Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapith, Dapoli

Directions Website

Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapith, Dapoli This is the Official page of the university for Posts.

मत्स्य उपकेंद्र, तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय  संशोधन केंद्र, पनवेल आणि सागरी उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण (एमपीइडीए...
09/01/2025

मत्स्य उपकेंद्र, तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, पनवेल आणि सागरी उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण (एमपीइडीए) - मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने मत्स्य संवर्धक तंत्रज्ञासाठी “कोळंबी संवर्धन: आधुनिक तंत्रज्ञान” विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न. या वेळी केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच एमपीइडीए चे डेप्युटी डायरेक्टर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

दिनांक ८ जानेवारी, २०२५ रोजी गाव साळवे ता. माणगाव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग ता. कृ. अधिकारी माणगाव यांच्या मार्फत ...
09/01/2025

दिनांक ८ जानेवारी, २०२५ रोजी गाव साळवे ता. माणगाव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग ता. कृ. अधिकारी माणगाव यांच्या मार्फत राष्ट्रिय अनसुरक्षा अभियान अंतर्गत तसेच किसान गप्पा गोष्टी अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अधिनस्त कृषि विज्ञान केंद्र, येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. मनोज तलाठीसर यांनी शेतकरयांना आधुनिक नाचणी लागवड, मुल्यवर्धन व नैसर्गिक शेती या विषयावर तर कृषि संशोधन केंद्र रेपोली येथील डॉ. निगडे यांनी आधुनिक भाजीपाला लागवड किड रोग व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. तलाठी सर यांनी मा. कुलगुरू डॉ संजयजी भावे सर यांच्या सुचनेनुसार शेतकऱ्यांना विद्यापीठ तंत्रज्ञाना बाबतच्या विविध ॲन्ड्रॉईड ॲप, विद्यापीठ युट्युब चॅनल, फेसबुकपेज बाबत माहिती देऊन शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटीच्या माध्यमातून वाल, मटकी, मिरची, वांगी, टोमॅटो, कारली, आंबा पिकाबाबत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन शंका निरसन केले .कार्यक्रमाला माणगाव ता.कृ.अधिकारी श्री. पडवळकर, ग्रामसेविका श्रीमती दबके मॅडम, कृषि विभागाचे श्री. प्रमोद शिंदे, श्री. ससाणे, श्री. शिंदे व इतर कर्मचारी तसेच तालुक्यातील एकूण ५७ प्रगतशील शेतकरी, महिला उपस्थित होत्या.

मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी निशिंडो फुड्स प्रा. लि. वेरावळ येथे कार्यानुभव प्रशिक्षण आयोजनडॉ...
09/01/2025

मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी निशिंडो फुड्स प्रा. लि. वेरावळ येथे कार्यानुभव प्रशिक्षण आयोजन

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम शिरगांव, रत्नागिरी च्या तृतीय वर्षाच्या ७ विद्यार्थ्यांसाठी फिश प्रोसेसिंग अँड रेफ्रिजरेशन मशिनरी या विषया अंतर्गत विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. संजय भावे सर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे सर, आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्रज्ञान शिक्षण डॉ. ठोकळ सर यांची परवानगी आणि मार्गदर्शनाखाली निशिंडो फूड्स प्रा. लि. वेरावळ येथे कार्यानुभव प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यानुभव प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कु. जान्हवी कदम, कु. वेदांती शिर्के, कु. मौसमी कोयांडे, कु. कृतज्ञता पाटील, कु. अर्चीता पाटील, कु. श्रावणी बाणे, आणि ओमकार कांबळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून सुरीमी फिश प्रोसेसींग तंत्रज्ञान, रेफ्रीजरेशन तंत्रज्ञान, सूष्म जीव शास्त्र तसेच विविध मुल्यवर्धी मत्स्य पदार्थ निर्मिती त्यांचे व्यवस्थापन व मार्केटिंग विषयक सखोल ज्ञान आत्मसात करत आहेत. सहाय्यक प्राध्यापक श्री. तोसिफ काझी या कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्वय म्हणून काम पाहत असून निशींडो फुडस चे जनरल मॅनेजर श्री. विजय वारा हे कार्यानुभव कार्यक्रम वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांकडून झालेला अभ्यासाचा आढावा घेत आहेत.

नुकतेच डॉ. आशिष मोहिते, प्राचार्य / सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव यांनी निशिंडो फूड्स प्रा. लि. वेरावळ येथे प्रत्यक्ष भेट देवून सहभागी विद्यार्थी आणि निशिंडो फूड्स चे कर्मचारी यांच्याशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांसोबत कार्यानुभव कार्यक्रमाबद्दल चर्चा केली आणि त्यांचे कौतुक केले.

श्री. विजय वढेर यांच्याकडून डॉ. आशिष मोहिते यांनी निशिंडो फुड्स च्या विविध विभागांची ओळख करून घेतली. सर्वप्रथम फिश कटिंग शेड मधील कामकाज व व्यवस्थापन समजून घेतले. त्यानंतर रेफ्रिजरेशन सेक्शन मधील विविध मशिनरी यांची माहिती घेतली व वॉटर सॉफ्टींग युनिट चे काम पाहिले. मायक्रोबायोलॉजी लॅब आणि क्वालिटी कंट्रोल लॅब मधील कामकाज जाणून घेतले तसेच सर्वात शेवटी सुरिमी प्रक्रिया लाईन च्या विविध विभागांचा आढावा घेतला. डॉ. आशिष मोहिते यांनी नंतर वेरावळ मासेमारी बंदराला भेट देवून बंदरावर चालणाऱ्या मासेमारी संबंधीत विविध कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.

हा कार्यानुभव कार्यक्रम निशिंडो फूड्स प्रा. लि. वेरावळ मध्ये आयोजित करण्यास परवानगी तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी श्री. दीपक चौधरी, व्यवस्थापकीय संचालक, निशिंडो फूड्स प्रा. लि. वेरावळ यांचे विशेष आभार मानले. त्याचप्रमाणे या कार्यानुभव प्रशिक्षणांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करत असलेल्या श्री. दुर्गेश खोरावा, व्यवस्थापकीय संचालक, श्री. विजय वारा, जनरल मॅनेजर आणि श्री. विजय वढेर, प्रोडक्शन मॅनेजर यांचे सुद्धा मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम तर्फे आभार व्यक्त करून हा कार्यानुभव कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्य विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरेल अशी आशा व्यक्त केली.

Address

Dapoli
Dapoli
415712

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapith, Dapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share