19/06/2018
काल दिनांक १८/०६/२०१८ रोजी आगरवाडी , चाकण येथे "स्वर्गीय शिवाजीराव बाबुराव जाधव" प्रतिष्ठान संचालित गॅलॅक्सि इंटरनॅशनल स्कूल चा ओपनिंग डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली . या वेळी स्वर्गीय शिवाजीराव बाबुराव जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उदघाटनाचा कार्यक्रम लक्ष्मीबाई विठ्ठल जाधव व कुंदा शिवाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी "श्री संदीप विठ्ठल जाधव" होते.
श्री बबन पाटील व श्री दत्ता जाधव यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे पदी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी प्रतिष्ठानाचे आधारस्तंभ श्री राजेश जाधव यांनी शाळेच्या येणाऱ्या काळातील वाटचाली व आता पर्यंत करण्यात आलेल्या कामाची माहिती या संधर्भात आलेल्या सर्व पालक वर्गाला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्थावना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री म्हसे सर यांनी केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन भोसले सर यांनी सूत्र संचालन केले व शाळा आपल्या पाल्याला कसा घडवणार आहे याची रूपरेषा सांगताना वर्षभरात आपल्याला आपल्या मुलामुलींमधील फरक जाणवण्यास सुरुवात होईल असे सांगितले . ऍडमिनिस्ट्रेटिव्ह श्री पाटील सर यांनी उपस्थित पालक वर्गाला संबोधित करताना आपले पाल्य हे आपल्या शाळेतून सर्वांगीण विकसित होऊन बाहेर पडेल या साठी प्रतिष्ठान कटिबद्ध आहे याचा पुनरुच्चार केला. श्री मनिष शिवाजी जाधव यांनी पालक वर्गाला संबोधित करताना कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरीही प्रतिष्ठान पालक वर्ग व विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. सौ ऐश्वर्या मनिष जाधव यांनी दंत तपासणीची रूपरेषा सांगितली.
अध्यक्षीय भाषणात श्री संदीप विठ्ठल जाधव यांनी जाधव कुटुंबियांवर व प्रतिष्ठानावर पालकवर्गाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. या वेळी कॉन्ट्रॅक्टर श्री दत्ता जाधव यांनी अत्यंत कमी वेळात शाळेची इमारत पूर्ण करण्यात सिंहांचा वाटा उचलल्या बद्दल त्यांचा सत्कार श्री संदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. पालक वर्गातील श्री इंगळे व श्री पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौ राजश्री राजेश जाधव यांनी झालेल्या गोड ओपनिंग डे बद्दल, उपस्थित पालक वर्ग, विध्यार्थी , प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे या सर्वांचे आभार मानले.