Pimpri Chinchwad Science Park

Pimpri Chinchwad Science Park A non-formal institution to learn science. Set up by Pimpri Chinchwad Municipal Corporation, in association with the National Council of Science Museums.

Pimpri Chinchwad Science Park (PCSP), inaugurated on February 8, 2013 is a unique, non-formal science learning centre in the industrial township of Pimpri Chinchwad. The Science Park was set up with a capital cost of Rs. 850 lakhs, shared equally by Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and the Government of India. PCMC also provided approximately 7 acres of land for setting up the project

, and the Science Park was developed under the joint auspices of the National Council of Science Museums (NCSM) and Pimpri Chinchwad Municipal Corporation. The Science Park, with a built-up area of approximately 4000 sq. m., houses three permanent galleries, a temporary exhibition hall, an inflatable-dome planetarium, a science demonstration area, an activity corner, an auditorium, a 3D science show facility, a library cm conference hall, and a workshop for maintenance and development of exhibits. Pimpri-Chinchwad Science Park is registered as a non-profit institution under Section 25 of the Companies Act 1956.

*२६ वा स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव*✨🎶🎭पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन तर्फे पिंपरी - चिंचवडकरांसाठी २६ व्या ' स्वरसागर सांस्...
03/11/2024

*२६ वा स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव*
✨🎶🎭

पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन तर्फे पिंपरी - चिंचवडकरांसाठी २६ व्या ' स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव ' अंतर्गत *ग. दि. माडगूळकर सभागृह, आकुर्डी* येथे दिवाळी सुट्टीनिमित्त विशेष *सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी*

दिवाळीची सुट्टी, मराठी रंगभूमी दिन तसेच स्व. श्री. पु. ल. देशपांडे यांची जयंती अशा प्रसंगांचे औचित्य साधून ०५ नोव्हेंबर ते ०७ नोव्हेंबर दरम्यान ग. दि. माडगूळकर सभागृह, आकुर्डी येथे 'स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे.

*हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे.*

तरी, पिंपरी - चिंचवड, पुणे व लगतच्या रसिक-श्रोत्यांनी या अनोख्या सांस्कृतिक दीपोत्सवाचा सहकुटुंब लाभ घ्यावा.

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे दिवाळीनिमित्त अनोख्या वैज्ञानिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी १९-२० ऑक्टोब...
30/10/2024

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे दिवाळीनिमित्त अनोख्या वैज्ञानिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

१९-२० ऑक्टोबर या दोन दिवसांत तब्बल ८००० प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेले विज्ञान भारती पश्चिम विभाग व इसरो च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ' इसरो - स्पेस ऑन व्हील्स ' हे प्रदर्शन लोकाग्रहास्तव पुन्हा २८ ऑक्टोबर पासून ३१ ऑक्टोबर पर्यंत, व ०३ नोव्हेंबर पासून ०५ नोव्हेंबर पर्यंत सज्ज राहणार आहे. तसेच दिवाळीनिमित्त ' पर्यावरणपूरक किल्ले बनवा ' स्पर्धेचे आयोजन केले असून ३१ ऑक्टोबर पासून ०७ नोव्हेंबर पर्यंत यांचे प्रदर्शन असणार आहे. ही दोन्ही प्रदर्शने सायन्स पार्कला भेट देणाऱ्या प्रेक्षकांसाठी खुली असतील.
३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग व पिंपरी चिंचवड सायन्स पार्क तर्फे आयोजित विज्ञान व्याख्यान, तसेच स्वरसागर तर्फे सौ. प्राजक्ता ठकार यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम विज्ञान तसेच संगीतप्रेमींसाठी खुला असणार आहे.
०२ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२:०० ते ०४:०० या वेळेत भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ ' कलामांच्या स्वप्नातील भारत ' ही वाचनस्पर्धा सर्व वाचनप्रेमींसाठी खुली असणार आहे. ०३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०६:०० वाजता श्री हेमंत मोने लिखित, दिग्दर्शित ' सूर नभांगणाचे ' या खास सुरेल मैफिलीचा लाभ रसिकांना घेता येईल. हे कार्यक्रम सायन्स पार्कच्या प्रांगणात होणार आहेत.

' कलामांच्या स्वप्नातील भारत ' वाचनस्पर्धा -
भारतीय जनमानसाचे लाडके व्यक्तिमत्व, माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या वाचन स्पर्धेचे नियम व अटी वेबसाईट वर देण्यात आले आहेत.
तरी, जास्तीत जास्त वाचनप्रिय नागरिकांनी यात सहभाग घेऊन त्यांचे भारतीयांसाठी तसेच भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे विचार इतर समविचारींसमोर सादर करावे व त्यांनी पेटवलेल्या प्रेरणेच्या ज्योतीला पुढे न्यावे हा यामागील हेतू आहे.

(महत्त्वाचे - ०१ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन निमित्त वर नमूद केलेली प्रदर्शने तसेच सायन्स पार्क व तारांगण बंद राहील. या व्यतिरिक्त दिवाळीच्या सुट्ट्यांत सायन्स पार्क व तारांगण नियमित सुरू राहील याची कृपया नोंद घ्यावी.)

तरी, पिंपरी - चिंचवड, पुणे व लगतच्या विज्ञानरसिकांनी या अनोख्या वैज्ञानिक दीपोत्सवाचा सहकुटुंब लाभ घ्यावा.

(अधिक माहितीसाठी स. १०:०० ते सायं. ०६:०० या कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. संपर्क : ७७४४९ ४४३३३)

इस्त्रो आपल्या भेटीला'स्पेस ऑन व्हिल्स' पश्चिम महाराष्ट्रात दाखल; १९-२२ ऑक्टोबर दरम्यान पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व रहा...
18/10/2024

इस्त्रो आपल्या भेटीला
'स्पेस ऑन व्हिल्स' पश्चिम महाराष्ट्रात दाखल; १९-२२ ऑक्टोबर दरम्यान पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व रहाटणी मधील एस एन बी पी शाळेमध्ये असणार आहे.

भारतीयांचा स्वाभिमान असलेली भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) आपल्या भेटीला येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांना 'स्पेस ऑन व्हिल्स’ या उपक्रमांतर्गत इस्त्रोच्या आजवरच्या पराक्रमांची रोमांचकारी सफर अनुभवता येणार आहे. विज्ञान भारती (VIBHA) आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पेस ऑन व्हील्स’ हा विशेष विज्ञान प्रचार उपक्रमाची १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पुण्यात उत्साहात सुरूवात झाली आहे. १९ व २० ऑक्टोबर, या शनिवार व रविवारी 'स्पेस ऑन व्हिल्स’ पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे विज्ञान रसिकांसाठी स. १०:०० ते सायं. ०६:०० या वेळेत सज्ज असणार आहे.
त्यानंतर दिनांक २१-२२ तारखांना, रहाटणी मधील एस एन बी पी शाळेमधील तसेच परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा लाभ होणार आहे.

उपक्रमात नक्की काय -
‘स्पेस ऑन व्हील्स' कार्यक्रमासोबतच, विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची आणि कल्पकतेची परीक्षा घेण्यासाठी प्रश्नमंजुषा आयोजित केल्या जातील. ह्याचे आयोजन संबंधित यजमान संस्थेच्या सहकार्याने होईल.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
- अंतराळ संशोधनाची ओळख: इस्रोच्या यशस्वी मोहिमांचे प्रतिकृती मॉडेल्स आणि संबंधित माहिती.
- शैक्षणिक उपक्रम: विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव देणारे क्रियाकलाप आणि स्पर्धा.
- सर्वांसाठी खुला प्रवेश: हा उपक्रम विद्यार्थ्यांसह शिक्षक, विज्ञान प्रेमी आणि नागरिकांसाठी खुला आहे.

हा उपक्रम विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या समन्वयाने राबवला जात आहे.
~~~~~~
Vijnana Bharati and ISRO's 'Space on Wheels' to visit Pimpri Chinchwad Science Park and Planetarium This Weekend

Space on Wheels will be ready for the enthusiasts to visit at Pimpri Chinchwad Science Park and Planetarium on 19th and 20th October 2024, (this Saturday and Sunday), from 10:00 am to 06:00 pm. Later the bus will available at SNBP school Rahatani, for school students and parents.

Along with the 'Space on Wheels' exhibition, there will be a science exhibition for students, and several competitions will be organized to test their knowledge and creativity. All these activities will be held in collaboration with the host institution.

Key Features of the Program:
- Interactive Space Exhibits: Display models and information from ISRO’s key missions.
- Educational Activities: Practical learning experiences, along with various competitions.
- Open to All: The exhibition is open to students, educators, and the general public.

This activity is being coordinated by Vijnana Bharati Paschim Maharashtra unit.

VIJNANA BHARATI विज्ञान भारती (Western Maharashtra) ISRO - Indian Space Research Organisation

जागतिक पर्यटन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण तर्फे खास ३ दिवसीय कार्यक्रम 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान जा...
26/09/2024

जागतिक पर्यटन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण तर्फे खास ३ दिवसीय कार्यक्रम

27 ते 29 सप्टेंबर दरम्यान जागतिक पर्यटन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण तर्फे खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहा या वेळात होणाऱ्या विविध कार्यक्रमांत पुढील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
* छायाचित्र प्रदर्शन - भारतीय वारसा स्थळे, छायाचित्रकार: श्री तुषार कोडोलिकर, 27, 28 व 29 सप्टेंबर 2024, स. 10:30 ते सायं. 05:30
* तज्ञांची व्याख्याने - दु. 04:00 ते 05:30
- भारतीय वारसा स्थळे, दुर्गभ्रमंती व पर्यटन, वक्ते: श्री अनुराग वैद्य, श्री विनायक बेलोसे, 27 सप्टेंबर (शुक्रवार)
- नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरील पक्षी: निरीक्षण, पर्यटन आणि संवर्धन, वक्ते: श्री सुशांत पवार - 28 सप्टेंबर (शनिवार)
- विज्ञान भागीरथीचे भगीरथ, वक्ते: श्री विठ्ठल रायगावकर - 29 सप्टेंबर (रविवार)

27 तारखेला खास शालेय विद्यार्थांसाठी ‘ गिरिदुर्ग व स्थापत्य शास्त्र दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व ‘ या विषयावरील आंतरशालेय स्पर्धा देखील होणार असून अनेक शाळांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

विविध नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या, अनेक वारसा स्थळे जपणाऱ्या आपल्या देशात पर्यटन करताना जागरूक व जबाबदार पर्यटक कसे व्हावे याबद्दल या कार्यक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे. पर्यटनाची आवड असणारे नागरिक, तसेच शाळांनी हा दिवस साजरा करण्यात उत्स्फूर्ततेने सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. सदरच्या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश राहील.

अधिक माहितीसाठी सोबत जोडलेली माहितीपत्रके पाहावीत.
तसेच, आपल्या संपर्कातील हौशी प्रवासप्रेमी, इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी, पक्षीप्रेमी, छायाचित्रकार आदी मंडळींपर्यंत ही माहिती पोहचविण्यास आम्हाला सहकार्य करावे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Pimpri Chinchwad Science Park and Planetarium has organised a 3 day event in the light of World Tourism Day 2024, from 27th to 29th September (Friday - Sunday).

All are cordially invited to visit the same.

Programme
* Indian Heritage Sites - Photography Exhibition by Tushar Kodolikar (Venue: Tarangan Basement, Dates: 27-29 September, Time: 10:30 am - 05:30 pm)
* Interschool storytelling competition - Topic: Hill-Forts and their Architectural Importance (Venue: PCSP Auditorium, Date: 27 September, Time: 12:30 am - 03:30 pm)
* Expert Talk 1 - Title: Indian Heritage, Trekking and Tourism by Anurag Vaidya and Vinayak Belose (Venue: PCSP Auditorium, Date: 27 September, Time: 4:00 pm - 05:30 pm)
* Expert Talk 2 - Title: Birds on the Brink - Watching, Travelling and Conserving (Venue: Tarangan Auditorium, Date: 28 September, Time: 4:15 pm - 05:30 pm)
* Expert Talk 3 - Title: Vidnyan Bhagirathiche Bhagirath (Venue: Tarangan Auditorium, Date: 29 September, Time: 4:30 pm - 06:00 pm)

Please see the posters attached for the details.
Do not forget to share the same with fellow travelers, bird-watchers, trekkers, history lovers and photographers.

Greetings!In the video series - "Exhibit of the Week" by Pimpri Chinchwad Science Park and Planetarium, today we will le...
15/09/2024

Greetings!
In the video series - "Exhibit of the Week" by Pimpri Chinchwad Science Park and Planetarium, today we will learn about Xylophone.
Do watch.
Also, do not forget to Like, Subscribe and Share.
https://youtu.be/epXOdzlbDCQ?si=TN3mlxRPFzlE-TwP
Thank you!

Pimpri Chinchwad Science Park and Planetarium is happy to introduce a new video series - "Exhibit of Week".In this series, the viewers will get a few glimpse...

नमस्कार!आज पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण च्या "Exhibit of the Week" या व्हिडिओ सिरीज मध्ये आज आपण काष्ठतरंग बद्दल...
15/09/2024

नमस्कार!
आज पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण च्या "Exhibit of the Week" या व्हिडिओ सिरीज मध्ये आज आपण काष्ठतरंग बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
नक्की पहा.
Like, Subscribe आणि Share देखील करायला विसरू नका.
https://youtu.be/nBw-C5CWpGc
धन्यवाद!

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण तर्फे नवीन व्हिडिओ मालिका - "एक्झिबिट ऑफ वीक" सादर करताना आम्हाला आनंद होत आह.....

Greetings!In the video series - "Exhibit of the Week" by Pimpri Chinchwad Science Park and Planetarium, today we will le...
08/09/2024

Greetings!

In the video series - "Exhibit of the Week" by Pimpri Chinchwad Science Park and Planetarium, today we will learn about DNA.

Do watch.
Also, do not forget to Like, Subscribe and Share.

https://youtu.be/3BhaW9AkB5E

Thank you!

Pimpri Chinchwad Science Park and Planetarium is happy to introduce a new video series - "Exhibit of Week".In this series, the viewers will get a few glimpse...

नमस्कार!आज पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण च्या "Exhibit of the Week" या व्हिडिओ सिरीज मध्ये आज आपण डी. एन. ए. बद्द...
08/09/2024

नमस्कार!

आज पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण च्या "Exhibit of the Week" या व्हिडिओ सिरीज मध्ये आज आपण डी. एन. ए. बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

नक्की पहा.
Like, Subscribe आणि Share देखील करायला विसरू नका.

https://youtu.be/tUR36y1oWgE

धन्यवाद!

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण तर्फे नवीन व्हिडिओ मालिका - "एक्झिबिट ऑफ वीक" सादर करताना आम्हाला आनंद होत आह.....

नमस्कार!आज पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगणच्या "Exhibit of Week" या व्हिडिओ सिरीज मध्ये आज आपण थोडक्यात माहिती घेणा...
01/09/2024

नमस्कार!

आज पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगणच्या "Exhibit of Week" या व्हिडिओ सिरीज मध्ये आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत 'ज्येष्ठ भारतीय खगोलशास्त्रज्ञ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर' यांची.

नक्की पहा.
Like, Subscribe आणि Share देखील करायला विसरू नका.

https://youtu.be/zr5pcQdXnD4

धन्यवाद!

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण तर्फे नवीन व्हिडिओ मालिका - "एक्झिबिट ऑफ वीक" सादर करताना आम्हाला आनंद होत आह.....

Greetings!In the video series - "Exhibit of Week" by Pimpri Chinchwad Science Park and Planetarium, today we will learn ...
01/09/2024

Greetings!

In the video series - "Exhibit of Week" by Pimpri Chinchwad Science Park and Planetarium, today we will learn about 'Senior Indian Astronomer - Dr Jayant Vishnu Narlikar'.

Do watch.
Also, do not forget to Like, Subscribe and Share.

https://youtu.be/7JOKAfaEL4Q

Thank you!

Pimpri Chinchwad Science Park and Planetarium is happy to introduce a new video series - "Exhibit of Week".In this series, the viewers will get a few glimpse...

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे ०१ सप्टेंबर २०२४, रविवार रोजी विशेष कार्यक्रम सर्व विज्ञान तसेच संगीत रसिकांचे या कार्यक...
31/08/2024

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे ०१ सप्टेंबर २०२४, रविवार रोजी विशेष कार्यक्रम
सर्व विज्ञान तसेच संगीत रसिकांचे या कार्यक्रमास हार्दिक स्वागत आहे.
वेळ - आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन व समीक्षा : ०४:३० - ०६:३०
कथक नृत्योन्मेष : ०७:०० - ०८:००
स्थळ - पिंपरी चिंचवड सायन्स पार्क सभागृह
(अधिक माहितीसाठी सोबत दिलेले माहितीपत्रक वाचावे.)

Address

In Front Of PCMC Auto Cluster
Chinchwad
411019

Opening Hours

Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

020 27454050

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pimpri Chinchwad Science Park posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Pimpri Chinchwad Science Park:

Share