12/06/2026
*आडसूळच्या 30 विद्यार्थ्यांची पुणे मधील जेसीबी इंडिया लिमिटेड मध्ये कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड*
*चास* , येथील सौ. सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच कौशल्य विकसित होण्यासाठी विविध उपक्रम वेळोवेळी घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने पुण्यामधील बहुराष्ट्रीय कंपनी जेसीबी इंडिया लिमिटेड मध्ये विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.
नुकत्याच पार पडलेल्या परिसर मुलाखतीमध्ये आडसूळ तंत्रनिकेतनच्या यंत्र अभियांत्रिकी विभागातून १९ विद्यार्थी तर विद्युत अभियांत्रिकी विभागातून ११ विद्यार्थी असे एकूण ३० विद्यार्थी परिसर मुलाखतीद्वारे यशस्वीरित्या निवडण्यात आले. तृतीय वर्षात शिकत असलेल्या या विद्यार्थ्यांची जेसीबी इंडिया लि. चे रोजगार अधिकारी दयानंद नरवडे, अमित देशपांडे, निलेश दहिफळ व सनी जाणेरे यांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व, तंत्रशिक्षणातील सखोल ज्ञान व कौशल्य आणि प्रात्यक्षिकांबाबत असलेली विद्यार्थ्यांची हातोटी औद्योगिक सुरक्षा व संवाद कौशल्य पडताळत वरील ३० विद्यार्थ्यांची दोन लाख ४० रुपये प्रारंभीचे पॅकेज देऊन निवड केली. या निवड प्रक्रियेमुळे आडसूळ तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत झाला असून प्रवेशापूर्वी दिलेली वचनबद्धता आज पूर्ण झाल्याची भावना निवड प्रक्रियेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
तंत्रनिकेतनचे प्राचार्य गडाख आर. एस. यांनी आमचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी नसून तांत्रिक व औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रात लागणाऱ्या कौशल्याने परिपूर्ण असल्यामुळेच होणाऱ्या प्रत्येक परिसर मुलाखतीत बहूसंख्येने निवडीस पात्र ठरत आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी फक्त वेतनापुरतं काम न करता औद्योगिक क्षेत्रातले विविध बारकावे, घडामोडी, उत्पादन प्रक्रिया व उत्पादन प्रक्रियेतील समस्या याचा बारकाईने अभ्यास करावा कुशल अभियंता म्हणून नावलौकिक मिळवावा असे प्रतिपादन केले. आपण या तीन वर्षांमध्ये जे सखोल ज्ञान आणि कौशल्य प्राप्त केले आहे याचा फायदा आज तुम्हाला तुमच्या नवीन करिअरमध्ये म्हणजेच इंडस्ट्री मध्ये नक्की उपयोग होईल त्याचबरोबर कंपनीमध्ये काम करत असताना आपण आत्मसात केलेल्या ज्ञानाचा व कौशल्याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि खूप मोठे अधिकारी व्हावे असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
निवड प्रक्रियेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की
येथील दर्जेदार शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य सुधारण्यासाठी वापरलेले सॉफ्टवेअर, येथील शिक्षकांनी घेतलेला भरपूर प्रात्यक्षिकाचा सराव व त्यातील विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले सूक्ष्म कौशल्य त्याचे उपयोजन समाविष्ट असलेले मायक्रो प्रोजेक्ट, औद्योगिक प्रशिक्षण, क्षेत्रभेटी व वेळोवेळी तंत्रनिकेतनने आयोजित केलेले तज्ञ व्याख्यात्यांचे आयोजित केलेले व्याख्याने यांचा प्रचंड फायदा विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये झाल्याची भावना आपल्या मनोगतात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
जेसीबी इंडिया लिमिटेडच्या रोजगार अधिकाऱ्यांनी सांगितले की अहिल्यानगर जिल्ह्यातील आडसूळ तंत्रनिकेतन हे पहिलंच तंत्रनिकेतन आहे की ज्या ठिकाणी जेसीबी इंडिया लिमिटेडने अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची परिसर मुलाखत घेऊन यशस्वीरित्या निवड प्रक्रिया पार पाडली, या तंत्रनिकेतन मध्ये विद्यार्थ्यांचा उत्तमरीत्या सराव करून घेतला जात असून खऱ्या अर्थाने रोजगारभिमुख अभियंते घडवले जातात असे प्रतिपादन केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध आडसूळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माझे स्वप्न आहे कि आडसूळ संकुलणातील 100 % विद्यार्थी साठी नोकरीची संधी उपलब्ध झाली पाहिजे त्याच हेतूने सर्व विद्यार्थी हे डिप्लोमा इंजिनिअर झालेले असून तुम्हाला पुण्यासारख्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी मिळालेली आहे याचा मला खूप अभिमान वाटतो त्याच बरोबर मी सर्वाना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो.
संस्थेच्या सचिव सौ. लिनाताई आडसूळ यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून निवड प्रक्रियेसाठी शुभेच्छा दिल्या.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ अनिरुद्ध माणिक आडसूळ, सेक्रेटरी सौ. लीनाताई आडसूळ, खजिनदार श्री परमेश्वर आडसूळ, संचालक श्री कृष्णा आडसूळ, सदस्य डॉ कल्पना आडसूळ, सौ. रत्ना आडसूळ, सौ. पायल आडसूळ प्राचार्य व डायरेक्टर डॉ. प्रदीप एम. पाटील, डॉ. संभाजी पठारे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गडाख आर. एस., प्रशिक्षण व रोजगार आधिकरी प्रा. पवळे एस. सर्व विभाग प्रमुख प्रा.पाळंदे एस . सी., प्रा. होले पी .पी., प्रा.म्हस्के ए. ए.,प्रा. जाधव एम. बी., यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.