Geetai Arts and Commerce College

Geetai Arts and Commerce College Geetai Arts and Commerce College -
B.A.(civil services), B.Com.

16/05/2026

प्रवेश सुरू
बी. सी. एस., बी. ए., बी. कॉम.

🎯 गीताई आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज येथे यशस्वी जॉब फेअर 🎯गीताई आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, बिडकीन येथे दिनांक 12 मे 2026 रोजी ...
13/05/2026

🎯 गीताई आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज येथे यशस्वी जॉब फेअर 🎯

गीताई आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, बिडकीन येथे दिनांक 12 मे 2026 रोजी Trainees व Interns साठी Job Fair / Campus Drive यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. या उपक्रमात एकूण 42 विद्यार्थी सहभागी झाले असून त्यापैकी 25 विद्यार्थ्यांनी मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली. नोकरीच्या स्वरूपानुसार प्रारंभिक निवडीत Dhoot Transmissions Pvt. Ltd., Chitegaon साठी 17 विद्यार्थी तर Varroc Engineering Ltd., Waluj साठी 07 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या कॅम्पस ड्राइव्हसाठी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल श्री. चेतन चव्हाण (Manager - HR Operation) व श्री. गणेश राख (Manager - Business Development), DMC Finishing School Pvt. Ltd., Waluj, छ. संभाजीनगर यांचे मनःपूर्वक आभार.

#गीताईकॉलेज

🎯 नोकरीची सुवर्णसंधी | JOB FAIR 2026 🎯गीताई सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित🏛️ Geetai Institute of Management🏛️ Geetai A...
09/05/2026

🎯 नोकरीची सुवर्णसंधी | JOB FAIR 2026 🎯
गीताई सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित
🏛️ Geetai Institute of Management
🏛️ Geetai Arts & Commerce College
यांच्या संयुक्त विद्यमाने
📢 “JOB FAIR for Trainees & Interns” आयोजित करण्यात आला आहे.
🔹 सहभागी कंपन्या :
✅ Dhoot Transmissions Pvt. Ltd., Chitegaon
✅ CIE Aluminium Casting India Ltd., Chitegaon
📅 दिनांक : 12 मे 2026 (मंगळवार)
⏰ वेळ : सकाळी 10:00 वाजता
📍 स्थळ : Geetai Educational Campus, Shekta Road, Bidkin, Tal. Paithan, Dist. Chh. Sambhajinagar
👨‍🎓 गीताई कॉलेजचे विद्यार्थी तसेच बिडकीन परिसरातील सर्व पात्र उमेदवारांनी या जॉब फेअरमध्ये सहभागी व्हावे.
📄 सोबत आणावयाची कागदपत्रे :
• Resume / CV
• 10वी, 12वी व पदवी मार्कशीट झेरॉक्स
• आधार कार्ड झेरॉक्स
📞 अधिक माहितीसाठी :
9921966159 / 7888284009
📧 [email protected]
🌐 www.gsctgim.in
🌐 www.gsctgacc.in

🎓 प्रवेश सुरू 2026–27 | गीताई संस्थांमध्ये, बिडकीनइयत्ता १२ वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉आता तुमच्...
04/05/2026

🎓 प्रवेश सुरू 2026–27 | गीताई संस्थांमध्ये, बिडकीन
इयत्ता १२ वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉
आता तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पुढील पाऊल टाका.
🏫 गीताई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट | गीताई आर्ट्स & कॉमर्स कॉलेज | गीताई ज्युनिअर कॉलेज
📚 उपलब्ध अभ्यासक्रम:
• बी.सी.एस. (कॉम्प्युटर सायन्स)
• बी.ए. (सिव्हिल सर्व्हिसेस – UPSC/MPSC मार्गदर्शित)
• बी.कॉम.
• ज्युनिअर कॉलेज (११ वी व १२ वी – सायन्स व कॉमर्स)
✨ गीताई का निवडावे?
✔ अनुभवी प्राध्यापक
✔ ICT आधारित अध्यापन
✔ कौशल्याधारित शिक्षण
✔ करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा तयारी
✔ इंटर्नशिप व उद्योग संधी
📍 ठिकाण: शेक्ता रोड, बिडकीन, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर
📞 संपर्क: 9921966159 / 8888978037
🌐 www.gsctgim.in⁠� | www.gsctgacc.in⁠�
👉 आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा!
#प्रवेशसुरू

🌸 दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ : गीताई शैक्षणिक संकुलात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा 🌸दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी गीताई...
02/03/2026

🌸 दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ : गीताई शैक्षणिक संकुलात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा 🌸
दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी गीताई शैक्षणिक संकुलात मराठी भाषा दिन अभिमानाने व उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिन हा महान कवी विष्णु वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांच्या साहित्यसेवेची आणि मराठी भाषेला दिलेल्या मोलाच्या योगदानाची आठवण यानिमित्ताने जागविण्यात आली.
या कार्यक्रमासाठी मराठी विभागातील मान्यवर प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मराठी कविता सादर करून कार्यक्रमाला भावपूर्ण स्वरूप दिले. त्यांच्या सादरीकरणातून मराठी भाषेप्रती असलेले प्रेम व जिव्हाळा प्रकर्षाने जाणवला.
यावेळी मराठी भाषेला राजाश्रय देणारे थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले व सादर केलेले आकर्षक भित्तीपत्रक हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. मराठी भाषेचा इतिहास, वैभव आणि साहित्यपरंपरा यांचे सुंदर चित्रण त्यातून पाहायला मिळाले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल अभिमान आणि जाणीव अधिक दृढ होते.
चला, मराठीचा सन्मान राखू आणि मराठीचा अभिमान बाळगू!
#मराठीभाषादिन #२७फेब्रुवारी #कुसुमाग्रज #गीताई #मराठीअभिमान #संस्कृती

🌸 स्त्री आरोग्य व स्वच्छता जनजागृती कार्यक्रम 🌸गीताई कॅम्पस्, बिडकीन येथे महिला विकास कक्षाच्या वतीने“प्लास्टिक फ्री नॅप...
10/02/2026

🌸 स्त्री आरोग्य व स्वच्छता जनजागृती कार्यक्रम 🌸
गीताई कॅम्पस्, बिडकीन येथे महिला विकास कक्षाच्या वतीने
“प्लास्टिक फ्री नॅपकिन आणि कॅन्सर मुक्त गर्भाशय” या विषयावर
स्त्री आरोग्य व स्वच्छता जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमासाठी सौ. संध्या धुळे (संस्थापिका, Joyzeal India Pvt. Ltd.)
तसेच कु. श्रुती पाटकर (Assistant & Health Expert, Joyzeal India Pvt. Ltd.)
यांनी स्त्री आरोग्य, स्वच्छता, प्लास्टिक फ्री सॅनिटरी नॅपकिनचा योग्य वापर
आणि गर्भाशयाच्या कॅन्सरविषयी प्रतिबंधात्मक उपायांवर प्रभावी मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे
हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला.
🙏 सर्व मान्यवरांचे व सहभागी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक आभार.
#स्त्रीआरोग्य #स्वच्छता_जनजागृती #प्लास्टिकफ्री #कॅन्सर_जागरूकता
#महिला_सक्षमीकरण #गीताई_कॅम्पस #विद्यार्थिनी_कल्याण

✨ गीताई कॅम्पस येथे अतिथी व्याख्यान यशस्वीपणे संपन्न ✨गीताई कॅम्पस येथे B.A. व B.Com. तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी“उ...
27/01/2026

✨ गीताई कॅम्पस येथे अतिथी व्याख्यान यशस्वीपणे संपन्न ✨
गीताई कॅम्पस येथे B.A. व B.Com. तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी
“उच्च शिक्षण व करिअरसाठी कौशल्य विकास” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना पुढील विषयांवर मार्गदर्शन मिळाले: ✔ संवादकौशल्य, नेतृत्वगुण व निर्णयक्षमता विकास
✔ पदवी नंतरचे करिअर पर्याय
✔ उच्च शिक्षण व MBA प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सचिन वानखेडे, संचालक, Shreeyash Institute of Management Studies and Research, यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व मार्गदर्शक विचार दिले.
तसेच प्रा. साद सिद्दीकी, प्रमुख – MBA विभाग, यांनी उद्योगक्षेत्रातील अपेक्षा, कौशल्यांची गरज व करिअरची वास्तवदृष्टी विद्यार्थ्यांसमोर मांडली.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण व भविष्यातील करिअर निर्णयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.
✨ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गीताई कॅम्पस सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करत राहील.

🇮🇳 गीताई कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 🇮🇳गीताई कला व वाणिज्य महाविद्यालयात भारताचा ७६ वा प्...
27/01/2026

🇮🇳 गीताई कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 🇮🇳
गीताई कला व वाणिज्य महाविद्यालयात भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. श्री. योगेश कोठाळे (CEO – Visual Infosystems Pvt. Ltd.) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणातून तरुणाईला तंत्रज्ञान, नेतृत्व व राष्ट्रसेवेचा संदेश मिळाला.
तसेच, गीताई सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट, बिडकीन यांचे माननीय अध्यक्ष मा. डॉ. किरण एखंडे यांच्या अध्यक्षीय भाषणाने शिक्षण, संविधान आणि समाजघडणी यांचे महत्त्व अधोरेखित झाले.
कार्यक्रमात: 🌸 राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
🚩 ध्वजारोहण व राष्ट्रगीत
🎭 विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम व भाषणे
यांचा समावेश होता.
संविधानिक मूल्ये जपणे हीच खरी देशभक्ती — हा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
जय हिंद!
#प्रजासत्ताकदिन #गीताई #संविधान #देशभक्ती #शिक्षणआणिराष्ट्रनिर्मिती

📚 संशोधन लेखन कार्यशाळा – 01 डिसेंबर 2025 📚गीताई कला व वाणिज्य महाविद्यालयात 01 डिसेंबर 2025 रोजी महाविद्यालयाच्या संशोध...
04/12/2025

📚 संशोधन लेखन कार्यशाळा – 01 डिसेंबर 2025 📚

गीताई कला व वाणिज्य महाविद्यालयात 01 डिसेंबर 2025 रोजी महाविद्यालयाच्या संशोधन व विकास प्रकोष्ठाच्या माध्यमातून नवीन व कार्यरत प्राध्यापकांसाठी “संशोधन लेखन कार्यशाळा” आयोजित करण्यात आली.
ही कार्यशाळा डॉ. कीर्तिकुमार एखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कार्यशाळेत खालील मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले—
✔ संशोधनाचा अर्थ व महत्त्व
✔ संशोधन प्रक्रिया – समस्येची निवड, साहित्य समीक्षा, उद्दिष्टे, पद्धती, विश्लेषण व निष्कर्ष
✔ संशोधन लेखाची रचना व लेखनशैली
✔ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकांची माहिती
✔ संशोधन निधी मिळविण्याच्या विविध संधी

डॉ. कीर्तिकुमार एखंडे यांनी दिलेल्या उपयुक्त व व्यवहार्य मार्गदर्शनामुळे प्राध्यापकांना संशोधन लेखनाची अधिक सखोल व स्पष्ट समज मिळाली.

सर्व प्राध्यापकांच्या उत्साही सहभागाबद्दल मनःपूर्वक आभार!
आपल्या महाविद्यालयात संशोधन संस्कृती अधिक बळकट होत राहो! 🌟

#संशोधनलेखन

संविधान जनजागृती कार्यक्रम 🇮🇳संविधान दिनाचे औचित्य साधून व शासनाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार, गीताई कला, वाणिज्य...
26/11/2025

संविधान जनजागृती कार्यक्रम 🇮🇳

संविधान दिनाचे औचित्य साधून व शासनाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार, गीताई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बिडकीन येथे संविधान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. अनुलोम ट्रस्ट, नागपूर यांचे प्रतिनिधी श्री. विकास ढगे आणि श्री. अक्षत हांचटे यांनी PPT आणि व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानाची निर्मिती, उद्देशिकेतील मूल्ये, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये यांचे प्रभावी व सोपे स्पष्टीकरण दिले. त्यांनी संविधानापुढील सध्याच्या आव्हानांवरही प्रकाश टाकला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल अधिक गंभीरता व जाणीव निर्माण झाली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या समजेसाठी प्रश्नावली सर्वेक्षण घेण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि अनुलोम ट्रस्टचा मोलाचा सहभाग यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.
📸 कार्यक्रमातील काही क्षण खाली दिले आहेत.

#संविधानदिन #अनुलोमट्रस्ट #संविधानजागरूकता

🎓 “Building a Professional You: A Social Perspective” या विषयावर अतिथी व्याख्यान यशस्वीरीत्या पार पडले!गीताई कला व वाणिज...
04/11/2025

🎓 “Building a Professional You: A Social Perspective” या विषयावर अतिथी व्याख्यान यशस्वीरीत्या पार पडले!

गीताई कला व वाणिज्य महाविद्यालयात आज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आयोजित Student Development Programme अंतर्गत सुश्री नाहिदा अब्दुल्ला, Project Coordinator, EduSelf Solutions, Pune यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यांनी “सामाजिक दृष्टिकोनातून व्यावसायिक व्यक्तिमत्व घडविणे” या विषयावर प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच काही प्रात्यक्षिक क्रियाकलाप (Practicals) सुद्धा सादर करण्यात आले.

हा उपक्रम EduSelf Solutions या संस्थेच्या “Educate Yourself” या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आला.

महाविद्यालयाच्या प्राचार्य व शिक्षक वर्गाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. 🌿

📍 स्थळ: गीताई कला व वाणिज्य महाविद्यालय, बिडकीन
📆 दिनांक: ३ नोव्हेंबर २०२५

Address

Shekta Road
Aurangabad
431105

Opening Hours

Monday 10am - 3pm
Tuesday 10am - 3pm
Wednesday 10am - 3pm
Thursday 10am - 3pm
Friday 10am - 3pm
Saturday 10am - 1pm

Telephone

+919921966159

Alerts

Be the first to know and let us send you an email when Geetai Arts and Commerce College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Geetai Arts and Commerce College:

Share