Pragati Mahila Kala Mahavidyalaya, Bhandara

  • Home
  • Pragati Mahila Kala Mahavidyalaya, Bhandara

Pragati Mahila Kala Mahavidyalaya, Bhandara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pragati Mahila Kala Mahavidyalaya, Bhandara, College & University, Bhanadara, .

02/05/2026
कु. प्राची श्रीकृष्ण आठवले(माजी विद्यार्थिनी – 2022 बॅच)कु. प्राची श्रीकृष्ण आठवले या प्रगती महिला कला महाविद्यालय, भंडा...
07/04/2026

कु. प्राची श्रीकृष्ण आठवले
(माजी विद्यार्थिनी – 2022 बॅच)
कु. प्राची श्रीकृष्ण आठवले या प्रगती महिला कला महाविद्यालय, भंडारा येथून सन 2022 मध्ये उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थिनी असून त्यांनी पुणे पोलिसमध्ये यशस्वीरीत्या प्रवेश मिळवला आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐
तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रगती महिला कला महाविद्यालय, भंडारा तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!

🎓 एकदिवसीय राष्ट्रीय परिषद🌸 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष आयोजन (९ मार्च २०२६)प्रगती महिला कला महाविद्यालय, भंडा...
20/03/2026

🎓 एकदिवसीय राष्ट्रीय परिषद
🌸 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष आयोजन (९ मार्च २०२६)
प्रगती महिला कला महाविद्यालय, भंडारा येथे ९ मार्च २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली एकदिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात व शैक्षणिक वातावरणात यशस्वीपणे पार पडली. या परिषदेत विविध महाविद्यालयांमधील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून संशोधन विषयांवर सखोल विचारांची देवाणघेवाण केली.
महिलांच्या सक्षमीकरणासोबतच ज्ञान, संशोधन आणि नवचिंतन यांचा सुंदर संगम या परिषदेच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला.
📸 या यशस्वी परिषदेचे काही संस्मरणीय क्षण…

10/03/2026

🎓 एकदिवसीय राष्ट्रीय परिषद

प्रगती महिला कला महाविद्यालय, भंडारा येथे आयोजित करण्यात आलेली एकदिवसीय परिषद उत्साहात व शैक्षणिक वातावरणात यशस्वीपणे पार पडली.

या परिषदेत विविध महाविद्यालयांमधील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून संशोधन विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली.

या यशस्वी परिषदेचे काही क्षण या व्हिडिओच्या माध्यमातून…

प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा येथे एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले आहे तरी सर्व संशोधक विद्यार्थी, प्राध...
06/03/2026

प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा येथे एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले आहे तरी सर्व संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी उपस्थित रहावे.

प्रगती महिला कला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा               प्रगती महिला समाज संस्था,भंडारा द्वारा संचालित प्रग...
17/10/2025

प्रगती महिला कला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

प्रगती महिला समाज संस्था,भंडारा द्वारा संचालित प्रगती महिला कला महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती निमित्त जागतिक विद्यार्थी दिन आणि वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला.
महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री. प्रशांतजी देशकर यांच्या मार्गदर्शनात व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात भारताचे क्षेपणास्त्र पुरुष, महान वैज्ञानिक आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारताचे 11 वे राष्ट्रपती,भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून, त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्यात आला. या प्रसंगी ग्रंथालय प्रमुख प्रा. डी. डी. चौधरी यांनीही वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद करताना, ग्रंथालयाचा वापर विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त प्रमाणात करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचलन डॉ. क्रिष्णा पासवान यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जयश्री सातोकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जी. एन. कळंबे, डॉ. ज्ञानेश्वर हिवसे, प्रा. पी. एस. देशमुख, डॉ. शिल्पा बन्सोड, श्री. संजय वानखेडे यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ च्या अंतर्गत अंतर महाविद्यालयीन महिल...
04/10/2025

प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ च्या अंतर्गत अंतर महाविद्यालयीन महिला हॉलीबॉल स्पर्धा 2025-26 चे आयोजन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. शालिक राठोड सर यांच्या विभागामार्फत करण्यात येत आहे.

प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री त्यांची जयंती महाविद्यालयात सा...
04/10/2025

प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री त्यांची जयंती महाविद्यालयात साजरी करताना

प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा येथे राष्ट्रीय सेवा योजना मार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची 25 सप्टेंबर ही जयंती अ...
25/09/2025

प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा येथे राष्ट्रीय सेवा योजना मार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची 25 सप्टेंबर ही जयंती अंतोदय दिन म्हणून महाविद्यालयात साजरी करण्यात आली.

प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन महाविद्यालयामध्ये साजरा करताना ही काही क्षणचित्रे
24/09/2025

प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन महाविद्यालयामध्ये साजरा करताना ही काही क्षणचित्रे

Address

Bhanadara

441904

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pragati Mahila Kala Mahavidyalaya, Bhandara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Pragati Mahila Kala Mahavidyalaya, Bhandara:

  • Want your university to be the top-listed University?

Share