11/10/2026
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत शारदानगरच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
सहा विद्यार्थी व दोन विद्यार्थिनींची विभागीय स्तरावर निवड
बारामती दिनांक ०८. १०.२०२६
शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर व डे स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध विद्यालयांमधून तब्बल150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत शारदाबाई पवार विद्यानिकेतन व डे स्कूल आणि शारदाबाई पवार इंग्लिश मीडियम
सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य, शारीरिक चपळता, संतुलन, एकाग्रता आणि शिस्तीचे प्रभावी प्रदर्शन घडवून आणले. विद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची व दोन विद्यार्थिनींची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मल्लखांबासारख्या पारंपरिक लोकप्रिय भारतीय क्रीडाप्रकारातील विविध कसरती व कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सादर केली. विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध सादरीकरण आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्य पाहून उपस्थित मान्यवर तसेच प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. त्यात खालील विद्यार्थांनी यश संपादन केले
चौदा वर्ष मुले गट
प्रथम :गाढवे वेदांत श्रीकांत
द्वितीय: बदे शंभू मुकेश
सतरा वर्ष मुली
प्रथम नागटिळक तेजस्विनी
सतरा वर्ष मुले
प्रथम: वळकुंदे शिवजीत संतोष
द्वितीय: शिंदे सुरज नामदेव
एकोणवीस वर्ष मुले
प्रथम: कोऱ्हाळे ओम शिवाजी
द्वितीय : जांबले अर्जुन उमेश
एकोणवीस वर्ष मुली
प्रथम: सरडे सान्वी लीलाधर
विशेषतः शिवजीत संतोष
वळकुंदे या विद्यार्थ्याने केलेल्या अनोख्या आणि प्रभावी खेळाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री. राजेंद्रदादा पवार, आदरणीय विश्वस्त सौ. सुनंदाताई वहिनीसाहेब, संस्थेचे पदाधिकारी आर.बी. देशमुख सर, श्री.आशिष रासकर सर, मानव संसाधन प्रमुख अभिषेक जाधवराव,क्रीडा समन्वयक श्री. सचिन शेलार मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत मुंढे सर, श्री.वाघ सर, श्री. सिंग सर, क्रीडा प्रशिक्षक सौ. पूनम जाधव, श्री. सोमनाथ कोठावळे सर तसेच संघ व्यवस्थापक श्री. थोरात सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा प्रदान केल्या.