Netaji Subhashchandra Science College Mulchera

Netaji Subhashchandra Science College Mulchera Netaji Subhashchandra Science College, Mulchera was established by Van Vaibhav Shikshan Mandal, Allapalli in 2002 in a small rented building.

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ आपल्या शैक्षणिक पदवीचा उपयोग समाज उद्धरासाठी करावा - डॉ. चीनन्...
30/03/2026

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ

आपल्या शैक्षणिक पदवीचा उपयोग समाज उद्धरासाठी करावा - डॉ. चीनन्ना चालूरकर

मुलचेरा : महाविद्यालय स्तरावर प्रत्येक पदवी प्राप्त विदयार्थ्यानी आपल्या शैक्षणिक पदवीचा उपयोग समाज उद्धरासाठी करावा असे प्रतिपादन डॉ. चीनन्ना चालूरकर यांनी नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे दिनांक 30 मार्च 2026 ला रोज सोमवार ला शैक्षणिक सत्र 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा पदवी वितरण समारोह प्रसंगी आपले मंत व्यक्त केले. पुठे त्यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना पदवी ही जीवनात कशी वापरावी आणि तिचा कसा उपयोग होतो तसेच पदवीचे महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. चीनन्ना चालूकर प्राचार्य, राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरी, अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजित मंडल, अतिथी म्हणून डॉ. सचिन शेंडे व IQAC समन्वयक डॉ. ललितकुमार शनवारे व प्रा. गौतम वाणि सांस्कृतिक विभाग प्रमुख हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रंजित मंडल यांनी आपल्या भाषणात सांगताना म्हटले की, समाजाचे आपण घटक असून त्याबद्दलची निष्ठा असावी. ज्या महाविद्यालयाचे आपण विद्यार्थी आहोत त्यासाठी आपले काही देणे आहे, हेही विसरता कामा नये, असे उदगार त्यांनी आपल्या अध्यक्षयी भाषणात व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमास लाभलेले अतिथी डॉ. सचिन शेंडे व डॉ. ललितकुमार यांनी सुद्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात प्रा. गौतम वाणी यांनी पदवी मिळवणे ही केवळ शैक्षणिक प्रवासाची समाप्ती नाही, तर खऱ्या अर्थाने आयुष्याच्या एका मोठ्या मैदानावर प्रवेश करण्याची ही सुरुवात आहे. तसेच ही पदवी मोठ्या कष्टाने आपण मिळविलेली असून, तिचा कुटुंबासाठी व समाजासाठी चांगला उपयोग करावा आणि जीवनात यशस्वी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल पिंपळशेंडे सर यांनी केले, तर पदवी वितरण संचालन डॉ. दयाल रॉय यांनी पार पाडले, तर आभार प्रदर्शन कुमारी विशाखा मंडल हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सर्व  विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षक, प्राचार्य यांना कळविण्यात येते की *नेताज...
18/03/2026

सर्व विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षक, प्राचार्य यांना कळविण्यात येते की *नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा व महात्मा फुले कला महाविद्यालय आष्टी * यांच्या वतीने *राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था (RGNIIPM), नागपूर, भारत सरकार* यांच्या सहकार्याने *“बौद्धिक संपदा हक्क (IPR) आणि पेटंट, डिझाईन फाइलिंग”* या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम *National Intellectual Property Awareness Mission* (NIPAM) अंतर्गत आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यशाळेत विषय तज्ञ म्हणून
*श्री. भारत सूर्यवंशी ,
सहाय्यक नियंत्रक – पेटंट व डिझाईन, RGNIIPM*, नागपूर हे प्रमुख व्याख्यान देणार आहेत.

कार्यशाळेचे तपशील:
📅 दिनांक: शुक्रवार, २३ मार्च २०२६
⏰ वेळ: दुपारी १२.०० ते १.००
💻 माध्यम: ऑनलाईन Cisco Webex प्लॅटफॉर्म

*या कार्यशाळेसाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही*..

सर्व सहभागीनी खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी. कार्यशाळेची joining link Cisco Webex द्वारे व्हाट्स अँप ग्रुप वर शेअर करण्यात येईल.

सूचना:
कार्यशाळा संपल्यानंतर RGNIIPM कडून feedback form ची link उपलब्ध करून दिली जाईल. तो फॉर्म भरल्यानंतरच प्रमाणपत्र (Certificate) प्रदान करण्यात येईल.

नोंदणी लिंक: https://forms.gle/Ei6H99otvjT1bFZt5
WhatsApp ग्रुप लिंक :https://chat.whatsapp.com/G9n9CQUCfnCGO5b1UWKKu7

कार्यक्रम समन्वयक:
प्रा. गौतम अमृत वाणी
डॉ. ललितकुमार शनवारे
डॉ. गणेश खुणे

कार्यक्रम आयोजक :
डॉ. रंजित मंडल
प्राचार्य, नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा
डॉ. संजय फुलझेले
प्राचार्य/ग्रंथपाल , महात्मा फुले कला, महाविद्यालय, आष्टी

सपंर्क : 9421273828; 9834772654; 9405898488; 9834337271

Collaboratively Organized by Netaji Subhashchandra Science College Mulchera Mahatma Jyotirao Phule Arts College, Ashti Department of Library and IQAC Cell In Association with: Rajiv Gandhi National Institute of Intellectual Property Management (RGNIIPM), Govt. of India Under the National Intellectua...

25/07/2025
Admission Open For Session 2025-26
08/05/2025

Admission Open For Session 2025-26

B. Sc. Batch Session 2024-25
09/04/2025

B. Sc. Batch Session 2024-25

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे ए. बी. सी.-आय डी वर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन.- विद्यार्थ्यांचा उत्स...
11/02/2025

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे ए. बी. सी.-आय डी वर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

- विद्यार्थ्यांचा उत्सपूर्त प्रतिसाद

मुलचेरा: विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केले आहे. त्यानुसार महाविद्यालयीन शिक्षण घ.....

https://sahyandrinews.com/?p=12916नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे ए. बी. सी.-आय डी वर एकदिवसीय कार्यश...
11/02/2025

https://sahyandrinews.com/?p=12916

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे ए. बी. सी.-आय डी वर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

विद्यार्थ्यांचा उत्सपूर्त प्रतिसाद

मुलचेरा: विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केले आहे. त्यानुसार महाविद्यालयीन शिक्षण घ.....

* वाचन प्रेरणा दीना प्रीत्यर्थ ग्रंथ प्रदर्शन *स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे ग्रंथालय विभाग...
15/10/2024

* वाचन प्रेरणा दीना प्रीत्यर्थ ग्रंथ प्रदर्शन *

स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे ग्रंथालय विभागातर्फे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रित्यर्थ वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजीत मंडल यांच्या शुभ हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीप्रित्यर्थ प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्याना अवांतर वाचन पुस्तकांची ओडख व्हावी या उद्देशाने अवांतर वाचन पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य मंडल सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभाग प्रमुख गौतम वाणी यांनी केले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद डॉ. हरिशिव प्रसाद , डॉ. ललित शनवारे, डॉ. सचिन शेंडे, डॉ. दयाल रॉय, डॉ . अशोक शेंडे, प्रा. पुस्तोडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनीचे बॅडमिंटन खेळामध्ये सुयश *मुलचेरा -  गों...
07/10/2024

*नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनीचे बॅडमिंटन खेळामध्ये सुयश *

मुलचेरा - गोंडवाना विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथील विद्यार्थिनी स्नेहा हलदार तथा विद्यार्थी अभिषेक देबनाथ, कार्तिक चटारे व इंद्रजीत मित्रा या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच स्मृतिचिन्ह देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिले. कुमारी स्नेहा हलदर हीची विद्यापीठ बॅडमिंटन खेळामध्ये निवड करण्यात आली तर मुलांच्या बॅडमिंटन चम्मु ने विद्यापीठ स्तरावर तिसरे स्थान प्राप्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजीत मंडल , सेवानिवृत्त प्राचार्य खराती सर, डॉक्टर स्वपन बाचार उपस्थित होते.

महारष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांना मुलचेरा येथील शालेय विद्यार्थी करिता नियमित ब...
07/10/2024

महारष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांना मुलचेरा येथील शालेय विद्यार्थी करिता नियमित बस सुरळीत चालू ठेवण्याकरिता निवेदन देताना नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजीत मंडल, डॉ. शनवारे, प्रा. गौतम वाणी

Address

Mulchera
Gadchiroli
442707

Alerts

Be the first to know and let us send you an email when Netaji Subhashchandra Science College Mulchera posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Netaji Subhashchandra Science College Mulchera:

Share