PNP Education Society

PNP Education Society PNP Education Society

दहावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या कठोर परिश्रम, जिद्द आ...
08/05/2026

दहावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन!

तुमच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीमुळे मिळवलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे. आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असून, यापुढेही तुम्ही असेच यश संपादन करत राहा, हीच शुभेच्छा.

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार , रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक , प्रसिद्ध उद्योगपती , श्रीबाग सहक...
08/05/2026

पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार , रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक , प्रसिद्ध उद्योगपती , श्रीबाग सहकारी संस्थेचे चेअरमन मा. आदरणीय श्री. नृपाल पाटील सर यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा !
आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...

 #पीएनपी  #कॉलेज आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्सचा  निकाल  #१०० टक्के  #अस्मी  #पटेल ८९.५० टक्के गुण मिळवून...
02/05/2026

#पीएनपी #कॉलेज आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्सचा निकाल #१०० टक्के
#अस्मी #पटेल ८९.५० टक्के गुण मिळवून संस्थेत #प्रथम

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पीएनपी एज्युकेशन सोसायटीचा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व कॉम्प्युटर सायन्स वेश्वी गोंधळपाडा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून संस्थेमधून कॉम्प्युटर सायन्स मधील विद्यार्थिनी अस्मी हर्षल पटेल ८९.५० टक्के गुण मिळवून प्रथम, स्वरा अविनाश पाटील ८७.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर सम्यक विनोद काळे ८६.१७ टक्के गुण मिळवून संस्थेत तृतीय आलेला आहे.
आर्ट्स विभागाचा निकाल १०० टक्के, कॉमर्स विभागाचा निकाल १०० टक्के, सायन्स विभागाचा निकाल १०० टक्के, तर कॉम्प्युटर सायन्स विभागाचा निकाल सुद्धा १०० टक्के लागला आणि कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य, प्राध्यापक सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन...

महाराष्ट्र दिनानिमित्त पीएनपी वेश्वि संकुल येथे पीएनपी कॉलेजचे संचालक, एच.आर. विक्रांत वार्डे यांच्या हस्ते ध्वजारोहन सं...
01/05/2026

महाराष्ट्र दिनानिमित्त पीएनपी वेश्वि संकुल येथे पीएनपी कॉलेजचे संचालक, एच.आर. विक्रांत वार्डे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले.
यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गीते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पाटील, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, होली चाईल्ड सी.बी.एस.ई. स्कुलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, होली चाईल्ड स्कुल वेश्विच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, बी एड. महाविद्यालयाचे प्रा. हृतिषा पाटील, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, क्रीडा प्रशिक्षक प्रा. तेजस म्हात्रे आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 #पीएनपी  #संस्थेत  #सिया राऊळ ९०.६०% गुण मिळवून  #प्रथम पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई स्कूलचा  #निकाल  #१०० %राज्यातील सीब...
16/04/2026

#पीएनपी #संस्थेत #सिया राऊळ ९०.६०% गुण मिळवून #प्रथम
पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई स्कूलचा #निकाल #१०० %

राज्यातील सीबीएसई दहावी शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी ( दि. १५ ) ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यामध्ये अलिबाग तालुक्यातील पीएनपी होली चाईल्ड वेश्वी सीबीएसई स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले.
पीएनपी सायरस पुनावाला स्कूल नागावचा ९३% निकाल तर पीएनपी वाय.एम.पी. सांबरी सीबीएसई स्कूलचा निकाल ८६% लागला आहे आणि पीएनपी सायरस पुनावाला स्कूल नागावची विद्यार्थिनी सिया सचिन राऊळ हिने ९०.६०% गुण मिळवून संस्थेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई स्कूल वेश्वीचा विद्यार्थी अमीर अली खान याने ९०% गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. मनस्व मधुकर थळे याने ८८.२% गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला आणि विधी जितेंद्र निगडे हिने ८६% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. आमदार जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, पीएनपी होली चाईल्ड वेश्वी शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, सायरस पुनावाला नागाव शाळेच्या मुख्याध्यापिका गीतिका भूचर आणि पीएनपी वायएमपी शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा दुबे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून भरभरून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

 #पीएनपीच्या  #विद्यार्थिनी  #राज्यात  #अव्वल अलिबाग तालुक्यातील पीएनपी होली चाईल्ड सी.बी.एस.ई. वेश्वी स्कूलमधील विद्यार...
31/03/2026

#पीएनपीच्या #विद्यार्थिनी #राज्यात #अव्वल
अलिबाग तालुक्यातील पीएनपी होली चाईल्ड सी.बी.एस.ई. वेश्वी स्कूलमधील विद्यार्थिनी #इंडियन #टॅलेंट #ओलिंपियाड ( Indian Talent Olympiad ) ( ITO ) इंग्रजी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा नावलौकिकात भर घातली आहे.
इयत्ता तिसरीतील सान्वी पटेल हिने दुसऱ्या फेरीत राज्यस्तरावर पाचवा क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली, तर इयत्ता पहिलीतील वीरा फार्णे हिने तिसरा क्रमांक मिळवून राज्यात आपले स्थान निर्माण केले आहे. या दोन्ही विद्यार्थिनींनी राज्यात टॉपर म्हणून मानाचा किताब पटकावत शिष्यवृत्तीही मिळवली आहे.
विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. इंग्रजी विषयातील उत्कृष्ट प्रावीण्यामुळे त्यांनी ही कामगिरी साध्य केली आहे, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण शाळेचा अभिमान वाढला असून, शिक्षकवृंद व पालकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाजकर, यांनी उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोघींचे अभिनंदन केले. सान्वी पटेल आणि वीरा फार्णे यांच्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पारिजात मुंबई आयोजित "गोष्ट मराठीची" कथा अभिवाचन स्पर्धेत पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यशपारिजात मुंबई या संस्थे...
13/03/2026

पारिजात मुंबई आयोजित "गोष्ट मराठीची" कथा अभिवाचन स्पर्धेत पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

पारिजात मुंबई या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारी "गोष्ट मराठीची" शालेय विद्यार्थ्यांसाठी सांघिक कथा अभिवाचन स्पर्धा नुकतीच सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कुरुळ, अलिबाग येथे पार पडली.
या स्पर्धेत एकूण १० शाळांमधील २० संघांमधून ८५ विद्यार्थी सहभागी झाले होते, स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका श्रीमती प्रमिला वैभव शेळके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अलिबागमध्ये प्रथमच "गोष्ट मराठीची" स्पर्धा आयोजित करूनही शाळांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. या करिता अलिबागमधील शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पुढील काही वर्षांत अलिबाग तालुक्यातील इतर विविध गावांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याचा पारिजातचा मानस आहे. तसेच, भविष्यात या संबंधित नवनवे उपक्रम राबवताना अलिबागकरांकडून सहाय्य व उत्तम प्रतिसाद लाभेल तसेच या उपक्रमास याहून अधिक प्रतिसाद शाळेकडून, विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून मिळेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ०१ मार्च रोजी पार पडला. यावेळी परीक्षकांनी विद्यार्थ्यांना कथा अभिवाचनाविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी मराठी काव्य, पोवाडे व नाट्य सादरीकरण केले. पारिजात मुंबई आणि गंमत शाळा अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला, सदर कार्यक्रमास श्रद्धा पोखरणकर, हिमालय चोरघे, सुशांत म्हात्रे, अवंती वर्तक, अनिष पानसरे, सुनील यादव, गौरी पालवणकर हे उपस्थित होते तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक व पारिजातचे स्नेही असे एकूण १२० हून अधिक जण उपस्थित होते.
अलिबाग येथील स्पर्धेत पाचवी ते सातवी गटामधून पी.एन.पी. माध्यमिक शाळा, वेश्वी ( कथा नाद, लेखक द. मा. मिराजदार ) या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला, सं. मं. हायस्कूल, नागांव (कथा पिटक्या डुकराची गोष्ट) या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच रा. जि. प. शाळा, वायशेत ( कथा हत्तीला वाचविणे, लेखक आ. ना. पेडणेकर ) या शाळेला उत्तेजनार्थ प्रमाणपत्र प्राप्त झाले. तसेच उत्तम अभिवाचक म्हणून मनस्वी राकेश कोरगावकर हिस व ध्रुव किरण म्हात्रे पास प्रमाणपत्र प्राप्त झाले.
तसेच या स्पर्धेतील आठवी ते दहावी या गटामधून पी.एन. पी. माध्यमिक शाळा, वेश्वी ( कथा श्यामची आई, लेखक - साने गुरुजी ) या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला, या मध्ये कस्तुरी लोलगे, उपासना पाटील, अनुष्का लोंढे, कल्याणी बाणे यांनी सहभाग घेतला होता. पी.एन.पी. होली चाईल्ड, वेश्वी ( कथा अंधारातून प्रकाशाकडे ) शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला, या मध्ये यश जानकर, श्रेया मालोदे, जानवी जाधव, स्वरा मोरे, समृद्धी जयस्वाल तसेच पी. एन. पी. सायरस पूनावाला इंग्लिश मिडीयम स्कूल, नागांव ( कथा चिमुकली दिवटी, लेखिका सुधा मूर्ती ) या शाळेला उत्तेजनार्थ प्रमाणपत्र प्राप्त झाले. यामध्ये अथर्व घरत, तीर्था कर्णेकर, आस्था बळी, संस्कृती मयेकर, काव्या प्रधान तसेच उत्कृष्ट अभिवाचक म्हणून पी.एन. पी. माध्यमिक शाळा वेश्वीची विद्यार्थिनी उपासना उत्तम पाटील हिस प्रमाणपत्र प्राप्त झाले.
या नेत्रदीपक यशा बद्दल पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, माध्यमिक विद्यालय कुरुळच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील, पीएनपी शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, होली चाईल्ड एस. एस. सी. बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, पीएनपी सायरस पूनावाला इंग्लिश मिडियम स्कूल नागावच्या मुख्याध्यापिका गीतिका भूचर व विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

पीएनपी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजराप्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान म...
13/03/2026

पीएनपी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये दिनांक २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पाटील उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे प्रा. दिनेश पाटील, कला आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा म्हात्रे यांनी केले. त्यांनी वैज्ञानिक स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला प्रोत्साहन देत वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य रवींद्र पाटील यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'रामन इफेक्ट' च्या ऐतिहासिक शोधाचे महत्त्व विशद करत सी. व्ही. रामन यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. कला विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील यांनी विज्ञान साहित्यातील प्रगती व एआय (AI) तंत्रज्ञानावर भाष्य केले, तर प्रा. दिनेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना चिकित्सक वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय वक्तव्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी केले. यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सी. व्ही. रामन यांच्या कार्याचे स्मरण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न घेता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आणि नवनवीन प्रयोगाद्वारे स्वतःची प्रगती करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जैव-रांगोळी स्पर्धेत.वेदिका म्हात्रे हिने प्रथम क्रमांक, सुजल पाटील व नयन गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक, तर गौरी पुरोहित हिने तृतीय क्रमांक मिळवला. वर्किंग मॉडेल स्पर्धेत वैभव ठाकूर व.श्रवण पाटील प्रथम क्रमांक, दीप कवळे व स्मित पाटील द्वितीय क्रमांक, तर ओम देशमुख व हर्षल कनोजे तृतीय क्रमांक प्राप्त केला. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये अलीना औसेकर व पलक कराणी यांनी प्रथम, शर्वरी पाटील हिने द्वितीय, तर नियती पाटील व मानसी वार्गे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल्स देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पूजा पाटील व प्रा. कैलास सिंग राजपूत यांनी केले, तर प्रा. करण वाडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शनात नेत्रदीपक यशपनवेल येथे आयोजित अटल जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पीएनपी ह...
13/03/2026

पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शनात नेत्रदीपक यश
पनवेल येथे आयोजित अटल जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पीएनपी होली चाईल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत सर्व चार विभागांमध्ये पारितोषिके पटकावली, विशेष म्हणजे सर्व विभागांमध्ये चारही पारितोषिके मिळवणारी पीएनपी ही एकमेव शाळा ठरली आहे.
इलेक्ट्रॉनिक विभागात अर्नव पालकर प्रथम क्रमांक, मेकॅनिकल विभागात दिनेश राऊत प्रथम क्रमांक, डिजिटल विभागात अर्नव पालकर द्वितीय क्रमांक, थीम आधारित प्रकल्प विभागात पार्थ परदेशी द्वितीय क्रमांक या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत मार्गदर्शक शिक्षिका प्रगती भोसले, इक्रा कूर आणि सुविद्या पाटील यांनाही प्रशस्तीपत्र व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या नेत्रदीपक यशाबद्दल विजेते विद्यार्थी, सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, होली चाईल्ड एस.एस.सी. बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले तसेच उपमुख्याध्यापिका शर्मिला शेटे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरापीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाला  'अ +' श्रेणीराज्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यां...
24/02/2026

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाला 'अ +' श्रेणी
राज्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे योग्य मापन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र द्वारे राबविण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) प्रक्रियेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यातील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वेश्वी या कनिष्ठ महाविद्यालयाने 'A+' (अ+) श्रेणी प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. जयंत पाटील, संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, खजिनदार नृपाल पाटील यांनी अभिनंदन केले.

रायगडचे भाग्यविधाते स्व.प्रभाकर पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
21/02/2026

रायगडचे भाग्यविधाते स्व.प्रभाकर पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

Address

Alibag Pen Road
Alibag
402209

Alerts

Be the first to know and let us send you an email when PNP Education Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to PNP Education Society:

Share