Dr. Chandrabhanu Sonvane Jr. College, Ukkadgaon

Dr. Chandrabhanu Sonvane Jr. College, Ukkadgaon We provide CET & NEET based quality education.

स्वातंत्र्य दिन 🇮🇳
15/08/2026

स्वातंत्र्य दिन 🇮🇳

Sonvanians 2026 🏆सन २०२६ चा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उक्कडगांव कॅम्पसमधे मा.श्री.संजीव सोनवणे सरांच्या अध्यक्षतेखाली...
08/08/2026

Sonvanians 2026 🏆
सन २०२६ चा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उक्कडगांव कॅम्पसमधे मा.श्री.संजीव सोनवणे सरांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. सदर सोहळ्यासाठी कळंब विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी
मा.श्री.गणेश शिंदे साहेब. माजी पोलीस उपअधीक्षक तथा संस्थेचे विश्वस्थ मा.श्री.राजेंद्र मोरे, संस्थेचे अतिरिक्त विश्वस्थ मा.श्री.नीरज मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे सुवर्णपदक🏅देवून सन्मान करण्यात आला.

30/07/2026

Topper’s Talk या मुलाखतीदरम्यान प्रा.विशाल गरड यांनी संस्थाध्यक्ष व संस्थेविषयी सांगितलेली थोडक्यात माहिती. Sanjeev Sonvane

29/07/2026

TOPPER’s TALK with Swaraj Thorat (NEET Score - 602)

28/07/2026

🏆 TOPPER’s TALK | Exclusive Interview with NEET 2026 Topper Swaraj Thorat (NEET Score - 602)

Join us for an exclusive interview with NEET 2026 Topper Swaraj Thorat (NEET Score - 602) as he shares his preparation strategy, study routine, time management, mindset. Whether you’re preparing for NEET 2027 or aiming to improve your performance, this interview will inspire and guide you towards your goal.

🎯 Don’t miss this opportunity to learn directly from a topper!

21/07/2026

झाडी (बोरगाव), ता. बार्शी येथील कु. उदयनराजे तानाजी मोहिते यांनी NEET 2026 परीक्षेत 536 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

उदयनराजे यांचे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झाडी येथे झाले. त्यानंतर इयत्ता सहावी ते दहावीचे शिक्षण वखारिया विद्यालय, उपळे दुमाला (ता. बार्शी) येथे, तर अकरावी व बारावीचे शिक्षण सोनवणे महाविद्यालय, उकडगाव (ता. बार्शी) येथे पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्यांनी NEET परीक्षेची तयारीही याच महाविद्यालयात केली असून कोणत्याही स्वतंत्र क्लासशिवाय हे उल्लेखनीय यश संपादन केले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

या दैदिप्यमान यशाबद्दल उदयनराजे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी मिळवलेले हे यश शेतकरी कुटुंबासाठी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस तसेच उज्ज्वल आणि यशस्वी भविष्यास हार्दिक शुभेच्छा!

साभार पत्रकार Ganesh Godase 🙏🏽
21/07/2026

साभार पत्रकार Ganesh Godase 🙏🏽

21/07/2026

#सोनवणे_कॉलेजचा पालक मेळावा उत्साहात संपन्न
#बार्शी;
#उक्कडगाव ता.बार्शी येथील डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचा सन २०२६ चा पालक मेळावा उक्कडगाव कॅम्पसमधे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स.पो.नि.यशवंत घोडके होते तर पालक प्रतिनिधी म्हणून सोमनाथ दुधाळ होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष संजीव सोनवणे सरांनी भूषविले. प्रारंभीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर प्राचार्य अंकुश पांचाळ यांनी वर्षभरातील नियोजनाच्या सूचना दिल्या. घोडके यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व सांगून, मोबाईल बंदी असलेल्या कॅम्पसमधे तुमचे भविष्य लवकर घडू शकते असे सांगितले. संस्थेचे विश्वस्त राजेंद्र मोरे यांनी सर्व विद्यार्थी आमचे पाल्य समजून त्यांची काळजी घेतली जाईल असा विश्वास दिला. अध्यक्षीय भाषणात सोनवणे सरांनी नवोदित विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत करून नीट, जेईई आणि सीईटी परीक्षेसंदर्भात तयारी कशी करावी हे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.धनंजय जाधव यांनी, सूत्रसंचालन विकास कोकाटे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.विशाल गरड यांनी केले. सदर पालक मेळाव्यासाठी अशोक मैंदाड, दिपक बारकुल, तानाजी बारकुल यांसह अनेक मान्यवर पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

साभार पत्रकार सुधीर भाऊ लोमटे 🙏🏽
15/07/2026

साभार पत्रकार सुधीर भाऊ लोमटे 🙏🏽

Address

Solapur/Dhule National Highway 211
Barshi
413404

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919922402581

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Chandrabhanu Sonvane Jr. College, Ukkadgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Dr. Chandrabhanu Sonvane Jr. College, Ukkadgaon:

Shortcuts

Share