Yash English Academy CBSE School & Jr. College of Science

Yash English Academy CBSE School & Jr. College of Science YEA

27/01/2026

Young Minds • Big Ideas 🤩🤩

27/01/2026

Proud to Present, Ready to Lead....

27/01/2026

Students lead conference

27/01/2026

Proud moments at Yash English Academy ✨
Our Students’ Lead Conference (26th January) where students confidently presented subject projects, charts & working models.
Learning led by students, supported by parents and teachers 👏📚

27/01/2026

Students’ Lead Conference was successfully held at Yash English Academy on 26th January. The event was inaugurated by parents in the presence of Chairman Dr. Santosh Paranjape, Principal Dr. Radha Mhaddalkar, Yash Mhaddalkar Sir, Vice Principal Mrs. Deepti Kulkarni, teachers, and parents. Students confidently presented subject-wise projects, charts, and working models, making the conference meaningful and inspiring.

27/01/2026

Students’ Lead Conference at Yash English Academy
Yash English Academy successfully organized the Students’ Lead Conference on 26th January, fostering confidence, creativity, and leadership among students. The conference was inaugurated by parents, making the event more meaningful and encouraging student ownership.
The program was graced by the presence of Chairman Dr. Santosh Paranjape, Principal Dr. Radha Mhaddalkar, Yash Mhaddalkar Sir, Vice Principal Mrs. Deepti Kulkarni, along with all respected teachers and parents.
Students showcased their learning through various subject-wise projects, including working models, charts, and creative presentations. Each project reflected students’ understanding, innovative thinking, and communication skills.
The Students’ Lead Conference proved to be a wonderful platform where students confidently explained their work, parents actively participated, and learning truly came alive—making the event a grand success.

My students… 🇮🇳Learning patriotism beyond textbooks,building courage beyond fear,and strengthening minds and bodies like...
26/01/2026

My students… 🇮🇳
Learning patriotism beyond textbooks,
building courage beyond fear,
and strengthening minds and bodies like true soldiers.
Today’s discipline is tomorrow’s defense.
Proud to shape responsible citizens of our nation.

🎄✨ Christmas Celebration at Yash English Academy ✨🎄Today, Yash English Academy was filled with the true spirit of Christ...
24/12/2025

🎄✨ Christmas Celebration at Yash English Academy ✨🎄
Today, Yash English Academy was filled with the true spirit of Christmas—joy, love, sharing, and togetherness. The entire campus came alive with festive decorations, cheerful smiles, and an atmosphere of happiness as our students and teachers came together to celebrate this beautiful festival.
The celebration reminded us of the values that Christmas stands for—kindness, compassion, gratitude, and spreading happiness. Students enthusiastically participated in various activities, enjoyed the festive moments, and shared laughter with their friends and teachers. The joyful energy and innocence of our students made the celebration even more special and memorable.
Such celebrations help in nurturing cultural values, unity, and a sense of belonging among students. Today’s event was not just a celebration, but a moment to create lifelong memories and strengthen the bond of our school family.
May this Christmas bring peace, love, and prosperity to everyone. Wishing all our students, parents, and staff a Merry Christmas and a Happy New Year!

🇮🇳 यश इंग्लिश अकॅडमी सीबीएसई स्कूलसाठी अभिमानाचा क्षण! 🇮🇳आमच्या शाळेच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी मास्त. शिवम संजय सुर...
24/12/2025

🇮🇳 यश इंग्लिश अकॅडमी सीबीएसई स्कूलसाठी अभिमानाचा क्षण! 🇮🇳
आमच्या शाळेच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी मास्त. शिवम संजय सुरवे याने NCC ‘B’ प्रमाणपत्र परीक्षा – 2025 मध्ये Grade ‘A’ (AAA) मिळवत उत्तीर्ण होऊन शाळेच्या नावाला उज्ज्वल यश मिळवून दिले आहे.
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली घेण्यात आलेल्या या परीक्षेत मिळवलेले हे यश त्याच्या शिस्त, मेहनत, आत्मविश्वास व देशसेवेच्या भावनेचे प्रतीक आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शिवमचे मनःपूर्वक अभिनंदन! त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
यश इंग्लिश अकॅडमी सीबीएसई स्कूलला तुझा अभिमान आहे.
जय हिंद! 🇮🇳


21/12/2025

Read & Realised ..it must ..we are experiencing the same .🙏🙏🏻

मेंदू कुजतोय! - डोपामिनच्या जाळ्यात अडकलेली पंधरा सेकंदाच्या बंधिस्त जगातील 'ब्रेन रॉट' पिढी.

मिलेनियल्स, जेंझी, अल्फा जनरेशन नंतर ऑक्सफर्ड डिक्शनरीने एक नवीन शब्द आणलाय "ब्रेन रॉट" जनरेशन.
"अधाश्यासारखे इंस्टाग्राम, टिकटॉक, युटूबवरील पंधरावीस सेकंदाच्या रिल्स तासंतास पाहून झोंबीसारखे त्याच्या आहारी जाऊन स्वतःचा मेंदू कुजवून घेणारी पिढी" हा ब्रेन रॉट या शब्दाचा अर्थ होतोय. चार वर्षाच्या लेकरापासून ते सत्तर वर्षांचे म्हातारे, मिलेनियल्स, जेंझी, अल्फा हे आता ब्रेन रॉटचे झोंबी झालेत. ऑक्सफर्ड डिक्शनरीने तर या शब्दाला २०२४ मधील "word of the year " म्हणून घोषित केला.
कामावरून बसने-कारने घरी जाणारी मिलेनियल्स, गावभर उंडारत फिरणारी झेंजी, नाहीतर काहीच काम नाही म्हणून निवांत बेडवर सोफ्यावर लोळत पडणारी अल्फा, सगळी पिढी आता फक्त ब्रेन रॉट झाली आहे. रिल्स स्क्रोल करून - करून आता कुठंतरी थांबावं, पण नाही. जरा मोबाईलच्या स्क्रीनवरून बोटं बाजूला झाली कि मेंदूतून जोराची सनक येतेय, समोर दिसेल त्याच्यावर चिडचिड होतेय "झोंबी स्क्रोलिंग". एवढा वेळ डोळ्यांची दिवाळी आणि मेंदूचा भुगा करून काहीच कसं मिळालं नाही याची अजूनच सणक येत असेल तर अभिनंदन तुम्ही तुमची एक नवीनच पिढी तयार केली आहे
आणि हो तुमच्यासारखे असे लाखोजण तुमच्या आजूबाजूला सोशल मीडियाचे रक्तपिपासू झोंबी आहेत "ब्रेन रॉटस"
सुरवातीला या शब्दला विरोध झाला अशी काही पिढी अस्तित्वातच नाही त्यामुळे हा शब्द माघारी घ्या म्हणून लोकांनी आवाज उठवला. पण कोंबड झाकलं म्हणून दिवस उगवायचा थांबत नाही या म्हणीप्रमाणे ऑस्ट्रेलियातील काही संशोधकांनी सुमारे एक लाख लोकांच्यावर मानसिक कसोटीच्या आधारवर प्रयोग आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन ब्रेन रॉट अस्तित्वात आहे हे सिद्ध केले. अगदी दोन आठवड्यापूर्वी त्यांनी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये आपले संशोधन प्रसिद्ध केले आणि मग जगभरतील मीडिया जागी झाली, या पिढीच्या अस्तित्वाला विरोध करणारे नास्तिक अचानक पुन्हा ब्रेन रॉटचे आस्तिक झाले. हे संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणतायत ब्रेन रॉट फक्त एक मानसिक रोग नसून त्याच्याहीपुढ निघून गेला आहे जो आता एक शारीरिक दुष्परिणाम झाला आहे ज्याला डॉक्टर "न्यूरोकॉग्निटिव सिंड्रोम" असं म्हणतात जो मेंदूपेशींचे आतून नुकसान करतोय.
या सगळ्याच्या मागे एकच केमिकल लोचा आहे तो म्हणजे "डोपामिन" तो नाद लावतोय, नवीन काहीतरी बघा, पुढं जावा अजून स्क्रिनवर बोटं फिरवा मग मी तुम्हाला आनंदी ठेवेन, तेच ते बघत राहिलात तर तो आनंद कमी करेन.
डोपामिन आपल्याला म्हणतं: “काहीतरी नवीन बघ… अजून बघ… अजून स्क्रोल कर… मी तुला लगेच आनंद देतो.” पंधरावीस सेकंद करत करत पुढं तासंतास डोकं त्यामध्ये गुरफटून जातेय आणि
शेवटी उरतोय रिकामपणा.... डोकं सुन्न करणारा. !!!!
मग हा मेंदूचा “रिवार्ड सिस्टम” डोपामिन ओव्हरलोड होतोय, आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी मेंदूमधील डोपामिन रिसेप्टर कमी करतो. डोपामिन वारंवार वाढल्यामुळे मेंदूतील काही भाग सतत उत्तेजित राहतोय, सारखी सारखी उत्तेजना पाहिजेय त्याला, मग त्या उत्तेजनेच्या नादात एकाग्रता, निर्णय घेणे (Prefrontal cortex ) रोजच्या सवयी (Striatum) यांचा लय बिघडतोय आणि मग पुन्हा मेंदूच्या सर्किट्सवर ताण येतोय आणि आपले लक्ष एखाद्या कामावरून कमी होतेय. मग हे आशाळलेले मन मेंदूकडे अजून डोपामिनची मागणी करतेय.
विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर मेंदूमध्ये डोपामिन मुख्यतः मिडब्रेनमध्ये तयार होते त्यानंतर त्याला सुरक्षित पॅकेजमध्ये ठेवून सिनॅप्समध्ये सोडली जातात. सिनॅप्स हा एक जंक्शन आहे जिथे एक न्युरॉनने दुसऱ्या न्युरॉनशी संवाद साधतो, जेणेकरून मेंदूचा संदेश दुसऱ्या न्यूरॉन्सपर्यंत पोहोचेल. पुढे अति झालेलं डोपामिन transporters आणि एंझाइम्सद्वारे metabolize केलं जात म्हणजे हे होताना काही प्रमाणात reactive oxygen species (ROS) तयार होतात, जे जर जास्त झाले तर पेशींना oxidative stress होऊ शकतो. या नादात मेंदूच्या पेशींमध्ये ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढतो हा केमिकल स्ट्रेस म्हणजे पेशींमध्ये मोकळी फिरणारी विषारी रसायने, जी त्या पेशींना आतून वाळवीसारखे पोखरतात. हा मेंदूच्या पेशींमधील स्ट्रेस सारखाच वाढत राहिला तर पेशींची न भरून येणारी हानी होतेय या मेंदूपेशींना हा स्ट्रेस डॅमेज करायला सुरवात करतो. अशी स्थिती फक्त अत्यधिक किंवा pathological dopamine activity मध्ये होते, जसे की काही ड्रग्स वापरल्यास किंवा dopamine नियमन बिघडल्यास. हाच बिघडलेला डोपामिन पुढे जाऊन तो पेशींच्या प्रोटीन, DNA आणि ऊर्जा केंद्रांवर हल्ला करतो आणि मग जगण्यासाठी पेशींना जास्तीचा ऑक्सिजन वापरायला भाग पडतो. त्यातून सतत ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढू लागल्यास न्यूरॉन्स नीट काम करत नाहीत किंवा मरतात, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता कमी होते, मानसिक थकवा, चिंता, डिप्रेशन आणि अल्झायमर, पार्किन्सन सारखे न्यूरोडीजेनेरेटिव आजार होऊ शकतात.
खरेतर बाबा आमटे म्हणाले होते “देश उभा करायला आणि बुडती नाव वाचवायला समुद्रात झोकून देणारे कॅप्टन हवे असतात.” हे कॅप्टन अंगमेहनती असले पाहिजेत, तासंतास एकाग्रचित्त होऊन वाचन करणारे अभ्यास करणारे विचारवंतअसले पाहिजेत. रात्रदिवस प्रयोगशाळेत प्रयोग करणारे शास्त्रज्ञच जपान-जर्मनीसारखे बेचिराख झालेले देश राखेतून उभा करू शकतात. पण आमचे जेंझी आणि अल्फा ज्यांच्यावर मिलनियल्सच्या म्हातारपणाच्या अपेक्षा आहेत त्यांची एकाग्रता पंधरा सेकंदावर आली आहे. आता पुढच्या पिढीतून कुठले अब्दुल कलाम आणि सीव्ही रामन...!!!
याच पिढीच्या खांद्यावर पुढचा देश, पुढचं विज्ञान, पुढचं तंत्रज्ञान उभं राहणार आहे. आणि हि पिढी कुठाय?
१५ सेकंदांच्या जगात बंदिस्त......
"अंगमेहनती लोक, सतत शिकणारे, वाचन करणारे, प्रयोग करणारे, विचार करणारे" जपान-जर्मनी राखेतून उभे राहिले ते अशा लोकांच्या कष्टांवर.
या पंधरा सेकंदाच्या व्यसनामुळं शास्त्रज्ञांना असं दिसून येतेय एक पिढीचं सामाजिक जीवनातून एकांतपणा घेतेय. कमी जीवन समाधान, आत्मसन्मान कमी, स्वतःच्या प्रतिमेबद्दल चिंता, नीट झोप न येणे, चिंता आणि एकटेपणा यांसारखे नकारात्मक परिणाम या ब्रेन रॉट पिढीमध्ये वाढतायत. पंधरा सेकंदांच्या जगात बंदिस्त असलेली ही पिढी तरी बदलू शकते; स्वतःला डिजिटल व्यसनापासून दूर ठेवून, एकाग्रता जपून, सतत शिकत राहून आणि विचार करून मेंदूला शांत होण्याची कला शिकवणारीच पिढी पुढील अब्दुल कलाम, सी.व्ही. रामन तयार करू शकते.

नाहीतर तुम्हाला माहित आहे का मेंदूचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे जो आजपर्यंत कोणताच शास्त्रज्ञ सोडवू शकला नाही....
"The brain loves the stimulation but struggles with the comedown"
मेंदूला उत्तेजना खूप आवडते, पण त्यानंतर शांत होणे त्याला कठीण जाते.

पंधरा सेकंदाच्या बंदिस्त जगातील ब्रेन रॉट "झोंबी स्क्रोलिंग" पिढी आता या मेंदूच्या जाळयात अडकत चालली आहे.

Dr-Nanaso Thorat

🌹🌹🌹

Address

Kapila Park, Bahadurshaikh Naka, Radhakrishna Nagar, Near Muttapan Mandir
Chiplun
415604

Opening Hours

Monday 8:30am - 2:30pm
Tuesday 8:30am - 2:30pm
Wednesday 8:30am - 2:30pm
Thursday 8:30am - 2:30pm
Friday 8:30am - 2:30pm
Saturday 8:30am - 2:30pm

Telephone

+918390613585

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yash English Academy CBSE School & Jr. College of Science posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Yash English Academy CBSE School & Jr. College of Science:

Share