18/07/2022
भारतीय जन संचार संस्थान, पश्चिम विभागीय केंद्र, अमरावती व युनीसेफ़ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "तरुण माध्यम व्यवसायिकांचे मानसिक स्वास्थ्य' या विषयावर आयोजित एक दिवसीय चर्चा सत्राला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सभागृहात उत्साहात सुरवात झाली. कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने झाली. मंचावर अध्यक्षस्थानी दै. भास्कर चे समूह संपादक प्रकाश दूबे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून भारतीय जन संचार संस्थानचे महा संचालक प्रा. (दो.) संजय द्विवेदी, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्रा. कृपा शंकर चौबे व आय आय एम सी चे प्रादेशीक संचालक प्रा. वी. के. भारती होते. प्रा. प्रमोद कुमार यांनी प्रास्ताविक केले.