Matoshri Hausai Athawale Arts and Science College

Matoshri Hausai Athawale Arts and Science College affiliated by Dr. Babasaheb Ambedkar Marathwada university, Aurangabad

22/07/2023

image.png
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद्र
(’नॅक’ चा ’अ’दर्जा प्राप्त)
पदव्यूत्तर विभाग
स्पॉट अ‍ॅडमिशन सूचना (२०२३-२०२४)

महाराष्ट्रातील ’ Oldest' आणि ’ Largest ’ विद्यापीठांपैकी एक असलेल्या नॅक ’अ’ दर्जा प्राप्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया ’ऑनलाईन’ पध्दतीने सुरु आहे. विद्यापीठाचा मुख्य परिसर (औरंगाबाद) तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील विविध विभागात प्रवेश देण्यात येत आहेत. यापुर्वी ’ऑनलाईन नोदणी’ केलेल्या तसेच न केलेल्या व प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांसाठी खास ’स्पॉट अ‍ॅडमिशन’ फेरी १८ ते ३१ जुलै या काळात घेण्यात येणार आहे. रिक्त जागांवर ’First Come, First Admission’ बेसीस वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत.
विद्यापीठाची वैशिष्टये :
 एम.ए, एम.कॉम, कोर्सला केवळ २४१ रुपये वार्षिक शुल्कात प्रवेश
 एम.एस्सी कोर्सला केवळ ५४१ रुपये वार्षिक शुल्कात प्रवेश
 वसतीगृहासाठी केवळ दोन हजार रुपये वार्षिक शुल्क
 नवीन शैक्षणिक धोरणानूसार पदव्यूत्तर अभ्यासक्रम
 बुध्द लेणीच्या पायथ्याशी ७५० एकराचा सुंदर ’ग्रीन कॅम्पस’
 विद्यार्थ्यांसाठी दीड हजार क्षमतेची वसतीगृहे
 अत्यंत अल्प दरात प्रवेश व दर्जेदार शिक्षणाची हमी
 देशातील सर्वाधिक संशोधन फेलोशिपधारक विद्यार्थी
 गरजू विद्यार्थ्यांसाठी ’कमवा व शिका’ योजना
 सुमारे चार लाख ग्रंथाचे समृध्द अद्ययावत ग्रंथालय
 दुर्मिळ ग्रंथासह ६०० विद्यार्थी क्षमतेचा ’वाचन कक्ष’
 अत्याधुनिक प्रयोगशाळासह ’सेंट्रल फॅसलिटी सेंटर’ची ही सुविधा
 अत्याधुनिक सिंथेटिक ’अ‍ॅथलॅटिक्स ट्रॅकची’ सोय
 ’भारतीय संविधान’ विषयाचे सर्वांना शिक्षण
 सुमारे ६० एकरचा सुंदर उस्मानाबाद सब कॅम्पस
विद्यापीठात उपलब्ध असलेले अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे :
पदव्यूत्तर अभ्यासक्रम
मास्टर ऑफ आर्टस (एम.ए) : मराठी भाषा व वाड़ःमय, अर्थशास्त्र, इंग्रजी, भुगोल, हिंदी, इतिहास, पुरातत्व विद्या, पाली व बुध्दिझम, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, मानसशास्त्र, संस्कृत, समाजशास्त्र, ऊर्दु, स्त्री अभ्यास, लिबरल आर्टस, आजीवन शिक्षण विस्तार, योगा, संगीत, महात्मा फुले-डॉ.आंबेडकर विचारधारा
मास्टर ऑफ सायन्स (एम.एस्सी) : बायोकेमेस्ट्री, केमेस्ट्री फॉरेन्सिक सायन्स, बॉटनी, कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजीयन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फिजीक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, स्टॅटस्टिक्स, झुलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो बॉयोलॉजी, ड्रग केमेस्ट्री, ऑर्गेनिक, केमेस्टी फुड टेक्नॉलॉजी, ड्रग अ‍ॅण्ड इंटमिजिएट टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन कंझर्व्हेशन ऑफ बायो डायर्व्हसिटी, मास्टर ऑफ सायन्स इन रुरल टेक्नॉलॉजी
एम.व्होक : इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ऑटोमोबाईल, एम.व्होक.इन प्रिंटींग अ‍ॅण्ड पॅकेजिंग
कॉर्मस विद्याशाखा : मास्टर ऑफ कॉमर्स (एम.कॉम), एम.बी.ए (इंटरनॅशनल बिझनेस), मास्टर ऑफ ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूरिझम मॅनेजमेंट (एमटीटीएम), मास्टर इन हॉटेल मॅनेजमेंट (एमएचएम), वॉटर अ‍ॅण्ड लॅण्ड मॅनेजमेंट (एमएमएस)
प्रोफेशनल कोर्सेस
एम.ए. एमसीजे : मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम
एम.एस.डब्ल्यु, एल.एल.एम,
एमआरएस : मास्टर ऑफ रुरल स्टडीज
इन सोशोलकल्चरल अ‍ॅण्ड पॉलिटिकल अस्पेक्टस, एमआरएस इन रुरल इकॉनॉमिक्स, बँकिंग अ‍ॅण्ड इंडस्ट्री
एम.एफ.ए : पेंटिग, पोर्टेचर
एमएफए : अ‍ॅप्लाईड आर्टस / इल्यूस्ट्रेटर/ टाईपोग्राफी/ इल्यूस्ट्रेशन
एमएफए : बाय रिसर्च : इल्यूस्ट्रेटर/ टाईपोग्राफी / व्हिझ्युलायझेशन
एम.लिब, मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्टस (एमपीए)
पदवी अभ्यासक्रम
बी.व्होक : इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ऑटोमोबाईल, बॅचलर ऑफ ड्रामांटिक्स (बी.डी)
फॉरेन लँग्नेवेजस् : सर्टफिकेट, डिप्लोमा आणि अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन चायनीज, जर्मन, फेंच
बीएफए : पेंटीग, अ‍ॅप्लाईड आर्टस
बीपीए, बी.ए (एमसीजे) आदी
 पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमास प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी संंबंधित विभागात ३१ जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी १०ः३० ते सायंकाळी ५ वाजेयपर्यंत) कागदपत्रासह उपस्थित राहुन प्रवेश निश्चित करावा.
 अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी कटिबध्द.

- प्रा.(डॉ.)भगवान साखळे कुलसचिव

  कोर्स झाल्यावर1. सरकारी विभागात बिल्डिंग इन्स्पेक्टर / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक होता येते.2. स्वतःचा PWD चा काँट्...
20/01/2023

कोर्स झाल्यावर
1. सरकारी विभागात बिल्डिंग इन्स्पेक्टर / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक होता येते.
2. स्वतःचा PWD चा काँट्रॅक्टरशीपचा व्यवसाय करू शकता.
3. जमीन मोजणीचे काम घेऊन स्वतःचा उत्कृष्ट व्यवसाय करू शकता.
अशे भरपूर फायदे म्हणून आजच या कोर्सला ऍडमिशन घ्या, सरकारी नोकरी पाहिजे असेल तर हा कोर्स कराच.
अधिक माहिती साठी संपर्क करा: 9423176801, 9823210999, 9404862875, 097678 04209

22/07/2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ देशातील पहिल्या शंभरमध्ये
💐💐

31/10/2021
24/04/2021
24/04/2021

विद्यापीठाचे पदवीचे पेपर ३ मे तर पदव्युत्तरच्या परीक्षा ५ मे पासून !

सर्व परीक्षा ऑनलाईन होणार

Happy birthday dada
24/04/2021

Happy birthday dada

29/03/2021

Most Urgent_Notice Regarding Examination for All Affiliated Colleges & institutes during Lockdown of Oct/Nov 2020 Exam held in March/April 2021

 *पदवीच्या परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार‘* -१६ मार्चपासून परीक्षा सुरू- शनिवार, रविवारी पेपरला सुट्टी- १४ मार्चपर्यंत...
13/03/2021



*पदवीच्या परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार‘*

-१६ मार्चपासून परीक्षा सुरू

- शनिवार, रविवारी पेपरला सुट्टी
- १४ मार्चपर्यंत 'मॉक टेस्ट'

- कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा:कुलगुरू

औरंगाबाद, दि. १० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा (द्वितीय व तृतीय वर्षाच्या ) नियोजित वेळापत्रकानुसार १६ मार्चपासूनच सुरू होणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या १६ मार्च पासून प्रथम वर्ष सोडून उर्वरित वर्गाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. विद्याथ्र्यांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. सर्व पदवी अभ्यासक्रम (अव्यावसायिक) द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा १६ मार्चपासून सुरु होणार आहेत. औरंगाबाद शहर व जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिल या काळात जिल्हा प्रशासनाने अंशतः लॉकडाऊन जाहीर केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा (द्वितीय व तृतीय वर्ष ) १६ मार्च पासून सुरू होणार आहेत. दरम्यान परीक्षा घेण्यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
तसेच जिल्हा प्रशासन यांनी या संदर्भात घ्यावयाची काळजी व सर्व सूचना काटेकोरपणे पाळण्याचे आदेश विद्यापीठाने संबंधित सर्व केंद्र व महाविद्यालयातील दिले आहेत. एखादा विद्यार्थी आजारी आढळल्यास त्याची वेगळी बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फिजिकल डिस्टन्स इन सेवन या परीक्षा घेण्याची तसेच त्यांच्या सोबत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची सूचनाही कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी दिल्या आहेत. या काळात औरंगाबादसह चारही जिल्ह्यातील परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे तथापि या काळातील सर्व शनिवार-रविवारी विद्यापीठ परीक्षाचे पेपर ठेवण्यात आलेले नाहीत. यासंदर्भातील परिपत्रक आज जारी करण्यात आले आहे. दरम्यान, ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्याथ्र्यांना ११ ते १४ मार्च दरम्यान ऑनलाईन मॉक टेस्ट देता येणार आहे. ज्या विद्याथ्र्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनाच ही टेस्ट देणे गरजेचे आहे. ऑफलाईन विद्याथ्र्यांना स्वत:चे महाविद्यालय हेच ‘होम सेंटर‘ असणार आहे. दरम्यान, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षेसोबतच १ एप्रिल पासून होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली.

*'पेट'चीही मॉक टेस्ट*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि़द्यापीठाच्यावतीने ऑनलाईन ‘पीएच.डी‘ एंट्रन्स टेस्ट अर्थात पेट ( पेपर दुसरा ) येत्या शनिवारी (दि.१३) घेण्यात येणार आहे. सहा हजार ३८३ विद्यार्थी पहिला पेपर उत्तीर्ण झाले आहेत. आता १३ मार्च रोजी दुसरा पेपर घेण्यात येईल. या सर्व विद्यार्थ्यांना ही ११ व १२ मार्च रोजी मॉक टेस्ट देणे गरजेचे आहे. सदर मॉक टेस्ट ही विद्यार्थ्यांना पहिल्या पेपर प्रमाणेच मोबाईल लॅपटॉप अथवा संगणकावर परीक्षा देता येईल, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी कळविले आहे.

………
*संजय शिंदे*
जनसंपर्क अधिकारी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

रयतेच्या राजास विनम्र अभिवादन ! सर्वाना शिवजन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा 💐
19/02/2021

रयतेच्या राजास विनम्र अभिवादन ! सर्वाना शिवजन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा 💐

Address

At Balapur, Beed Bypass Road
Aurangabad

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919767804209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Matoshri Hausai Athawale Arts and Science College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Matoshri Hausai Athawale Arts and Science College:

Share