14/01/2026
देवगड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचा (NCC) कॅडेट कु. संभाजी जकप्पा माने रा. हिंदळे, देवगड याची अग्नीवीर (टेक्निकल श्रेणी) करिता निवड झाली आहे. चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्य या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. NCC आणि क्रीडा क्षेत्रातील त्याच्या यशामुळे त्याने महाविद्यालयाचे नाव वेळोवेळी विविध स्तरावर उंचावले आहे. नवी दिल्ली येथे सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय थल सैनिक कॅम्पमध्ये त्याने महाराष्ट्र निदेशालयाच्या संघामधून भाग घेतला होता. संभाजीचे ई. ११वी पासूनचे शिक्षण देवगड महाविद्यालयामधे झाले असून सध्या तो बी. एस्सी. प्रथम वर्षामध्ये शिकत आहे. महाविद्यालयाच्या कला, क्रीडा, NCC, शैक्षणिक अशा सर्व उपक्रमांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असायचा. यातून आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास, करियर मार्गदर्शन इत्यादीचा लाभ त्याला झाला. प्रशस्त मैदान, जिमखाना, ग्रंथालय आणि वाचनगृह अशा महाविद्यालयाच्या सुविधांचा त्याने सर्वांगीण प्रगतीकरिता प्रभावीपणे वापर केला. NCC अधिकारी लेफ्ट. सुनेत्रा ढेरे आणि ५८ महा. बटालियन सिंधुदुर्गच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य त्याच्या या यशामध्ये मोलाचे आहे.
देवगड महाविद्यालय आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागाला त्याचा अभिमान आहे. संस्थापदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमारे कुनुरे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे, डॉ. लक्ष्मण सुरवसे, डॉ. पारस जाधव तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा पाठिंबा व सहकार्य त्याला वेळोवेळी लाभले. संभाजीच्या या कामगिरीबद्दल त्याचे संस्था पदाधिकारी व महाविद्यालयाच्या सर्व घटकांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.