपणा सर्वांना विनंती आहे की, आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घ्यावे.

रजिस्ट्रेशन साठी खाली दिलेल्या गूगल फॉर्म वर क्लिक करून सगळी माहिती भरणे

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfYkkUyCnTcfeEGoj1d7RlXAVgSKgPRa3aTOiAyc0Ck8JU88w/viewform?usp=publish-editor

प्रदर्शनाचे स्थळ - स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बार्शी रोड खेड, सोलापूर

दिनांक: 14 मार्च 2026 वेळ: सकाळी 09.00 वा. स्थळ: Swami Vivekanand Institute of Technology, Solapur आयोजक: भाजपा अभियंता सेल व पदवीधर प्रकोष्ठ सेल, सोलापूर अ.....

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना व्यासपीठ!🌟“Young Minds & Machines Expo – 2026”जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनसोलापूर जिल्ह्य...
07/03/2026

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना व्यासपीठ!🌟

“Young Minds & Machines Expo – 2026”
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन

सोलापूर जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी!

🔬 विज्ञान
🤖 तंत्रज्ञान
⚙️ नवकल्पना
🌱 शाश्वत विकास

या विषयांवर आधारित तुमचे प्रोजेक्ट, मॉडेल्स व आयडिया सादर करा आणि जिल्हास्तरीय मंचावर चमका.

🏆 बक्षिसे:
🥇 प्रथम : ₹2101 + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
🥈 द्वितीय : ₹1501 + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
🥉 तृतीय : ₹1001 + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

📅 दिनांक: 14 मार्च 2026
⏰ वेळ: सकाळी 09.00 वा.
📍 स्थळ: Swami Vivekanand Institute of Technology, Solapur

आयोजक:
भाजपा अभियंता सेल व पदवीधर प्रकोष्ठ सेल, सोलापूर

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
8208442964 / 7588779978 / 9404706700 / 9916559535

👉 शाळांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रा. अनिकेत चनशेट्टी यांनी केले आहे.

स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SVIT), सोलापूर येथे 'विद्यार्थी शिस्त आ...
27/02/2026

स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SVIT), सोलापूर येथे 'विद्यार्थी शिस्त आणि गैरवर्तनाचे परिणाम' या विषयावर विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर निर्भया पथकाच्या प्रमुख आणि महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. अंजना फाळके यांनी विद्यार्थ्यांना कायद्याची जाण करून देत जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्तीचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॅम्पस इन-चार्ज मा. कीर्ती भोसले मॅडम यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या मा. अंजना फाळके मॅडम, सावंत साहेब आणि गुंठे साहेब यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. यु. एस. सुतार यांची देखील कार्यक्रमाचे कौतुक केले.
मार्गदर्शन करताना फाळके मॅडम यांनी स्वतःचा ग्रामीण भागातून सुरू झालेला प्रवास मांडला. इंग्रजी भाषेची भीती असूनही केवळ जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या मोहात न पडता करिअरवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 'अग्निपंख' या पुस्तकाचे वाचन करून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिस्त ही केवळ शाळेपुरती मर्यादित न ठेवता ती स्वभावाचा भाग असावी. इंटरव्यूला जाताना वाटेत विनाकारण सुरू असलेला नळ किंवा फॅन बंद करणे ही खरी शिस्त आहे, असे त्यांनी सांगितले. शिवीगाळ (कलम ५०६), मारहाण (कलम ३२३) आणि पोक्सो (POCSO) कायद्यातील तरतुदींची माहिती देताना त्या म्हणाल्या की, "पोलीस तुमच्याकडे येत नाहीत, तर तुमच्या गैरवर्तनामुळे तुम्ही पोलिसांपर्यंत पोहोचता आणि करिअर धोक्यात येते.".
हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे सर, सेक्रेटरी आदरणीय अशोक भोसले साहेब, व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय एच. एम. बागल साहेब, खजिनदार आदरणीय बी. डी. रोंगे साहेब आणि इतर सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या सत्राला उपस्थित होते.

Address

Solapur-Barshi Road, Khed
Solapur
413255

Alerts

Be the first to know and let us send you an email when SVIT Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share