UMANG

UMANG UMANG- THE GROUP OF MEDICAL STUDENTS STUDYING IN GOVT. MEDICAL COLLEGE , AURANGABAD INTENTED IN THE The students studying in the govt.

medical college, Aurangabad felt the need of taking initiative for the improvement of the health status of the people living in the rural area surrounding aurangabad and elsewhere. From the belief of starting from self instead of waiting others to do we lounged into the association named "UMANG- UNITED MISSION FOR AIR, NATURE & GREENARY". We are arranging the monthly health camps in the rural area and taking the awareness session...
DO JOIN US....HAVE YOUR HAND TO THE SOCIETY...

Adminstrative power is given to you for constructive purpose not for destruction.you have to judiciously utilise your ad...
22/07/2023

Adminstrative power is given to you for constructive purpose not for destruction.you have to judiciously utilise your adminstrative power in frame of law ,you can not utilise it according to your whims and fancy... tree

25/03/2021

पर्यावरण संवर्धन करणारा अवलिया

काही दिवसांपूर्वी आम्ही ट्रेकिंग साठी ब्रह्मागिरी पर्वतावर गेलो होतो . त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगापासून हाकेच्या अंतरावर असणारा ब्रह्मगिरी पर्वत ट्रेकर साठी /भाविकांसाठी नैसर्गिक विविधतेमुळे विशेष आकर्षण ठरत आहे .सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेला ब्रह्मगिरी पर्वत समुद्रसपाटीपासून 4248 फूट उंच आहे. खुप उंच वाटणारा ब्रह्मगिरी चढायला सुरुवात केली. आधीच्या दिवशी कळसूबाई शिखर सर केल्यामुळे आम्हाला ब्रह्मगिरी चढायला विशेष अवघड अस काही वाटत नव्हत. गप्पा गोष्टी करत , माकडांच्या करामती पाहत वर कधी पोहोचलो हे आम्हाला समजलं सुद्धा नाही.
पर्वतावर गेल्यावर गोदावरी (दक्षिण गंगा) नदीचा मूळ उगम पहिला , भगवान शंकराने जटा आपटल्याची अख्यायिका काही भाविक सांगत होते ते पण ठिकाण पाहून परतीच्या प्रवासाला निघालो . खुप थकलेलो होतो त्यामुळं एके ठिकाणी सरबत पिण्यासाठी थांबलो . ऊन असल्यामुळं छप्पराच्या सावलीत बसलो .आत खुप थंड वाटत होते ,वर बघतोय तर काय प्लास्टिक बाटल्यांचे छप्पर बनवलं होत . आम्हाला थोडे कुतूहल वाटले , थोड खोलात जाऊन काकांना विचारले तर काकांनी यामागची सर्व गोष्ट सांगितली .छोट छोटे लोक पण प्रसिद्धीच्या खुप दुर पर्यावरणासाठी किती चांगल काम करतात हे आम्हाला चांगलेच समजले . ब्रह्मगीरी पर्वताच भाग वनक्षेत्रात येत असल्याने तिथे कित्येक पशुपक्ष्यांच्या वास आहे , तिथे प्लास्टिक मुळे त्यांना किती त्रास होत असेल याची न कल्पना केलेली बरी.
पर्यटकांनी/भाविकांनी फेकलेल्या बाटल्या /प्लास्टिक काकांना स्वस्थ बसून देईना . ह्या प्लास्टिक बाटल्यांचा बंदोबस्त करायचं हे काकांनी ठरवले . त्यानुसार शक्य होतील तेवढ्या बाटल्या गोळा करायचे . दररोज बाटल्या जमत होत्या पण या जमलेल्या बाटल्याचं करायचं काय? ह्या प्रश्नातुनच बाटल्यांपासून पाईपलाईन बनवायची हि कल्पना मनात आली व नंतर छप्पर टाकायची नामी कल्पना सुचली . जवळपास 15-16 हजार बाटल्यांपासून दुकानाला 2 छप्पर तयार केले . अजुन प्लास्टिक बाटल्यांपासून टेबल , खुर्च्या तयार करायची भविष्यातील योजना आहे असे काकांनी सांगितले .
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक वास्तु /किल्ले आहेत .मी एकट्याने प्लास्टीक टाकले तर काय होते ?असा प्रत्येकाने विचार केल्याने पर्यटन स्थळी (ऐतिहासिक वारसा स्थळी) प्लास्टीक ची समस्या निर्माण होत आहे.यावर कायमस्वरूपी उपाय आपली मानसिकता बदलणे हाच आहे.
चला तर मग प्रत्येकाने स्वतः ची जबाबदारी ओळखुन प्लास्टीक मुक्ती साठी काम करूया.


2nd live session !!! Tomorrow at 5pm! Do join with us on insta page of umang
01/05/2020

2nd live session !!!
Tomorrow at 5pm!
Do join with us on insta page of umang

घाटी मध्ये वाचन चळवळ वृद्घींगत करणाय्रा उमंग अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या बुक टॉक्स  क्लब चे 16 वे सेशन उमंगच्या इंस्टाग्रा...
26/04/2020

घाटी मध्ये वाचन चळवळ वृद्घींगत करणाय्रा उमंग अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या बुक टॉक्स क्लब चे 16 वे सेशन उमंगच्या इंस्टाग्राम पेजवर ऑनलाइन पार पडले. या सेशनमध्ये घाटी चे माजी विद्यार्थी डॉक्टर प्रतिक सुराणा सर यांनी infinite vision हे पुस्तक प्रेझेंट केले. त्याचा सारांश खाली दिलेला आहे.

_*Umang* is going *Live on Instagram* with a *Book Represention* this time!!_📢📣*Hey guys!**Book Talkx Club, Gmc A.bad* i...
21/04/2020

_*Umang* is going *Live on Instagram* with a *Book Represention* this time!!_📢📣

*Hey guys!*

*Book Talkx Club, Gmc A.bad* is glad and excited to announce it's quarantine special series,

It is 1st ever book club session...
conducted through insta live on *Umang* official page on instagram.

📚 *Book*
*_Infinite Vision: Pavithra k Mehta_*
_Presentation by_ :
*_Dr.Pratik Surana_*
(CMO,Gmch A.bad)

📆 *Date* : 25th April 2020
🕰 *Time* : 5:00 pm

If you haven't yet then please follow us on instagram👇🏻

https://instagram.com/umang_gmch_abad?igshid=1ed3drsjr6oai

*Join us on insta live on above page on 25th April, 5:00 pm!!*

Let's use this time of isolation to share and grow, together!

Love,
*Team Umang*

दिनांक 14 रोजी आयोजित करण्यात आलेल्या उमंग अंतर्गत येणाऱ्या ट्रेकींग क्लब ची गोगाबाबा ते दौलताबाद  ट्रेकींग उत्साहात पार...
16/10/2019

दिनांक 14 रोजी आयोजित करण्यात आलेल्या उमंग अंतर्गत येणाऱ्या ट्रेकींग क्लब ची गोगाबाबा ते दौलताबाद ट्रेकींग उत्साहात पार पडली .22 किलोमीटर खुपच जास्त वाटणार अंतर गप्पा, आपले वेगवेगळे अनुभव शेअर करण्यात कधी संपले हे समजलेही नाही. सारख्या विचारांची माणसे एकत्र आल्यावर आपला अवघड प्रवासही सुखकर होतो याचा प्रत्यय आला. सकाळी 7 वाजता सुरू झालेला प्रवास दुपारी 3 ला संपला.

नमस्कार,घाटी मध्ये वाचन चळवळ वृद्धिंगत करणाऱ्या  उमंग अंतर्गत चालणाऱ्या बुक टॉक्स क्लबचे 14 वे सेशन  घाटीच्या ओपीडी मध्य...
31/08/2019

नमस्कार,
घाटी मध्ये वाचन चळवळ वृद्धिंगत करणाऱ्या उमंग अंतर्गत चालणाऱ्या बुक टॉक्स क्लबचे 14 वे सेशन घाटीच्या ओपीडी मध्ये उत्साहात पार पडले मेडिकल सोबतच इतरही पुस्तकं वाचून घाटीच्या विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक सरस पुस्तकावर प्रकाश टाकला.
नम्रता राजेनिंबाळकर हिने राधेय या आपल्या पुस्तकात माणसाचे श्रेष्ठत्व जन्मावर नाही तर कर्मावर अवलंबून असते, मित्र प्रेमाचे श्रेष्ठत्व, सूतपुत्र म्हणून हिणवल्या गेलेल्या कर्णाच्या जीवन कहानी वर थोडक्यात प्रकाश टाकला.
महेश सोनी यांनी सर्वांसाठी आरोग्य या आपल्या पुस्तकात आरोग्य व्यवस्था , त्यासमोरील आव्हाने डॉक्टरांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यावर प्रकाश टाकला .
महेश बन यांनी आपल्या 'फ्रीडम फॉर सेल 'पुस्तकात सिंगापूर व भारत यांची तुलनात्मक पद्धतीने तुलना करून आयुष्यातील झगमगाटा सोबतच वैयक्तिक स्वातंत्र्य ही तसे महत्त्वाचे असते हे विविध उदाहरणाद्वारे पटवून दिले.
श्रीनाथ देशपांडे याने आपल्या आनंदमठ या पुस्तकात प्रचंड प्रमाणात पडलेल्या दुष्काळानंतर ही बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी भारतीय समाजमनात कशाप्रकारे स्वातंत्र्याची ठिणगी जागृत केली याबद्दल थोडक्यात सांगितले .प्रत्येक देशवासियांमध्ये देशभक्ती निर्माण करणारे वंदे मातरम गीत ही या पुस्तकातून घेतलेले आहे.
यश गंगापूरकर याच्या' स्वप्नवत प्रेम कहानी' या कवितेने कार्यक्रमात खूपच रंगत आणली
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजमुद्रा 2017 बॅचने सीनियर च्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले .

घाटी मध्ये वाचन चळवळ वृद्धिंगत करणाऱ्या उमंग अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बुक टॉक्स  क्लब चे  तेरावे सेशन आज  ओपीडीत उत्सा...
07/06/2019

घाटी मध्ये वाचन चळवळ वृद्धिंगत करणाऱ्या उमंग अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बुक टॉक्स क्लब चे तेरावे सेशन आज ओपीडीत उत्साहात पार पडले पडले .
निखिल टाकळकर ने डॅन ब्राऊन लिखित डिसेप्शन पॉईंट हे पुस्तक सादर केले खूप सस्पेन्स ने भरलेले पुस्तक सर्वांना वाचण्याचा आग्रह केला.
आकांक्षा पाटील ने अच्युत गोडबोले यांचं मनात हे पुस्तक सादर केले सर्वसामान्य निरागस मनाला पडलेले विविध प्रश्न व त्यांचा उलगडा या पुस्तकात केलेला आहे .
प्रतीक्षा भुसारे हिने आपली स्वलिखित कविता सादर करून एक वेगळीच रंगत आणली.
अमिता लाखे हिने रस्कीन बाँड यांचे द रूम ऑफ द रूफ हे पुस्तक सादर केले .
'आपले मत पंतप्रधान पाहून की उमेदवार 'पाहून याविषयी वादविवादा मध्ये सर्वांनी आपले मत मांडले
'बुक बँक 'ही नवीन संकल्पना सर्वांना समजावून सांगून त्यासाठी प्रत्येकाने मदत देण्याचे आवाहन बुक टॉक्स क्लब अंतर्गत करण्यात आले.
सेशन यशस्वी होण्यासाठी 2017 बॅच ने परीश्रम घेतले.

शिक्षणाचा उपयोग फक्त स्वतः चे आणि स्वतः च्या कुटूंबाचे आयुष्य समृद्ध करणे नसून,समाजातील वंचित घटकांना त्यांचा न्याय हक्क...
22/05/2019

शिक्षणाचा उपयोग फक्त स्वतः चे आणि स्वतः च्या कुटूंबाचे आयुष्य समृद्ध करणे नसून,समाजातील वंचित घटकांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देणे आहे.याचेच हे एक उत्तम उदाहरण आहे,आपणही आपल्याला जमेल त्या प्रमाणात यात आपला वाटा उचलला पाहिजे

News in today's Divya Marathi...

दि. 25 व 26 एप्रिल 2019       घाटीच्या इतिहासातील पहिले भव्य चित्रकला प्रदर्शन आज भरले. उस्फुर्त भावनेने 15 चित्रकारांनी...
28/04/2019

दि. 25 व 26 एप्रिल 2019

घाटीच्या इतिहासातील पहिले भव्य चित्रकला प्रदर्शन आज भरले. उस्फुर्त भावनेने 15 चित्रकारांनी काढलेली तब्बल 100 हुन अधिक चित्रे या प्रदर्शनासाठी आली. चित्रांमध्ये निसर्गचित्र, गुढचित्रे, मुक्तहस्त चित्रे याबरोबरच अभिनेते, खेळाडू व व्यक्तिचित्रे सुद्धा होती.
Community medicine विभाग येथे असलेल्या museum मध्ये भरविण्यात आलेले हे प्रदर्शन उमंग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कष्टाचे फलीत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मा. डॉ. कानन येळीकर मॅडम यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी मॅडमना त्यांचेच हुबेहुब रेखाटलेले चित्र भेट म्हणुन दिले. यावेळी बोलताना "दैनंदिन जीवनातील तणावाला सामोरे जाताना प्रत्येकाने आपल्या अंगी एक तरी कला जोपासली पाहिजे. अंगी कला असणे म्हणजे माणुस जिवंत असल्याचे प्रमाण होय", असे प्रतिपादन मा. डॉ. येळीकर मॅडम यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे सर, डॉ. कैलास झिने सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे मार्गदर्शक डॉ. डोईबळे सर, डॉ. गरकल सर, बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे मॅडम, डॉ. अंदुरकर मॅडम, डॉ. सुदामे मॅडम आदींची मुख्य उपस्थिती होती.
निलेश आडे, पियुष सावळे, तृप्ती मुगले, सिमरन सुरजमल, स्वेता परिदा, प्रतिक पंजरकर, मिनल गंजेवार यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी विशेष कष्ट घेतले.
स्नेहसंमेलन व इतर कार्यक्रमांतून गायन, नृत्य, अभिनय, खेळ आदी कलांना मार्ग होता. या प्रदर्शनाने चित्रकलेला ही एक व्यासपीठ मिळवुन दिले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दरवर्षी 15 एप्रिल म्हणजेच जागतिक कलादिनी हा कार्यक्रम आता पार पडणार आहे.




aurangabad

Address

Govt. Medical College & Hospital
Aurangabad
431001

Telephone

8668256936

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when UMANG posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share