21/09/2026
कठोर परिश्रमाशिवाय यश नाही
बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवाच्या, करिअर कट्टा व स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी अभ्यास केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा वास्तव अन् संधी या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे तर प्रमुख मार्गदर्शक श्री शंकर जाधव , प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. जगदीश हेंडवे व कार्यक्रम समन्वयक डॉ.संदिप देसाई मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप देसाई यांनी करियर कट्टा व स्पर्धा परीक्षा या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता कोणकोणते उपक्रम राबविल्या जातात याची सविस्तर माहिती दिली व स्पर्धा परीक्षा वास्तव अन् संधी या मार्गदर्शन कार्यक्रमचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून सादर केला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री शंकर जाधव यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाशिवाय कोणती यश शक्य नाही, त्याकरीता अथक परिश्रम घेण्याची जिद्द आपल्यात असेल तरच आपण या स्पर्धेच्या युगात तग धरू, आपल्या परिस्थितीच भांडवल न करता, आहे त्या परिस्थितीत आपण आपले ध्येय निश्चित ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर यश नक्कीच मिळणार. त्यांनी अनेक उदाहरणे देऊन आपल्या विचारातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा वास्तव अन् संधी या मार्गदर्शन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना या कार्यक्रमाचा निश्चितच फायदा होईल, किंबहुना यातील काही भावी अधिकारी म्हणून समोर येतील,अशा आशावाद त्यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. गजानन लोहवे , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कुमारी दीक्षा जाधव हीने केले तर आभार कुमारी नंदिनी गुरुनुले हीने व्यक्त केले.