Arts Commerce & Science College, Kurha Kakoda

Arts Commerce & Science College, Kurha Kakoda Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Arts Commerce & Science College, Kurha Kakoda, College & University, https://g. co/kgs/H1bKbQ Kurha Kakoda, Edalabad.

प. पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था द्वारा संचालित
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा काकोडा
तालुका - मुक्ताईनगर (Muktainagar) जिल्हा - जळगाव
समाज भक्ती हीच प्रेरणा! राष्ट्रभक्ती हे रूप तिचे!!

रूप पाहतां लोचनीं।सुख जालें वो साजणी॥ 🚩देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!   #वारी2026    #आषाढी  #ए...
25/07/2026

रूप पाहतां लोचनीं।
सुख जालें वो साजणी॥ 🚩

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

#वारी2026 #आषाढी #एकादशी #विठ्ठला #विठ्ठल #मुक्ताई #पालखी #वारी #ज्ञानदेव #नामदेव #तुकाराम #गजर #सोहळा #माऊली

*विकसित भारत @ 2047 च्या संकल्पनेसह NSS कुलगुरू प्रेरणा शिबिरात विद्यार्थ्यांचा सहभाग* *कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर मह...
22/07/2026

*विकसित भारत @ 2047 च्या संकल्पनेसह NSS कुलगुरू प्रेरणा शिबिरात विद्यार्थ्यांचा सहभाग*
*कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव* येथे दिनांक 10 ते 16, जुलै दरम्यान आयोजित *राष्ट्रीय सेवा योजना - कुलगुरू प्रेरणा शिबिर 2026* *विकसित भारत @ 2047* या संकल्पनेसह विद्यापीठ स्तरीय शिबिर संपन्न झाले.
या शिबिरात विविध मान्यवर, मार्गदर्शक यांनी मार्गदर्शन केले, ज्यामध्ये विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी,अधिसभा सदस्य, विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. डॉ. प्रवीण महाले सर- NSS संचालक व त्यांच्या विभागातील सहकाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी केले.
या विद्यापीठ स्तरीय शिबिरात आपल्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या BSc द्वितीय वर्षातील सुयश हरिचंद्र पाटील रा. पारंबी व विशाल मोहन पाटील रा. वडोदा या दोन विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सात दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केले.
या शिबिरात विद्यार्थ्यांना श्रमदान, जल व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, सीड बॉल, उद्योजकता मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले.

15/07/2026

#वारी_समरसतेची

15/07/2026

केवळ झाड लावणं पुरेसं नाही, तर ते झाड जबाबदारीने वाढवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे

**🎉 अभिनंदन! अभिनंदन!! 🎉**नवीन शैक्षणिक धोरणात नियमित पारंपारिक शिक्षणाबरोबर विविध कौशल्य आधारित ज्ञान विकसित व्हावे या ...
15/07/2026

**🎉 अभिनंदन! अभिनंदन!! 🎉**
नवीन शैक्षणिक धोरणात नियमित पारंपारिक शिक्षणाबरोबर विविध कौशल्य आधारित ज्ञान विकसित व्हावे या उद्देशाने महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाबरोबर विविध सर्टिफिकेशन करण्याकरिता प्रोत्साहित करण्यात येते याचेच एक उत्तम प्रेरणादायी उदाहरण म्हणजे यश.
आमच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, कुर्‍हा काकोडा च्या अंतिम वर्षाच्या TYBSc कॉम्प्युटर चा उत्तीर्ण विद्यार्थी यश विनोद पाटील याचे हार्दिक अभिनंदन!

यशने एकापेक्षा जास्त प्रतिष्ठित प्रमाणपत्रे मिळवली आहेत:

Semrush Academy - Getting Started with Semrush, SEO Essentials, Technical SEO & AI Search Essentials
Google Cloud + Simplilearn- Introduction to Generative AI, Gemini for Google Workspace
Microsoft + Simplilearn - Prompt Engineering with GitHub Copilot
Simplilearn - Data Analytics with Generative AI
TCS iON - Career Edge Young Professional Course

खरोखरच अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वासाचा अद्भुत नमुना! 💪✨

यश, तुझ्या या यशाबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! तू नक्कीच उज्ज्वल भविष्य घडवशील.

अभिनंदन यश ! 🏆🌟

15/07/2026

अकरावी प्रवेशाची पुढील फेरी १६ जुलैपासून सुरू…
प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी संधी.

#अकरावीप्रवेश२०२६ #विद्यार्थी #पालक #शिक्षण #महाराष्ट्रशासन

पावसाळा सुरू झाल्यापासून विविध कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित बियांपासून  बीजारोपण, निर्मित रोपे यांची लागवड करण...
15/07/2026

पावसाळा सुरू झाल्यापासून विविध कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित बियांपासून बीजारोपण, निर्मित रोपे यांची लागवड करण्यात आली. या विविध उपक्रमात संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

देव वृक्ष लागवड अभियान सोमवार, दिनांक 13 जुलै रोजी श्री दिनेशजी चव्हाण, (अधिसभा सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महा...
14/07/2026

देव वृक्ष लागवड अभियान
सोमवार, दिनांक 13 जुलै रोजी श्री दिनेशजी चव्हाण, (अधिसभा सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांनी महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत श्री अजितजी केंद्रे, (विभाग संघटन मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव विभाग), श्री प्रवीण राठोड, (अनुलोम) उपस्थित होते. यानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात आंब्याचे रोप लावण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Dinesh Chavhan

**कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा काकोडा येथील प्राध्यापक डॉ. सचिन नारायण जोशी यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्...
14/07/2026

**कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा काकोडा येथील प्राध्यापक डॉ. सचिन नारायण जोशी यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन केले**

**संग्रामपूर :** शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), संग्रामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा काकोडा येथील प्राध्यापक **डॉ. सचिन नारायण जोशी** हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. जोशी यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प आणि आजच्या तरुण पिढीने घ्यावयाच्या प्रेरणा याबाबत मार्गदर्शन केले. “शिवराज्याभिषेक हा केवळ ऐतिहासिक घटना नसून, स्वाभिमान, न्याय आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा आदर्श आहे,” असे प्रतिपादन डॉ. जोशी यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. जोशी यांनी विद्यार्थ्यांना पंच परिवर्तनाच्या माध्यमातून आपण पुन्हा स्वराज्याची संकल्पना साकारू शकतो असे मत मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य गीते सर यांनी भूषविले तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री भुसारी सर उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. जोशी यांनी व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला, ज्यात त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

Address

Https://g. Co/kgs/H1bKbQ Kurha Kakoda
Edalabad
425127

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arts Commerce & Science College, Kurha Kakoda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share