NKSPT पाथ्रीकर कॅम्पस, बदनापुर

  • Home
  • India
  • Badnapur
  • NKSPT पाथ्रीकर कॅम्पस, बदनापुर

NKSPT पाथ्रीकर कॅम्पस, बदनापुर निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित पाथ्रीकर कॅम्पस, बदनापुर (जिल्हा:जालना)

24/12/2025

पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर येथे तीन दिवसीय महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाची सांगता

पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर येथे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. देवेशभैया पाथ्रीकर यांच्या संकल्पनेतून तसेच जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय महिला सुरक्षा व स्वसंरक्षण जनजागृती कार्यक्रमाचा समारोप अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाच्या सांगता समारंभास मा. नितेश बंडगार (न्यायाधीश तथा सचिव, विधी सेवा प्राधिकरण, जालना), संजय सोनवणे (लोकल क्राईम ब्रँच, जालना तसेच महिला स्वसंरक्षण समन्वयक, जालना पोलीस), दत्ता पवार (स्वसंरक्षण प्रशिक्षक – दामिनी पथक) व रुपाली बोर्डे (महिला पोलीस) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमादरम्यान मा. नितेश बंडगार यांनी विद्यार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रिया, कायदेशीर हक्क व न्यायालयीन सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गरज भासल्यास न्यायालयीन उपायांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच संजय सोनवणे यांनी महाराष्ट्र शासन व जालना पोलीस दलाच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी “सुरक्षा मंत्र – आधुनिक जगात एक पाऊल पुढे” या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. तीन दिवसीय शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी व महिला शिक्षकांना जालना पोलीस व महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुस्तक व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यासोबतच कायदेशीर मदतीसाठी टोल फ्री क्रमांक, ऑनलाईन तक्रार नोंदणीसाठी संकेतस्थळांची माहिती देणारी माहितीपत्रके (प्रॉस्पेक्टस) वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक विद्या चित्रे मॅडम, आर्टस् सायन्स आणि कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ झाकीर पठाण सर, उपप्राचार्य श्रीनिवास मुंगे सर, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ अबीद शेख सर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयरिंगचे प्राचार्य डॉ पंकज कडू सर, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ दीपाली पवार मॅडम तसेच इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुनिल जायभाये, सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अशा प्रकारे तीन दिवसीय महिला सुरक्षा व स्वसंरक्षण जनजागृती कार्यक्रमाचा अखेरचा दिवस यशस्वीरीत्या पार पडला.

17/12/2025

निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी *आरोग्य जागृतीचा अभिनव उपक्रम* राबवला. दैनंदिन जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज जाळणे आवश्यक आहे, याची माहिती कॉलेजच्या पायऱ्यांवर फलक स्वरूपात लावून व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले.

या उपक्रमात कॉलेजमधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सक्रिय सहकार्य केले. या आरोग्य जागृती स्टेप्सची पाहणी करताना *संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेशभैय्या पाथ्रीकर सर,* व्यवस्थापन सहाय्यक सौ. विद्या चित्रे, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील जायभाये सर, डॉ. रामेश्वर पाटील सिद्धेश शेळके, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती.
सदरील हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रा. गीतेश व्यास यांचे मार्गदर्शन लाभले

15/12/2025

Sparkle the start, shine the future! 💫🎓
Welcome to the world of B. Pharmacy 🚀




15/12/2025

Aarambh of dreams, confidence & success! 🌿🎉
Welcome D. Pharmacy Freshers 💊




🔥

01/12/2025

NKSPT पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर तर्फे जागतिक एड्स विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली व पथनाट्य.
उद्देश — एड्सविषयी माहिती व प्रतिबंधाची जागरूकता.




29/11/2025

भास्कर ग्रुप आणि निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने
पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर येथे स्व. रामेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
एसपी अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते उदघाटन झाले असून ४७ दात्यांनी उत्साहाने रक्तदान केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या मनःपूर्वक सहकार्याबद्दल धन्यवाद. ❤️🩸



04/11/2025

निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयात बी. एस्सी. नर्सिंग प्रथम वर्ष 2025-26 चा ओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेशभैय्या पाथ्रीकर यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. तसेच संस्थेच्या मेडिकल युनिटच्या प्रमुख डॉ. सोनाली पाथ्रीकर (अग्रवाल), संस्थेच्या सदस्य व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. नाजमा खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

दर्जेदार शिक्षण व भविष्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये रोजगार मिळवून देण्यास कायम महाविद्यालय तत्पर राहील, अशी ग्वाही डॉ. देवेशभैय्या पाथ्रीकर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना दिली. तसेच देश विदेशात मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध असून संधीचे सोने करावे असेही आव्हान केले.

नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. दिपाली पवार यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना नर्सिंग अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमास पाथ्रीकर कॅम्पस मधील सर्व युनिट प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.



🎓 बी.एस्सी. नर्सिंग प्रवेश सूचना २०२५-२०२६ 🩺एन.के.एस.पी.टी. इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर येथे बी.एस...
18/10/2025

🎓 बी.एस्सी. नर्सिंग प्रवेश सूचना २०२५-२०२६ 🩺

एन.के.एस.पी.टी. इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर येथे बी.एस्सी. नर्सिंग (प्रथम वर्ष) प्रवेशासाठी अर्ज सुरू झाले आहेत! 🌸

📅 प्रवेश प्रक्रियेच्या सर्व महत्त्वाच्या तारखा व तपशील वरील फोटोमध्ये दिलेले आहेत.
💡 आरोग्य क्षेत्रात उज्वल करिअर घडवण्याची सुवर्णसंधी — आजच आपला अर्ज सादर करा!

📍 स्थळ: पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर (जालना)
📞 संपर्क: 8261815327, 7387953143,
8421570044

Address

Pathrikar Campus, Highway No: 06, Aurangabad-Jalna Road
Badnapur
431202

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912482261999

Alerts

Be the first to know and let us send you an email when NKSPT पाथ्रीकर कॅम्पस, बदनापुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to NKSPT पाथ्रीकर कॅम्पस, बदनापुर:

Share