08/03/2026
आळे येथील जाधव महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेत सर्जनशीलतेवर डॉ. केशव बोरकर यांचे मार्गदर्शन
ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळे ता. जुन्नर, जि. पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या बहिःशाल मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्षात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमाला” आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या सहकार्याने ही व्याख्यानमाला यशस्वीपणे पार पडली.
या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. केशव नामदेव बोरकर यांनी “सर्जनशीलता” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना बालपणीच्या आठवणी जागवत नवनिर्मितीची क्षमता कशी विकसित करता येते, तसेच काळानुसार आलेल्या अनुभवांवर आधारित विचार कसे करावेत याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. चिमणी–कावळा या कथेवर आधारित प्रात्यक्षिकातून आजची नवी पिढी कशी विचार करते हे त्यांनी हसत-खेळत विद्यार्थ्यांसमोर मांडले.
या व्याख्यानाचा लाभ बीबीए, बीबीसीए, कला शाखा, वाणिज्य शाखा तसेच एम.कॉम.च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी इतिहास विभाग प्रमुख व वैशाली शिक्षण मंडळाच्या केंद्रवाहक डॉ. अरुणा रविंद्र वाघोले यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन ज्ञानार्जन करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. प्रविण जाधव यांनी डॉ. केशव बोरकर यांचा सत्कार केला. पाहुण्यांचा परिचय मेजर डॉ. सुषमा कदम यांनी करून दिला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान तसेच बीसीएस विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. नितीन मोरे यांनी मानले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. गिरी मनिषा, प्रा. आतकरी आश्विनी तसेच बीसीएस विभागाचे सर्जेराव थोरात, अनुराधा वामन, खंडागळे सायली, कांबळे प्रियंका, शिंदे साक्षी, खंडागळे रितेश, शिंदे सिद्धी, कदम दिपांजली, गायकवाड तेजल, राऊत श्वेता यांचे सहकार्य लाभले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वर्गातील सुनील भुजबळ, चक्रभुज दुर्गे, सुप्रिया गुंजाळ, सचिन जठार, भाऊ तितर, सागर भुजबळ, शरद कुऱ्हाडे, सचिन कुऱ्हाडे व राजू पाडेकर यांनीही सहकार्य केले. एनसीसीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुनशेठ पाडेकर, खजिनदार अरुणशेठ हुलवळे तसेच संचालक किशोरशेठ कुऱ्हाडे, भाऊशेठ कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हासशेठ सहाणे, बाबुशेठ कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवनशेठ शिंदे, दिनेश सहाणे, कैलासशेठ शेळके, प्रदीपशेठ गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळाने या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे हा विद्यापीठस्तरीय उपक्रम यशस्वीपणे पार पडला.