Dnyanbhakti College, Dudulgaon - Alandi

Directions

Dnyanbhakti College, Dudulgaon - Alandi असाध्य ते साध्य करिता सायास

 #विशेष व्याख्यान  बुधवार दि.23/10/2024 रोजी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ. लांडेवाडी,भोसरी येथे रौप्यमहोत्सवी वाटचा...
31/10/2024

#विशेष व्याख्यान
बुधवार दि.23/10/2024 रोजी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ. लांडेवाडी,भोसरी येथे रौप्यमहोत्सवी वाटचाली निमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भोसरी, प्राचार्य मा.डॉ.के.जी.कानडे यांनी उपस्थित प्रमुख वक्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
प्रास्ताविक भाषणात ज्ञानभक्ती कनिष्ठ महाविद्यालय, डूडुळगाव, येथील उपप्राचार्य श्री.एन.डी.भालेराव यांनी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ विलास लांडे साहेब परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे उपलब्ध करून देता येईल याबाबतचे विचार व्यक्त केले.
एमबीएचे संचालक मा.डॉ.धनंजय बागुल यांनी कार्यक्रमाचे वक्ते मा.डॉ.डॅनियल पेंकर (सिनी. प्रोफेसर. आय.बी.एम.आर.) यांची थोडक्यात ओळख करून दिली.
डॉ. पेंकर यांनी वेगवेगळया शैक्षणिक विभागामध्ये काम करून आलेले अनुभव विशद केले. आपल्या भाषणातून विद्यार्थ्याला प्रेरणे बरोबर विचार ही करायला लावले. नोकरीच्या असंख्य संधी आज उपलब्ध आहेत, त्याप्राप्त करण्यासाठीं अभ्यास करणे, संगणक हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे, विषयांवर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये 12वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी वक्ते प्रा. देवानंद बागुल (सिनि.प्रा.एम.ई.एस. बॉईज & ज्युनि. कॉलेज, पुणे.) सरांनी गणित विषय सोपा करून सांगितला. प्रत्येक ठिकाणी गणित विषय कसा उपयोगी आहे, त्याच्या शिवाय जग चालु शकणार नाही, तसेच वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गणिताचा वापर कसा केला जातो हे विशद केले. 11वी, 12वीचे गणित सर्व परीक्षांसाठी बेसिक स्वरूपाचा आहे, त्याचा विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. तसेच विद्यार्थ्यानी शारीरिक, मानसिक तंदुरुस्त राहावे. गणित विषयाचा पेपर कसा सोडवावा याविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.के.जी.कानडे यांनी positive thinking ने आपल्यात कसा बदल आणि प्रगती होते हे स्पष्ट केले.
अशा कार्यक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. विलास लांडे साहेब. सचिव मा.श्री.सुधिर मुंगसे
खजिनदार मा.श्री.अजित गव्हाणे, विश्वस्त विक्रांतदादा लांडे व संस्थेचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळते.
कार्यक्रमास उपस्थित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भोसरी, प्राचार्य डॉ. के.जी.कानडे , ज्ञानभक्ति महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.एम.चौधरी, एमबीए चे संचालक डॉ.धनंजय बागुल, उपप्राचार्य डॉ.डी.व्ही.शेळके, श्री.एन.डी.भालेराव व महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन, आभार प्रा.अशोक कुदनर यांनी केले.

27/08/2024

"Dancing is a form of patriotism; it expresses the heart and soul of a nation". Outstanding performance given by 12th Science Students on the occasion of 78th Independence Day.

Send a message to learn more

Address

Moshi Alandi Road
Alandi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyanbhakti College, Dudulgaon - Alandi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share