DBJCollegeChiplun

DBJCollegeChiplun Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DBJCollegeChiplun, Community College, Chiplun.

12/07/2025

*डी.बी.जे. महाविद्यालयास शैक्षणिक स्वायत्ततेचा दर्जा*

*काळाच्या गरजेनुसार व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना मिळणार गती*

*चिपळूण :* नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध कारभार आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या जोरावर महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. महाविद्यालयास यु.जी.सी.कडून शैक्षणिक स्वायत्ततेचा दर्जा प्रदान करण्यात आला असून, त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना आता अधिक व्यवसायाभिमुख व कालसुसंगत अभ्यासक्रमांची दारे खुली झाली आहेत. नियमक समितीचे चेअरमन मंगेश तथा बाबू तांबे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. हा क्षण माझ्यासह सर्वांसाठी आनंदाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

या स्वायत्ततेच्या अनुषंगाने महाविद्यालयास परीक्षा प्रणाली, अभ्यासक्रम रचना, निकाल व्यवस्थापन व अन्य शैक्षणिक बाबतीत अधिक अधिकार प्राप्त झाले आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांना विद्यापीठाच्या प्रक्रियेसाठी वेळ खर्च करावा लागणार नाही. स्थानिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची आखणी व अंमलबजावणी महाविद्यालय स्तरावरच करता येणार आहे.

शासनाच्या सर्व योजना, शिष्यवृत्ती, फी सवलती यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचा निर्वाळा संस्थेतर्फे देण्यात आला आहे. अभ्यासक्रमाच्या फीमध्येही वाढ होणार नाही, असेही बाबू तांबे यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परीक्षेच्या वेळेत येणाऱ्या अडचणी आता स्थानिक स्तरावरच सोडवल्या जातील. निसर्ग, पर्यटन, सागरी किनारा, औद्योगिक वसाहती यासारख्या कोकणातील वैशिष्ट्यांचा विचार करून नव्या अभ्यासक्रमांची आखणी करता येणार आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत नियामक समितीचे अध्यक्ष मंगेश तांबे, संचालक सुचयअण्णा रेडीज, अविनाश जोशी, संजीव खरे, निरंजन रेडीज, महेंद्र कानडे, फैसल कास्कर तसेच प्राचार्य बापट आणि समिती प्रमुख प्रा. शिल्पा सप्रे उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न राहूनही डॉ. दातार सायन्स, डॉ. बेहेर आर्ट्स आणि श्री. पिलुकाका जोशी वाणिज्य महाविद्यालयाच्या माध्यमातून आता नव्या शैक्षणिक पर्वाची सुरूवात होत आहे. ही स्वायत्तता हे केवळ सन्मानच नव्हे, तर कोकणातील उच्चशिक्षणाला दिशा देणारे पाऊल ठरणार आहे.

चिपळूण, रत्नागिरीसह कोकणातील बातम्या

एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिपळूण मधील डॉ दातार सायन्स, डॉ बेहेरे आर्ट्स आणि श्री पिलुकाला जोशी कॉमर्स कॉलेजला ...
11/07/2025

एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिपळूण मधील डॉ दातार सायन्स, डॉ बेहेरे आर्ट्स आणि श्री पिलुकाला जोशी कॉमर्स कॉलेजला युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन अर्थात यु. जी. सी. कडून स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त!

👉 चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट आणि प्राध्यापिका डॉ. शिल्पा सप्रे-भारमल यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.

ज्येष्ठ संचालक सुचयअण्णा रेडीज यांच्यासह फैसल कास्कर, अविनाश जोशी, संजीव खरे, निरंजन रेडीज आदी संचालकांची पत्रकार परिषदेत उपस्थिती!

26/07/2024
आपल्या महाविद्यालयाची सांस्कृतिक विभागातील विद्यार्थीनी
05/04/2024

आपल्या महाविद्यालयाची सांस्कृतिक विभागातील विद्यार्थीनी

DBJ College, Chiplun श्री. परशुराम वार्षिकांक २०२३-२४
05/04/2024

DBJ College, Chiplun
श्री. परशुराम वार्षिकांक २०२३-२४

आपल्या महाविद्यालयाच्या श्री परशुराम वार्षिक अंकाला मिळालेले पारितोषिक स्वीकारताना.
04/04/2024

आपल्या महाविद्यालयाच्या श्री परशुराम वार्षिक अंकाला मिळालेले पारितोषिक स्वीकारताना.

Manas Sakharpekar (TYBMS) represented Mumbai University Mumbai in National Youth Festival 2024🥳 (Agricultural University...
04/04/2024

Manas Sakharpekar (TYBMS) represented Mumbai University Mumbai in National Youth Festival 2024🥳 (Agricultural University, Punjab)
Extremely Happy To Share With You All That he Secured First Rank In Both The Events "Cultural Procession" And "Classical Percussion" (As a Accompanist)
Also University Of Mumbai Won Third Prize For Overall Championship

07/03/2022
14/12/2019

Address

Chiplun
415605

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 8am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 8am - 5pm

Telephone

+912355252088

Alerts

Be the first to know and let us send you an email when DBJCollegeChiplun posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share