College of Advanced Studies

College of Advanced Studies LOCATION: B K L WALAWALKAR HOSPITAL DIAGNOSTIC AND RESEARCH CENTER CAMPUS, DERVAN, TAL: CHIPLUN, DIST: RATNAGIRI, MAHARASHTRA, INDIA- 415606

*SVJCT's College of Advanced Studies, Dervan, Chiplun, District Ratnagiri.*Admissions open:  For vacant seats.*Advanced ...
01/08/2023

*SVJCT's College of Advanced Studies, Dervan, Chiplun, District Ratnagiri.*
Admissions open: For vacant seats.
*Advanced Diploma in Medical Laboratory Technology*
Affiliated to Maharashtra State Board of Technical Education (MSBTE), Mumbai.
*Duration*: 1 year + 6 months.
*Eligibility*: B.Sc in Zoology, Microbiology, Chemistry, Biotechnology, Biochemistry, Botany, BPMT, BMLT etc
Apply using following link
https://forms.gle/ek7TYr4TJzcCtfft8

Access Google Forms with a personal Google account or Google Workspace account (for business use).

Proud to announce, Syllabus of certificate course in Anesthesia Technician, designed by me approved and introduced by Ma...
09/12/2021

Proud to announce, Syllabus of certificate course in Anesthesia Technician, designed by me approved and introduced by Maharashtra University of Health Sciences, Nasik.
Online admissions for courses after 12th Science.
1) Certificate course in Radiography Technology,
2)Certificate course in respiratory therapist,
3) Certificate course in ECG technician.
4) Certificate course in Anesthesia Technician
Contact Mr. Gautam Tendulkar +919922744351, +918956067743.

Link for application is ......

http://intranet.muhs.ac.in/admission_fcc_application_form.aspx
Last date to apply online is 30/12/2021

Online admissions for courses after 12th Science.1) Certificate course in Radiography Technology, 2)Certificate course i...
12/01/2021

Online admissions for courses after 12th Science.
1) Certificate course in Radiography Technology,
2)Certificate course in respiratory therapist,
3) Certificate course in ECG technician.
Contact Mr. Gautam Tendulkar +919922744351, +918956067743.
Link for application is ......

http://intranet.muhs.ac.in/admission_fcc_application_form.aspx
Last date to apply online is 20/01/2021

Online admissions for courses after 12th Science.1) Certificate course in Radiography Technology, 2)Certificate course i...
12/01/2021

Online admissions for courses after 12th Science.
1) Certificate course in Radiography Technology,
2)Certificate course in respiratory therapist,
3) Certificate course in ECG technician.
Contact Mr. Gautam Tendulkar +919922744351, +918956067743.
Link for application is ......

http://intranet.muhs.ac.in/admission_fcc_application_form.aspx
Last date to apply online is 20/01/2021

Academic Year 2020-21 Admissions open For Courses Affiliated to Maharashtra State Board of Technical Education, Mumbai a...
20/06/2020

Academic Year 2020-21 Admissions open For Courses Affiliated to Maharashtra State Board of Technical Education, Mumbai and Approved By Govt. of Maharashtra.
- Diploma in Hemodialysis Technician, (After 12th Science or MCVC MLT)
-Diploma in Operation Theater Technician, (After 12th Science or MCVC MLT)
-Advanced Diploma in Medical Lab. Technology,(After Graduation in Science or Medical field)
-Dietetics,(After Graduation in Science or Medical field)
-X ray Radiography & Ultrasonography.(After Graduation in Science or Medical field)
Click on the following link to send request for admission

ADMISSION ENQUIRY FORM Contact Number-9689735345,8275131197

07/05/2019

Academic Year 2019-20 Admissions open For Courses Affiliated to Maharashtra State Board of Technical Education, Mumbai and Approved By Govt. of Maharashtra.
- Diploma in Hemodialysis Technician, (After 12th Science or MCVC MLT)
-Diploma in Operation Theater Technician, (After 12th Science or MCVC MLT)
-Advanced Diploma in Medical Lab. Technology,(After Graduation in Science or Medical field)
-Dietetics,(After Graduation in Science or Medical field)
-X ray Radiography & Ultrasonography.(After Graduation in Science or Medical field)

Glimpses 2018-19
31/03/2019

Glimpses 2018-19

06/12/2018

ही कथा कोंकणच्या सत्य परिस्थितीवर आधारित असून प्रत्येकाला आपल्यासोबत घडलेली असल्याचं नक्कीच वाटेल...त्यातून आपली स्वतःची एक कथा ...आपलं स्वप्न यातून नक्कीच आठवेल...ही कथा माझ्या त्या तमाम कोंकणी बांधवाना समर्पित आहे ज्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वप्नांना डोळ्यातील पाण्यासवे वाहू दिल..

१२ वी पास...


आई ....अगं आई...मी १२ पास झालो...

धावत धावत result ची कॉम्पुटर प्रिंट हातात वाऱ्यावर उडवत मी तसाच घरात घुसलो तो अगदी थेट मागच्या दारी...न्हाणी घरात...

अरे हळू हळू...पडशील ना अशांनी...पायाखाली बग तरी निदान..

ते सोड...आई...पण हे घे बघ मी १२ वी पास झालोय...ते पण ८५ % मिळालेत...कॉमर्स ला...आईच्या हातात मार्कशीट कोंबत गळ्यात पडून तिला सांगू लागलो...आनंद मावत नव्हता...

गुणाच ग माझं पोर ते...आईने आपल्या खरखरीत हाताने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवीत मार्कशीट ला उलट - सुलट करून पाहिलं..मार्कशीट पाहताना तिच्या डोळ्यातून अलगत पाणी त्या कागदावर गळाले तस ते पाणी आपल्या पदराला पुसत उठली आणि घरात गेली...घरातून एका वाटीत साखर घेऊन माझ्या हातात दिली..

घे..जा..देवापुढं ठेव..आणि त्यास अशीच बरकत दे म्हणून...

आईच्या उत्साहापुढे माझा आनंद काहीच नव्हता..तिच्या हातातली साखरेची वाटी घेतली आणि देवासमोर हात जोडून ठेवली...देव्हाऱ्यातून बाहेर आलो तेवढ्यात बाबा बैलाकडून आलेले दिसले...पांदीतून येणाऱ्या बैलांना वाड्यात घेऊन येत मला हाक मारत होते...

राकेश...ये राक्या...जरा ढोरास्नी आत घे...कावणात...

बाबांच्या आवाजाने मी धावत बाहेर आलो...आनंदाने पास झाल्याचं सांगीन म्हंटल पण आधी बैल कवनात घेऊन सांगतो घरात आले की...असं ठरून पांदीच्या टोकाला उभा रहात बैल कावणात घातले..पाठीमागून बाबा आपल्या खांद्यावरचा टॉवेल सावरीत आत आले...

तोपर्यन्त मी बैलांना बांधत होतो...बाबानी कावणात आलेल्या बैलांच्या गरम पाठीवर हात टाकला तशी त्यांची चामडी शहारली...जोराचे फुत्कार टाकत रवंथ करत ते जागीच उभे होते...मनात इतका आनंद झाला होता की आता थांबणे शक्य नव्हते...

बाबा...एका ना...

हा बोल रे...काय..काय झाला...कावणात गवत घालत बाबा बोलत होते...

बाबा...मी १२ वी पास झालो...८५ % मिळाले...

कायय...वाह...अरे राक्या आईला सांगितलं का ..?? बिचारी डोळे लावून बसली होती बग...लै कष्ट घेता रे ती तुमच्यासाठी...

बाबानी कावणात गवत घालत खांद्यावरच्या टॉवेल ला हात पुसत माझ्या खांद्यावर शाब्बासकीची थाप दिली...आयुष्यात बाकी काही मिळालं नाही तरी चालेल...पण बापाची कौतुकाची थाप मिळाली की छाती अभिमानाने फुलून येते अगदी तसेच झालं माझं...

बाबांच्या मागे चालत मी घरात आलो...पुन्हा पुन्हा मार्कशीट पाहात आपल्याच यशावर हसत होतो...खुश होतो...आता मला पुढे शिकायला एक दिशा मिळणार होती...मलाही इतरांसारखा मोठं होता येणार होत..स्वतःच एक अस्तित्व माझी वाट पाहत होत...मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेऊन खूप मोठा अधिकारी बनण्याचं माझं स्वप्न एक पायरी का असेना चढलो होतो..

मोरीतून हात पाय धूत बाबा खणात आले...खुर्चीत बसत टॉवेल ला हात पाय पुसत असतानाच आई चहा घेऊन आली...

आओ..ऐकलास काय...येवडी चाय पिवा आणि वायचं काय तरी घेऊन येवा बघू दुकानातसुन...पोरानं नाव कडल्यान हाय..देवाक काय तरी गोडाचा करुस हवा...

व्हय गो...जातो..जातो...चहाचा घोट घेत बाबा बोलले...

हातातली चा संपवत कप माझ्याकडे देत खुर्चीतून उठून खुंटीला लावलेल्या शर्टकडे गेले...मी कप मोरीत ठेऊन बाहेर आलो...खुर्चीत बसून पुन्हा मार्कशीट चाळू लागलो...

अगो...ऐकलंस काय गो..जरा भायर येत काय...??

आलो आलो...आता काय झाला...आई आतून पदराला हात पुसत बाहेर आली...

गो जरा ५० रुपये हायत काय...माझ्याकडे ५० च हात गो...

नाय व...माझ्याकडे खयचे पैशे...१० एक असती...देव काय..

तेना काय व्हयत..पोरानं येवडा नाव काढलान जरा पेढे बिडे आणीन म्हणी होतो गो...

होय वो...जल्ला नशीबच फुटका बघा...पोराचे कसले कसले लाड म्हणू केले नाय वो....पोरानं पण कधी म्हणलं नाय...

आई-बाबांचा तो संवाद माझ्या कानावर हळू हळू येत होता...मला ऐकू येणार नाही एवढ्या हळू आवाजात ते बोलत होते....पण त्यांच्या संवादाचे शब्द माझ्या कानावर येत होते...आपल्याच नशिबाला दोष देत मी तिथून उठून बाहेर जावं म्हणून उठलो...आणि बाहेर खळ्यात येऊन बसलो...आकाशाकडे डोळे लावून खोल वर पाहत राहिलो...डोळ्यांच्या कडा ओलावून आल्या...साला काय नशीब आहे...साधं गोडच जेवण करायला घरात १०० रुपये असू नयेत याचा राग आला...याच गरिबीवर मात करून तिच्या नाकावर टिचून पाय देऊन उभा राहायला मला खूप खूप शिकायचं होत...मोठं व्हायचं होत...

बाहेर अंधार पडला होता...आजूबाजूची मुलं घरात येऊन आपण पास झाल्याचा एखादा पेढा हातात ठेवत होते..पण मी मात्र घरातून बाहेर गेलो नव्हतो...बाहेर जाऊन तरी काय करणार होतो...मी पास झालो...८५ % पडले हे कौतुक सांगणार होतो का सगळ्यांना..?? आपल्याच नशिबाची चीड येऊ लागली...

राक्या...अरे असा बाहेर का...चल जेवायला ये...आईच्या हाकेने मी आत गेलो...जेवणाची तीन ताट समोर वाढलेली होती...आपल्या रोजच्या जागेवर बसलो...ताटात एका वाटीत रव्याची खीर बनवली होती...

राक्या...जेव...बघ तुझ्या आवडीची खीर बनवलीय...

आईच्या वाक्यातला सुका आनंद दिसत होता...बाबा तर काही न बोलताच जेवत होते...आईने पेढ्याची कमी खिरीने भरून काढली होती...आपल्या पोराच्या यशाचा साधा साखरेचा पेढा सुद्धा शेजार्यांना आपण देऊ शकत नाहीत हे शल्य बहुतेक बाबाना वाटत होत...ताटात मान घालून मुकाट्याने जेवत होते...

शेवंती काकू...गे शेवंती काकू...

बाजूचा रघु घरातून ओरडून आवाज देत होता...

आलो...आलो....रघ्या अरे काय झाला...काश आराडट्स...गुडग्यांवर जोर देत आई उठून बाहेर पळाली...

अगे...तुझ्या भावाचो फोन हाय...मुंबयसून...चालु हाय...ये लवकर..

व्हय व्हय..आलो...राघूच्या आवाजाने आई त्यांच्या घरी मामाचा फोन घ्यायला गेली..आपापल्या ताटातलं जेवण संपवत आम्ही बाहेर आलो...

राक्या..पुढे काय करायचं म्हणतोय...आम्हाला काय कळत नाय बघ ..तू जा काय करशी ता कर...मला वाटता तू १५ वी कर...परबाच्या सुनीलनं पण ताच केलान...आता कसा पंचायतीत काम भेटला तेका...सगळं सांभाळून चार पैशे सुटले म्हणजे झाला...

बाबानी त्यांच्या मनातलं बोलून दाखवलं...त्यांच्या मते १५ वी म्हणजे खूप शिक्षण आणि खर्चापुरती नोकरी मिळाली म्हणजे झालं...त्यांचं तरी काय चुकत होत...त्यांच्या ऐपतीतून त्यांनी जे शिकवलं तेच खूप होत...

बाबा..मी थोडा वेगळा म्हणतोय...जरा भायरच्या शहरात जाऊन चांगला अकॉउंट मध्ये शिकून मग नोकरी मिळेल बाबा चांगली...

हा..तुजा बी बरोबर हाय...पण त्यास पैशे पण तशे लागती ना रे...बघ बाबा...काय करूच ता कर तुका...कोणाचे तरी काड वड करून देईन...तू टेन्शन नको घेव...

बाबांच्या त्या एका वाक्याने डोळ्यात पाणी आलं...डोळ्यांच्या कडा भरून वाहू लागल्या..तसा हाताच्या कोपऱ्याने डोळे पुसले...काळोखात ते त्यांना दिसले नाही हेच मोठं होत...

अहो...ऐकलास काय...पांडुरंगाचो फोन होतो...त्याला पण लै आनंद झाला बघा...आणिक एक बातमी हाय...राक्यासाठी काम पण बागलाण हाय टेन..मुंबईस...पगार पण चांगला हाय...म्हणी होतो...उद्याच मामी जाता मुंबईत..तिच्यासोबत धाडून दे म्हणी हुतो...

आईने सगळं बोलणं एका झटक्यात बाबांच्या आणि माझ्या कानावर घालून बाबांनी घातलेल्या अंथरुणात बसली...

अगो पण...राक्या काय म्हणता ऐकून तरी घेशी...त्याला अजून शिकायचा हाय...असा अर्धवट कसा सोडीत तो...

बाबानी आईला समजावत बोलले..

तुमि गप बसा वो...काय शिकूचा बिकूचा नाय..१२ बुका काय कमी नाय...अजून कशाक हवा..बुका शिकून कोण मोटा होणा नाय...गुरवांचो बाबू...तो पण १२ बुका शिकून मुंबयस गेलो...आणि आता बगा कसो घराक ४ पैशे देता ते...घराक थोडी मदत होता...आणि आता पांडू माझो भावच असा ना..

अगो होय बरोबर असा तुजा...बाबा आईला सांगू लागले...पण आई ऐकण्याच्या तयारीत नव्हती...त्या दोघांची माझ्या मुंबई जिन्यावरून हुज्जत चाललेली असताना मी डोक्यावर चादर घेऊन झोपलो...त्यांचे संवाद कानावर ऐकू येत होते...पण मी काहीच बोलू शकत नव्हतो...ना आईला ना बाबाना...

बाबाना वाटत होत कि शिकावं...त्यासाठी ते उधार पदर घेऊन शिकवायला तयार होते पण आईला मी नोकरी करून घरात हातभार लावावा असं वाटत होत...इथे माझ्या मनाचा विचार मात्र कुठेच नव्हता...तस दोघांनाही माज चांगलं व्हावं असच वाटत होत...नोकरी करून ४ पैशे मिळतील..जरा बरे दिवस येतील हीच आईची इच्छा होती...

क्षण क्षणाला डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या...आणि डोळे सोडून घरंगळलेलं पाणी चादरीत जिरून जात होत...चूक कोण...मी ..? बाबा...?? का आई?? का ही परिस्थिती...ही गरिबी...जिच्यामुळे आम्हा कोणालाच आपलं आयुष्य हवं तस जगता येत नव्हतं...इथला प्रत्येक हुशार मुलगा/मुलगी ही केवळ परिस्थितीमुळे आपलं शिक्षण अर्धवट सोडून आपल्या स्वप्नांच्या दुनियेत फक्त उडत राहिलीत ते सुद्धा स्वप्नात...

कोंकण...सौंदर्याची खान...आमचो अभिमान...वगरे वगरे खूप गप्पा मारणाऱ्या आमच्या कोंकणात अजूनही आम्ही शिक्षणात संघर्ष करतोय...काय फायदा माझ्या ८५ % चा...मलाही माझ्या बाकीच्या मित्रांसारखं धावावं लागेल नोकरीच्या मागे...आपली सगळी स्वप्न बांधून ठेवत...डोळ्यातून आसवांची धार लागली होती...सारखे सारखे संद्याकाळी बाबानी आईकडे मागितलेले पैशे आठवले...आईने पेढे मिळाले नाहीत म्हणून रव्याच्या खिरेवर माझ्या १२ वि च्या RESULT चा कौतुक केला...मनातून खूप वाटत होत त्यांना पण ते सुद्धा हतबल होते परिस्थितीपुढे...काय करतील बिचारे...गडीमजुरी करून १२वी शिकवलं ते पण काय कमी नव्हतंच मुळी...

आई काय चुकलं तरी काय आईच...आधीच झालेला कर्जाचा भार अजून वाढायला नको...चार पैशे हाताला आले तर लोकांचे देणं देता येईल हीच माफक अपेक्षा होती त्या माऊलीची...मलाही वाटत होत..हे दिवस जाऊन नवे चांगले दिवस येतील...खूप शिकून चांगल्या पगाराची नोकरी मिळेल...आणि आईच्या भेगाळलेल्या हात-पायांना थोडा आराम मिळेल..बाबांच्या पायांची भटकंती संपून काट्या-कुट्यात बोचून निघालेले पाय आणि त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यांना थोडी विश्रांती मिळेल बस..माझी सुद्धा हीच इच्छा होती...पण परिस्थितीलाच ते मान्य नसेल तर काय करणार...बोलायला खूप सोपं असत परिस्थिती माणसाच्या यशाच्या आड नाही येत..त्यावर मात करून यशस्वी व्हायचं...असं खूप खूप...काही बाही,,,भाषणात छान वाटत..पण प्रत्यक्ष त्यात भाजून निघालेल्याला त्यातून उभारी घेण्याची शक्तीच नाही राहिली तर तो कसा मात करेल परिस्थितीवर...

विचार करून डोकं सुन्न झालं...रडून रडून डोळे जड झाले...चादर वळवली होती...पूर्ण रात्र भविष्याच्या विचारात जागून काढली...आपल्याला ८५ % मार्क्स मिळून सुद्धा आपली ही अवस्था तर मग काय फायदा या शिक्षणाचा...द्यावं सोडून आणि जावं मुंबई च्या दुनियेत इतरांप्रमाणे आपणही चार पैशे कमवावेत आणि घरच्यांना हातभार लावावा...किती दिवस आई-बाबा लोकांच्या कर्जावर जगणार...आणि मन मारून जगणार...झालं...आता जास्त विचार करून उपयोग नव्हता...मनाची तयारी केली..

सकाळी उठून कोणी न सांगता तयारी केली...कपडे पाठीवरच्या बॅग मध्ये भरले ..तोपर्यंत मामी आलीच ओटी...इकडच्या तिकडच्या गप्पा आणि माझ्या % चे कौतुक चालू होत...मध्येच आई मला सूचना देत होती...तयारी होताच मामीने बॅग घेतली आणि आम्ही खळ्यात आलो...सोडायला आई-बाबा पांदीत आले...हृदयावर दगड ठेऊन मी निघालो होतो...तेवढ्यात बस आली आणि आम्ही बस मध्ये बसलो...सकाळच्या दिवा-सावंतवाडी ट्रेन ला रत्नागिरी ला जायला बस पकडून आम्ही स्टेशन ला पोचलो...थोड्याच वेळात ट्रेन आली...गर्दी तशी कमी होती...खिडकीची जागा मिळाली...आणि बॅग मामीकडे देऊन मी खिडकीजवळ बसलो...ट्रेन ने एक हलकासा धक्का देत वेग घेतला...आणि मी ट्रेन च्या वेगाबरोबर जाऊ लागलो रत्नागिरी पासून दूर मुंबईच्या दिशेने...

ट्रेन च्या वेगाने मागे पाळणारी झाडे सुद्धा मला हसत असल्याचा भास झाला...माझ्या हुशारीवर हसत होती ती...का परिस्थितीवर काहीच कळेना...धुराचे लोट सोडत ट्रेन धावत होती आणि मी त्या वेगासोबत माझ्या स्वप्नांच्या दुनियेत उगाचच फिरत होतो...स्वप्नांची दुनियाच किती आभासी असते ना...कोणाला मिळते तर कोणाच्या वाट्याला सुद्धा येत नाही...काही त्यात धून होऊन जातात तर काही तिच्या आसपास सुद्धा जात नाहीत...आपल्या स्वप्नांना मूठ-माती देत मी आता नव्या वास्तवात जगण्याचा दिशेने निघालो होतो...आपली माती सोडून..आपली माणसं सोडून...गाडीच्या वेगासोबत माझ्या डोळ्यात पाण्याने गर्दी केली आणि शेवटी इवलेशे डोळे पाणी न मावल्यामुळे ओसंडून वाहू लागले...आणि मी त्यांना आवार घालण्याचा वेद प्रयत्न करत दूर दूर पाहात राहिलो...उगाचच..काही दिसेल म्हणून...

धन्यवाद
आपलाच
काव्यप्रसाद
प्रसाद गोठणकर (मुंबई/रत्नागिरी)

12/07/2018

प्रवेश सुरु
बि.एस्सी उत्तिर्ण विद्यार्थ्यांसाठी
आडव्हान्सड डिप्लोमा इन मेडिकल लेबोरेटरी टेक्नोलॉजी.
आडव्हान्सड डिप्लोमा इन डायटेटीक्स
आडव्हान्सड डिप्लोमा इन एक्सरे रेडीओग्राफी
१२वी सायन्स नंतर
बि.एस्सी बायोमेडिकल इन्सट्रुमेंटेशन
बि.एस्सी सायकोलोजीकल एंड बिहेवीरल सायन्स
बि.पी.एम.टी इन
फोरेन्सीक टेक्नीशन
इमर्जंन्सी मेडीकल सर्वीस टेक्नीशन
एन्डोस्कोपी टेक्नीशन
कम्युनिटी हेल्थ टेक्नीशन
संपर्क- ९९२१२५१६९५, ९६८९७३५३४५.

25/06/2018

Overwhelmed response for admissions 2018-19

25/06/2018

Overwhelmed response for admissions 2018-19.

Address

Chiplun
415606

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when College of Advanced Studies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share