Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli

Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli is State Agriculture University located at Dapoli.

DBSKKV RPTO केंद्रात ड्रोन प्रशिक्षणाच्या २१ व्या बॅचचा समारोपदापोली, २५ ऑगस्ट २०२६ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्...
25/08/2026

DBSKKV RPTO केंद्रात ड्रोन प्रशिक्षणाच्या २१ व्या बॅचचा समारोप

दापोली, २५ ऑगस्ट २०२६ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील DGCA मान्यताप्राप्त RPTO केंद्रात १९ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या ड्रोन रिमोट पायलट प्रशिक्षणाच्या २१ व्या बॅचचा नुकताच यशस्वी समारोप झाला.

या प्रशिक्षण कार्यक्रमात Medium Class Drone श्रेणीतील एकूण १० प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणाच्या कालावधीत सहभागी प्रशिक्षणार्थींना ड्रोन हाताळणी व संचालन, उड्डाणाशी संबंधित सुरक्षा मानके, आवश्यक नियमावली तसेच प्रत्यक्ष ड्रोन उड्डाणाचा सखोल सराव करून देण्यात आला.

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना समारोप कार्यक्रमात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ. एस. आर. तोरणे, संचालक, विस्तार शिक्षण, DBSKKV, दापोली आणि RPTO केंद्राचे प्रमुख डॉ. संतोष सावर्डेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता, अशा प्रकारच्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी DBSKKV RPTO केंद्राकडून नियमितपणे ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थींना ड्रोन तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान मिळण्यासोबतच कृषी क्षेत्रातील विविध ड्रोन-आधारित सेवांसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळत आहे.

समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थी तसेच RPTO केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

🌱 अक्षय ऊर्जा दिवस–2026 | CAET, दापोली 🌞कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे 20 ऑगस्ट 2026 रोजी “अक्ष...
24/08/2026

🌱 अक्षय ऊर्जा दिवस–2026 | CAET, दापोली 🌞
कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे 20 ऑगस्ट 2026 रोजी “अक्षय ऊर्जा दिवस–2026” उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन अक्षय ऊर्जा अभियांत्रिकी विभागाच्या वतीने सेमिनार हॉलमध्ये करण्यात आले.
कार्यक्रमास मा. कुलगुरू डॉ. संजयजी भावे, शिक्षण संचालक डॉ. एस. एस. नारखेडे, संशोधन संचालक डॉ. पी. यु. शहारे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. एस. आर. तोरणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
विशेष अतिथी म्हणून डॉ. ए. जी. मोहोड, Director General, Sardar Swarn Singh National Institute of Bioenergy, Punjab तसेच श्री. एस. व्ही. देशपांडे, Advisory Member, MAHAPREIT यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान अक्षय ऊर्जा स्रोतांचे महत्त्व, ऊर्जा संवर्धन, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकास या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये अक्षय ऊर्जेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ऑनलाईन ई-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतातील विविध शैक्षणिक संस्थांमधून एकूण 19 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांची नावे माननीय कुलगुरू यांनी घोषणा केली.
हा कार्यक्रम डॉ. एस. के. जैन, सहयोगी अधिष्ठाता, कृअतंम, दापोली यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. पी. पी. चव्हाण, डॉ. एम. बी. पाटील, डॉ. आर. एन. पालटे आणि डॉ. एच. वाय. श्रीरामे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमात B.Tech., M.Tech. व Ph.D. विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभागी होता.

🌿 “अक्षय ऊर्जा – शाश्वत भविष्यासाठी आजची गरज!”
#अक्षयऊर्जादिवस2026

Delivered the lecture on "Integrated pest management on coconut and Arecanut" for Agriculture Officers of Kokan division...
21/08/2026

Delivered the lecture on "Integrated pest management on coconut and Arecanut" for Agriculture Officers of Kokan division on 19 August, 2026 at RAMETI, Raigad, Maharashtra.

सद्भावना दिवस शपथ
20/08/2026

सद्भावना दिवस शपथ

DBSKKV RPTO केंद्रात ड्रोन प्रशिक्षणाच्या २०व्या बॅचचे यशस्वी समापनदापोली, १७ ऑगस्ट २०२६ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
18/08/2026

DBSKKV RPTO केंद्रात ड्रोन प्रशिक्षणाच्या २०व्या बॅचचे यशस्वी समापन

दापोली, १७ ऑगस्ट २०२६ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील DGCA मान्यताप्राप्त RPTO केंद्रात ११ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित ड्रोन रिमोट पायलट प्रशिक्षणाच्या २०व्या बॅचचे यशस्वीरीत्या समापन झाले.

या बॅचमध्ये एकूण ११ प्रशिक्षणार्थींनी Medium Class Drone श्रेणीतील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना ड्रोन संचालन, सुरक्षा नियम तसेच प्रत्यक्ष ड्रोन उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण ड्रोन प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. संतोष सावर्डेकर तसेच सहप्रमुख डॉ अमित देवगिरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी व RPTO केंद्रातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र रोहा मार्फत पोलादपूर व पेण तालुक्यातील शेतकऱ्...
15/08/2026

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र रोहा मार्फत पोलादपूर व पेण तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन..

दिनांक १४ऑगस्ट २०२६ रोजी पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक पद्धती आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. मनोज तलाठी सर, यांनी आधुनिक भात, तूर लागवड तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, भात यांत्रिकीकरण इ. बाबत सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. तर पेण तालुक्यातील शेतकऱ्यांना डॉ. आरेकर यांनी किड व रोग व्यवस्थापन विषयी माहिती दिली. दोनही तालुक्यातील शेतकऱ्यांना विद्यापीठ विकसित विविध ॲप विषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला उप कृषीअधिकारी श्री. धायगुडे, मंडळ कृषि अधिकारी श्री. शिंदे, कृषि विभागाचे इतर कर्मचारी आणि पंचक्रोशीतील शेतकरी बंधु, भगिनी, विद्यार्थी उपस्थित होते.. दुपारच्या सत्रात प्रक्षेत्र भेटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत जिल्हा रायगड या संशोधन केंद्राचीं स्थापना 14 ऑगस्ट 1919 ला झाली. या संशोधन केंद्राचा ...
14/08/2026

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत जिल्हा रायगड या संशोधन केंद्राचीं स्थापना 14 ऑगस्ट 1919 ला झाली. या संशोधन केंद्राचा 108 वा वर्धापन दिन आज शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात पार पाडला या शुभप्रसंगी कर्जत विभागातील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माननीय श्री प्रकाश संकपाळ साहेब प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तसेच माजी सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर लक्ष्मण चव्हाण साहेब हे या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले या कार्यक्रमासाठी विविध शेतकरी माजी कर्मचारी बंधू-भगिनी, रावे विद्यार्थी, संशोधन केंद्रातले अधिकारी कर्मचारी हे सर्व उपस्थित होते. संशोधन केंद्रावरील पाच केंद्रावर कार्यरत असलेल्या कर्मचारी यांचा सन्मान मान्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच चार शेतकऱ्यांचा मान्यवराच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.एकंदरीतच प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत या केंद्राचा 108 वा वर्धापन दिन प्रथमताच मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.

दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी रोहा  तालुक्यातील वरसगाव गावातील शेतकऱ्यांना NFSM अंतर्गत  पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमात कृषि व...
14/08/2026

दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी रोहा तालुक्यातील वरसगाव गावातील शेतकऱ्यांना NFSM अंतर्गत पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र रोहाचे विषय विशेषज्ञ डॉ. आरेकर सर, यांनी भात व तूर पिकातील किड व रोग नियंत्रण बाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. ताकृअ रोहाच्या प्रतिनिधीनी विविध योजनांची माहिती देऊन जास्तित जास्त लाभ घेण्याबाबत आवाहन केले. प्रात्यक्षिक प्रक्षेत्राला भेट देऊन शंकांचे निरसन केले.कार्यक्रमाला एकूण ३७ शेतकरी भगिनी उपस्थित होत्या..

आज दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी पेण तालुक्यातील कोंडवा गावातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत  किसान गप्...
13/08/2026

आज दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी पेण तालुक्यातील कोंडवा गावातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत किसान गप्पा गोष्टी कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. मनोज तलाठी सर, यांनी आधुनिक भात लागवड तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, कंदपीके, यांत्रिकीकरण इ. बाबत सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठ विकसित विविध ॲप विषयी माहिती देऊन शेतकऱ्यांच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. ताकृअ श्री. सागर वाडकर यांनी विविध योजनांची माहिती देऊन जास्तित जास्त लाभ घेण्याबाबत आवाहन केले.. साकाव संस्थेच्या श्रीमती पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करून आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबाबत आवाहन केले.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन श्री. नचिकेत जगे यांनी केले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील एकूण ७१ आदिवासी शेतकरी बंधु भगिनी उपस्थित होते..

आज दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र पुरस्कृत पशु स्वास्थ व पशुरोग नियंत्रण योजने अंतर्गत ...
11/08/2026

आज दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र पुरस्कृत पशु स्वास्थ व पशुरोग नियंत्रण योजने अंतर्गत पंचायत समिती रोहाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कार्यालयामार्फत पशुधनाच्या विविध आजारावरील जनजागृती कार्यक्रम रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. मधुकरशेठ पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषद सदस्यां मा. निधी जाधव मॅडम तसेच मा. श्री. संजयजी मांडलुसकर उपसभापती, पंचायत समिती रोहा, डॉ. अनिल परंडवाल, सहाय्यक आयुक्त तथा तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी,कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. मनोज तलाठी सर, विषय विशेषज्ञ डॉ. मांडवकर सर, प्रगतशील शेतकरी श्री. पाभरीकर, विविध ठिकाणचे पशुसंवर्धन अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत रोहा तालुक्यातील अशोकनगर येथे श्री. पाभरीकर यांच्या पशुधन प्रक्षेत्रावर करण्यात आले. अध्यक्षिय मार्गदर्शनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. मधुकरशेठ पाटील साहेबांनी पशुधन बाळगणाऱ्या शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सर्वांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. जि. प. सदस्या मा. जाधव मॅडम यांनी शेतकऱ्यांच्या पशुधनाबाबतीत सर्व समस्या प्राध्यान्याने पूर्ण करण्यासाठी पशुधन अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे असे आवर्जून सांगितले आणि लसीकरण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. उप सभापती मा. श्री. मांडलुसकर सरांनी शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीपूरक व्यवसायातून वृद्धी करावी असे मनोगत व्यक्त केले. डॉ. अनिल परंडवाल सरांनी विविध योजना आणि लसीकरणा बाबत उद्देश विषद करून सर्वांनी या लसिकरणातून आपले पशुधन तंदुरस्त करण्याबाबत विचार मांडले. डॉ. तलाठी सरांनी एकात्मिक शेती पद्धती मध्ये पशुधनाचे महत्व, कृषि विज्ञान केंद्राच्या कार्याबाबत उहापोह करून मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठ विकसित विविध ॲप विषयी माहिती देऊन कृषि विज्ञान केंद्रामार्फत मा. मधुकरशेठ पाटील साहेब, मा. निधी जाधव मॅडम आणि मा. संजयजी मांडलुसकर सर यांना विद्यापीठ दैनंदिनीचे वाटप करण्यात आले. डॉ. मांडवकर सरांनी कृषि विज्ञान केंद्राच्या विविध विस्तार विषयक कार्यक्रमांबाबत माहिती दिली.कार्यक्रमाला पंचक्रोशीतील एकूण ५७ शेतकरी उपस्थित होते..

Address

Dapoli
415712

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli:

Shortcuts

Share