Municipal High School and jr.college of science,Arvi

  • Home
  • India
  • Arvi
  • Municipal High School and jr.college of science,Arvi
Call Directions Website

Municipal High School and jr.college of science,Arvi We created such a meritorious students who place their ranks in national,state exams. Last but not least we've all facilities & gives better education

02/07/2026
*पीएम श्री गांधी विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा**तुम्हीच उद्याच्या भारताचे भविष्य आहात आपल्या गांधी विद्यालयाचे न...
30/06/2026

*पीएम श्री गांधी विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा*

*तुम्हीच उद्याच्या भारताचे भविष्य आहात आपल्या गांधी विद्यालयाचे नाव उज्वल करा -* सौ.स्वातीताई गुल्हाने नगराध्यक्ष नगरपरिषद आर्वी

*आपली शाळा हि महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक येण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करेल* -श्री गौरव जी जाजू उपाध्यक्ष तसेच सभापती शिक्षण समिती नगर परिषद आर्वी

आज विदर्भातील शाळा ह्या पूर्ववत नवीन सत्रामध्ये सुरू झाल्या यामध्येच पीएम श्री नगरपरिषद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय 30 जून सकाळी नऊ वाजता नवीन विद्यार्थ्यांचे भव्य असे स्वागत घेण्यात आले.
स्वागत करता सर्वत्र विविध प्रकारच्या आकर्षक असे डेकोरेशन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट्स , गुलाबपुष्प आणि बलून देऊन त्यांना प्रवेशित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वातीताई गुल्हाने नगराध्यक्ष नगरपरिषद आर्वी प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष तसेच शिक्षण समिती सभापती श्री गौरव जी जाजू तसेच सदस्य श्री लवेश जी गलोले, श्रीमती शुभांगी ताई गाठे ,श्रीमती प्रियंका ताई भीमके ,प्राचार्य श्री विश्वेश्वर पायले , पर्यवेक्षिका ज्योतीताई अजमेरे, प्राध्यापक नितीन बोडके या मान्यवरांचे हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या विचारप्रतिमेचे पूजन झाले त्यानंतर वर्ग पाचवीतील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना पुस्तके ,बॅग ,कंपास ,चॉकलेट्स, आणि सहा नोटबुक असलेला संच आणि शाळेचा गणवेश वितरित करण्यात आला, याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या भाषणामधून विद्यार्थ्यांना नवीन सत्राच्या शुभेच्छा दिल्या आणि या शाळेने अनेक दिग्गज असे विद्यार्थी तयार केलेले आहेत आपणही आपल्या परिश्रमाच्या जोरावर त्या पदापर्यंत पोहोचू शकता . ज्या ज्या गोष्टींची भविष्यामध्ये या विद्यालयाला गरज असेल त्याचे परिपूर्णता करण्याकरता नगरपरिषद आर्वी नेहमी तयार राहील अशी ग्वाही सुद्धा दिली. प्राचार्यांनी प्रास्ताविकामधून या कार्यक्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद नागरे यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका ज्योतीताई अजमेर यांनी केले.

30/06/2026

First day of School

One of the former students of our Municipal Council Secondary and Higher Secondary School, Arvi, who was an NCC cadet, i...
22/06/2026

One of the former students of our Municipal Council Secondary and Higher Secondary School, Arvi, who was an NCC cadet, is currently serving as a Fire Officer.
On the occasion of International Yoga Day, after the completion of the first session, Mr. Shubham Asole conducted the second session and provided NCC cadets with in-depth guidance on Fire and Safety. He also informed the students about the various career opportunities in the Fire and Safety sector, inspiring them to explore this important and rewarding field.
His valuable guidance helped the cadets gain awareness about fire safety, emergency response, and future career prospects in the field.

आज आपल्या पीएम श्री नगरपरिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय गांधी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात रेड क्रॉस सोसायटी आर...
21/06/2026

आज आपल्या पीएम श्री नगरपरिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय गांधी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात रेड क्रॉस सोसायटी आर्वी तालुका विधि समिती, एनसीसी युनिट आणि सर्व विद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला

आज आपल्या पीएम श्री नगरपरिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय गांधी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात रेड क्रॉस सोसायटी आर...
21/06/2026

आज आपल्या पीएम श्री नगरपरिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय गांधी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात रेड क्रॉस सोसायटी आर्वी तालुका विधि समिती, एनसीसी युनिट आणि सर्व विद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला

day of yoga

20/06/2026
*निरोप समारंभ*आज दिनांक 20 जून दुपारी तीन वाजता पीएम श्री नगरपरिषद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच गांधी विद्याल...
20/06/2026

*निरोप समारंभ*

आज दिनांक 20 जून दुपारी तीन वाजता पीएम श्री नगरपरिषद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच गांधी विद्यालय यांच्या वतीने डॉक्टर किरण सुकलवाड साहेब मुख्याधिकारी नगरपरिषद आली यांचा सत्कार सोहळा निरोप समारंभ आयोजित करण्यात आलेला होता
या कार्यक्रमांमध्ये प्राचार्य श्री विश्वेश्वर पाहिले सर पर्यवेक्षिका श्रीमती अजमेरे मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉक्टर किरण सुकलवाड साहेबांना स्मृतीचिन्ह ,शाल , भेटवस्तू पुस्तक देण्यात आले आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला .

मुख्याधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनात गेल्या अडीच वर्षांमध्ये नगरपरिषद गांधी विद्यालयाचे नवीन इमारतीचे हस्तांतरण, जुन्या इमारतीमधील दुरुस्तीचे कामे ,बगीच्याचे वॉल कंपाऊंड संपूर्ण शाळेची संरक्षित भिंत तसेच भव्य असे प्रवेशद्वार पर्यावरणाला पूरक असेल सोलर पॅनल प्रोजेक्ट तयार झाला तसेच रात्रीच्या वेळेला ग्राउंडवर हाय मास्क लावण्यात आले, सायकल स्टॅन्ड असेल सिक्युरिटी गार्ड तसेच शिष्यवृत्ती नवोदय एन एम एम एस परीक्षेसाठी अतिरिक्त शिक्षकाची नेमणूक सुद्धा साहेबांच्याच काळात झाली
गोरगरीब शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अत्यंत चांगल्या दर्जाचे शिक्षण नगरपरिषदेच्या शाळेमधून देण्याकरता डॉक्टर किरण सुकलवाड साहेब नेहमीच प्रयत्न करत होते त्यामुळे हा सत्कार सोहळा घेण्यात आला असेच अधिकारी पुढे आपल्या आडवी शहराला आणि आपल्या शाळेला लाभो हीच सदिच्छा साहेबांना पुढील आयुष्य करता त्यांच्या पुढील कार्यकालकरता खूप खूप शुभेच्छा .

वरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका कुमारी ज्योतीताई अजमेरे तसेच साहेबांविषयीचे मनोगत ज्येष्ठ शिक्षक श्री बोडखे सर आणि श्री किटे सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोद नागरे तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य विश्वेश्वर पायले यांनी केले.

आपल्या विद्यालयात कार्यरत माझे मित्र आदरणीय श्री संजय किटे सर यांचा *मुलगा ऋतुज संजय किटे* आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी...
15/06/2026

आपल्या विद्यालयात कार्यरत माझे मित्र आदरणीय श्री संजय किटे सर यांचा *मुलगा ऋतुज संजय किटे* आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आणि एनसीसी छात्र सैनिक असलेला वर्ग पाचवी ते दहावीपर्यंत आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेला *आज 15 जून 2026 रोजी* त्याचे ऍडमिशन हे *IIM RAIPUR* या प्रतिष्ठित अशा संस्थेमध्ये झालेली आहे त्याला पुढील शिक्षणाकरता खूप खूप शुभेच्छा नक्कीच तो आपल्या शाळेचे आपल्या कुटुंबाचे आणि आर्वीचे नाव उज्वल करेल. 🎊🎊🎊🎈🎈🎈🎈🎈🎈👍🏻👍🏻👍🏻👍🏻🤗🤗🤗🌹🌹🌹🌹

Address

Main Road
Arvi
442201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Municipal High School and jr.college of science,Arvi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share