24/02/2020
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व मा. श्री.अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय ,आष्टा यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२० रोजी राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा २०१९-२० उत्साहात संपन्न झाली.संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अण्णासाहेब डांगे (आप्पा)उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे संशोधन अधिकारी डॉ.प्रदीप आवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.संस्थेचे उपाध्यक्ष मा. ॲड.संपतराव पाटील,यशवंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलींद गोडबोले, वसंतदादा आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण पेठे, पेठ वडगांव आयुर्वेद महाविद्यालयाचे व्यवस्थापन समिती प्रमुख मा. संजय डकरे, प्राचार्य डॉ.विनोद पाटील, डॉ.दीपक पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भोई प्रमुख उपस्थित होते, प्राचार्य डॉ.एस.एन.ओझा यांनी स्वागत प्रास्ताविक केले.
जवळपास२०महाविद्यालयांमधून स्पर्धक या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेसाठी सहभागी झाले.९६स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आदी भागांचा समावेश आहे.विद्यार्थी व अधिव्याख्याता यामध्ये समाविष्ट झाले असून विद्यापीठाचे प्र.कुलगुरु मा. डॉ.मोहन खामगावकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सदर राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेचा मुख्य उद्देश हा विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अध्यापक व विद्यार्थी यांचा संशोधनपर अभ्यास वाढीस लागणे हा आहे.या माध्यमातून विद्यापीठाकडून प्रोत्साहनपर आर्थिक मदत असलेल्या एस.टी.आर.जी व एल.टी.आर.जी.या दोन्ही प्रोजेक्ट्सचे सादरीकरण करण्यात आले.यावेळी आदरणीय आप्पांनी मार्गदर्शन केले.विद्यापीठ संशोधन विभाग प्रमुख डॉ.प्रदीप आवळे यांनी विद्यापीठाच्या संशोधनविषयक विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले.राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा समन्वयक डॉ.जयवंत खरात यांच्यासमवेत अध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी संयोजन केले.