18/09/2025
लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चोंढी किहीम , करिअर कट्टा विभाग व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ ऑगस्ट २०२५ रोजी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमानिमित्त एम. के.सी.एल. आय लाईक कॉर्डिनेटर श्री.विश्वास मते उपस्थित होते व त्यांनी एम. के.सी.एल अंतर्गत असणारे ३०० कोर्सबद्दल माहिती दिली.विद्यार्थ्यांना या कोर्स चा त्यांच्या अभ्यासक्रमात होणारा फायदा समजावून सांगितला. सदर कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष मा.श्री रवींद्र ठाकूर उपस्थित होते.तसेच संस्थेचे सहकार्यवाह मा.श्री. जगन्नाथ पेढवी उपास्थित होते.तसेच संस्थेचे संचालक मा.श्री.किरण ठाकूर उपस्थित होते.