Shri S.H.Kelkar College, Devgad

Shri S.H.Kelkar College, Devgad DEVGAD College Fans Page Shikshan Vikas Mandal's S. H. Kelkar College of Arts, Commerce and Science in Deogad.

its constituents, are a family of some 2500 students taking education at Junior, Senior- under graduate and post graduate levels in Arts, Commerce and Science disciplines with 150 staff members. A picturesque campus sprawling on nearly 15 acres of land of its own in the lap of nature, Smt. Neerabai Jagannath Parkar Vidyanagari presently housing two full-fledged colleges viz. Shri S.H.Kelkar colleg

e of Arts, Commerce & Science and S.K.Pant Walawalkar college of Education- both affiliated to University of Mumbai- is indeed a testimony of a truly materialized dream of Shikshan Vikas Mandal, Devgad, a parent body, which started its mission of higher education in Devgad- a remote and educationally backward, hilly region- in 1974.

02/08/2022



देवगड महाविद्यालयामध्ये सोमवार दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ रोजी Department of Commerce च्या वतीने 'Commerce Day 'उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागामार्फत "Commerce जत्रा " चे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये food stall स्पर्धा व पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धांमध्ये विविध विभागातील विद्यार्थ्यांनी food stall स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता, या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. जांबळे मॅडम यांनी केले, तसेच या फूड स्टॉल स्पर्धेचे परीक्षण प्रा. एन . एस. दप्तरदार सर, व प्रा. एच. के. चिटणीस मॅडम यांनी केले. तसेच पोस्टर मेकिंग स्पर्धेचे परीक्षण प्रा. एम. एस. तेली व प्रा. एच. एम. आरेकर मॅडम यांनी केले. या स्पर्धेचे पूर्णपणे नियोजन Department of Commerce च्या FY/ SY/ TY या वर्गातील व 12 Commerce च्या विद्यार्थ्यांनी प्रा. एस. एस. तेली, प्रा. एस. एस. खरात व प्रा. पी. ए. मालवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले. महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी या Commerce जत्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला होता.
साभार - Devgad college

देवगड महाविद्यालयाच्या प्रतिक घाडीगांवकरचे शूटिंग स्पर्धेत यशविष्णू धावडे, देवगड ता २९चंदिगढ येथे ४-१५ जुलै २०२२ मध्ये झ...
01/08/2022

देवगड महाविद्यालयाच्या प्रतिक घाडीगांवकरचे शूटिंग स्पर्धेत यश

विष्णू धावडे, देवगड ता २९
चंदिगढ येथे ४-१५ जुलै २०२२ मध्ये झालेल्या इंटर डायरेक्टोरेट शूटिंग स्पर्धेत देवगड कॉलेज NCC Unit च्या लान्स कॉर्पोरल प्रतिक पांडुरंग घाडीगांवकरची ने ५८ MAH BN चे प्रतिनिधित्व केले. एकूण १२ पदकांसह महाराष्ट्र डायरेक्टोरेट ने अव्वल स्थान मिळवत ही शूटिंग चॅम्पयनशिप जिंकली. प्रतिकची निवड G. V. मालवणकर चॅम्पियनशिप (प्रि- नॅशनल) साठी झाली आहे. यामध्ये यशस्वी ठरल्यास प्रतिक भारताचे प्रतिनिधित्व करीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकेल. २०१९ पासून देवगड महाविद्यालयामध्ये आर्मी NCC चे १०७ कॅडेटस् चे युनिट पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. कॅम्प, फिटनेस ट्रेनिंग, शूटिंग, आपत्ती व्यवस्थापन इ. चे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना NCC मधून दिले जाते. प्रतिकला देवगड कॉलेजच्या NCC ऑफिसर लेफ्ट. डॉ. सुनेत्रा ढेरे, केअर टेकर प्रसाद मालवणकर, ५८ MAH BN आणि पुणे ग्रुप HQ चे स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य, सर्व स्टाफ आणि संस्था पदाधिकऱ्यांकडून प्रतिकचे मनःपूर्वक अभिनंदन.

साभार समर्थ News

12/02/2022
भावपूर्ण श्रध्दांजली🙏🏻
06/02/2022

भावपूर्ण श्रध्दांजली🙏🏻

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
25/03/2020

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

03/03/2020
कोकणातील सिंधुदूर्ग जिल्हाच्या देवगड तालुक्यातील कन्या मा *.कुमारी सायलीताई प्रमोद धुरत* याना येत्या २६ जानेवारी रोजी भा...
25/01/2020

कोकणातील सिंधुदूर्ग जिल्हाच्या देवगड तालुक्यातील कन्या मा *.कुमारी सायलीताई प्रमोद धुरत* याना येत्या २६ जानेवारी रोजी भारताचे महामहिम राष्ट्रपती याच्या शुभहस्ते " , *उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थापन २०१९ पुरस्कार* " ( Best Security Mangement 2019)देण्यात येणार आहे . त्याबददल तीचे हार्दिक अभिनंदन ....💐💐
भारतीय प्रशासन सेवेतील ( lAS) 2010 च्या तुकडीच्या असलेल्या बिहार कॅडेड , सध्या अरेरीया जिल्हाच्या एसपी ( SP ) आहेत .२०१९ रोजी निवडणूकीवेळी त्या पटनाच्या एसपी होत्या , त्यावेळी ठेवलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत त्याना हा विशेष पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते देण्यात येणार आहे .

🙏🙏🙏 #कुठे_गेले_ते_दिवस🙏🙏🙏आवडली पोस्ट तर नक्की बालपणीच्या मित्रांना पाठवाएव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु झालेली...
23/10/2019

🙏🙏🙏 #कुठे_गेले_ते_दिवस🙏🙏🙏

आवडली पोस्ट तर नक्की बालपणीच्या मित्रांना पाठवा

एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु झालेली असायची. दसऱ्यापासूनच थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची. दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे. किल्ला गोरूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून बुरुजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड' राखण्यात !! फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात सापडायची इकडून तिकडून उचललेली ५, १०, २०, २५ पैसे... आठ-आणे, रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा. फटाक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी, लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी, नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची. एकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं.

घरी येवून भाऊ-बहिणींबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच काय ती दारू माहिती तेव्हाची !!

'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभ्यंगस्नानाला उठायचं आहे' - आई, बाबा, आजी सांगायची. पण इथे झोप कोणाला असायची....! कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश, दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं. न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून अंगात उब आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं. तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला कि छान वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा. मला तो आवडायचा. 'मोती' साबण छोट्याश्या हातात मावायचा नाही आणि बादलीतल पाणी संपूच नाही असं वाटायचं.

देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते गोठायचं नाही म्हणून बरं वाटायचं.

*मोठ्यांच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो फक्त एक लवंगी सर वाजवायचा बाकी सगळे सोडून, पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते.*

दिवस हळूहळू उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढा जास्त आनंद व्हायचा त्याचा. आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं शेवटचं? लहान होवून, छोट्या गोष्टीत रमून, निरागसपणे.

सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये कि आपण खूप पुढे आलोय ?

😄😄😄😄😊😊😊😊

आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते ना... टेलिफोनचा फटाका आठवतो का... चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना... राॅकेट साठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे.

सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पड़लेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायचो आणि पेपराला सगळ्याबाजूने आग लावल्यानंतर उड़ालेला आगीचा ज्वाळ पहाताना मिळणारा आनंद.

खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना...

आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते, अरे दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात रे....!

असो.... !! 💥⭐💥

Address

Smt Neerabai Parkar Vidyanagari
Devgad
416613

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri S.H.Kelkar College, Devgad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Shri S.H.Kelkar College, Devgad:

Share