Shankarrao Satav College, Kalamnuri

Shankarrao Satav College, Kalamnuri Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shankarrao Satav College, Kalamnuri, College & University, Hingoli Road, Kalamnuri.

NAAC visit at college on 26, 27 May, 2024
04/06/2024

NAAC visit at college on 26, 27 May, 2024

23/03/2024
कै. डॉक्टर शंकरराव सातव कला, वाणिज्य महाविद्यालय कळमनुरी समाजशास्त्र विभागाच्या  वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाज दर्...
09/03/2024

कै. डॉक्टर शंकरराव सातव कला, वाणिज्य महाविद्यालय कळमनुरी समाजशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाज दर्पण भितीपत्रकाच्या सदरातील महिला दिन विशेषांक प्रकाशित करण्यात आला. या अंकाचे विमोचन लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. सुरेखा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समाजशास्त्र विभागाचे डॉ. शिवाजी वायभासे समाजशास्त्र विभागाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या भीतीपत्रिकाचे रेखाटन कु. रूपाली कस्तुरे, कु. वैष्णवी चौधरी, कु. अनुप्रिया धवसे तसेच आरती, नेहा इत्यादी विद्यार्थिनींनी केले.

28/02/2024
शंकरराव सातव कला व वाणिज्य महाविद्यालय कळमनुरी येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच...
02/10/2023

शंकरराव सातव कला व वाणिज्य महाविद्यालय कळमनुरी येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांचे जीवन व कार्य या विषयावर समाजशास्त्र विभागाच्या वतीने समाज दर्पण या भितीपत्रका सदरातील विशेषांकाचे विमोचन मराठी विभाग प्रमुख प्रा.टी. जे कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर सुरेखा शिंदे मॅडम डॉक्टर डी के खोकले सर , समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी वायभासे तसेच समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते ज्यामध्ये कुमारी वैष्णवी चौधरी, रूपाली कस्तुरे,नेहा, आरती बाभुळकर अनुप्रिया धवसे इत्यादी विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

सातव महाविद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम..कळमनुरी येथील कै डॉ शंकरराव सातव महाविद्यालयात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्...
27/02/2023

सातव महाविद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम..
कळमनुरी येथील कै डॉ शंकरराव सातव महाविद्यालयात
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रूग्णालय यांचे वतीने एच.आय.व्ही.प्रतिबंध जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून कै डॉ शंकरराव सातव महाविद्यालयात सुर्यप्रकाश बहुउद्देशीय सेवा संस्था खरवड चे शाहिर प्रकाश दांडेकर व शाहिर रमेश गिरी यांचे संचाचा एड्स जनजागृती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी एड्स संसर्ग, उपाय योजना व शासनाच्या विविध योजना आदी चा प्रचार करणारे व जनजागृती करणारे प्रबोधनात्मक गीते सादर केले.आय.सी.टी.सी.चे समुपदेशक आनंद चरण यांनी मार्गदर्शन केले.तसेच प्राचार्य डॉ.बबन पवार यांनी ही विचार मांडले. शाहिर प्रकाश दांडेकर यांचे समवेत श्रीरंग दांडेकर, किरण दांडेकर, नामदेव दिपके, वंदना खरात,केशव भोरगे यांचे संघाने गीत सादर केले. यावेळी ओ.आर.डब्यु शारदा लेकुळे,एस.डी.एच समुपदेशक चंद्रकांत कोलते तसेच कार्येक्रमाधिकारी प्रा.के.एच.वाघमारे, डॉ एम.व्ही.भोसले.डॉ आर.एस.मुसळे, प्रा.टी.जे.कदम, डॉ.एस.एल पैठणकर, डॉ.आर.एम.कस्तुरे,प्रा.प्रमोद इंगोले डॉ सुरेखा शिंदे, डॉ.एस.व्ही.वायभासे, डॉ.डी.के.खोकले,प्रा.डी.बी.केंद्रे, ग्रंथपाल प्रा.डी.डी.कव्हर,डॉ एम एम इंगळे यांचे समवेत महाविद्यालयातील विद्यार्थी यांची उपस्थिती होती

सातव महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न....कै डॉ शंकरराव सातव महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१...
20/01/2023

सातव महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न....

कै डॉ शंकरराव सातव महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये यश संपादन केलेल्या गुणवंतांचा पारितोषिक वितरण सोहळा काल महाविद्यालयात सुप्रसिद्ध साहित्यिक व मालदीव येथे पार पडलेल्या सहाव्या शब्द विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ नागनाथ पाटील यांचे उपस्थितीत संपन्न झाला.या कार्येक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बबन पवार हे होते.
या कार्यक्रमात गुणवंताना मान्यवरांच्या हस्ते
महाविद्यालयाच्या वतीने व वैयक्तिक स्वरुपात देण्यात येणारी पारितोषिके देण्यात आली. प्रथम महाविद्यालयाच्या वतीने कला शाखेत प्रथम वर्षात प्रथम कु पतंगे ॠतुजा,द्वितीय वर्षात प्रथम कु.सातभाई चैताली व तृतीय वर्षात प्रथम मोकळे राजु तसेच वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षात प्रथम कु.भोजे अंजली,द्वितीय वर्षात प्रथम कु मगर शिवशक्ती व तृतीय वर्षात प्रथम डवरे पवन या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्याच बरोबर वाणिज्य शाखेतील तिन्ही वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना व १२ वीला सर्वाधिक गुण घेऊन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांला डॉ. आर.एस.मुसळे यांचे वतीने अनुक्रमे कु.अंजली भोजे,कु.मगर शिवशक्ती डवरे पवन व भालेराव नागेश यांना कै.श्यामराव मुसळे स्मृतीप्रीत्यर्थ व कै.गयाबाई मुसळे स्मृतीप्रीत्यर्थ रोख रकमेच्या स्वरूपात एकुण चार पारितोषिक देण्यात आली.
तसेच कला शाखेतील विद्यार्थ्यांना मराठी विभागाच्या वतीने
प्रा.टी.जे.कदम यांचे वतीने कै जयराम कदम स्मृतीप्रीत्यर्थ पारितोषिक राजु मोकळे यास व मराठी विषयात प्रथम येणारी कु.साक्षी कदम हीला प्रा.प्रमोद इंगोले यांचे वतीने कै.किशनराव इंगोले स्मृतीप्रीत्यर्थ पारितोषिक व सौ.माधुरी वाकडे यांच्या वतीने कै.कु.रोहीणी वाकडे स्मृतीप्रीत्यर्थ पारितोषिक देण्यात आली.
हिंदी मध्ये प्रथम येणाऱ्या सय्यद अझहर या विद्यार्थ्याने डॉ.एस.एल.पैठणकर यांच्या वतीने दिला जाणारा कै.सौ.भागेरथाबाई पैठणकर स्मृतीप्रीत्यर्थ पुरस्कार प्राप्त केला.
इतिहास विभागाच्या वतीने, प्राचार्य डॉ बबन पवार यांचे वतीने कै.तोलाजी पवार स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारे पारितोषिक कु.कदम साक्षी,तर कै.मंगलाबाई पवार स्मृतीप्रीत्यर्थ पुरस्कार इतिहास विषयात प्रथम आलेल्या चंद्रकिशोर बुलबुले याला मिळाला.तसेच डॉ महेंद्र इंगळे यांचे वतीने प्रथम वर्षात इतिहास विषयात प्रथम कु.गुजरे नेहा व द्वितीय वर्षात इतिहास प्रथम मस्के पवन यांना कै.मोतीराम रामजी इंगळे स्मृतीप्रीत्यर्थ पारितोषिके देण्यात आली.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ मारोती भोसले यांचे वतीने तिन्ही वर्गात अर्थशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या अनुक्रमे कु.लोंढे दिव्या,सय्यद अफताब व पाचपुते कानबाराव यांना कै.विठ्लराव भोसले व कै.रुखमिणीबाई भोसले स्मृतीप्रीत्यर्थ पारितोषिके देण्यात आली.
लोकप्रशासन विभागाच्या वतीने लोकप्रशासन विषयात प्रथम येणारे घोटेकर निखील,कु.पंचलिगे प्रिती व मोकळे राजु यांनी डॉ.सुरेखा शिंदे याने यांचे वतीने कै.सिताबाई माने स्मृतीप्रीत्यर्थ,कै.रामराव माने स्मृतीप्रीत्यर्थ व कै.सदाशिवराव शिंदे स्मृतीप्रितीर्थ पारितोषिके व डॉ डी.के.खोकले यांचे वतीने कै.बहिर्जी खोकले स्मृतीप्रीत्यर्थ व कै.सोनाबाई खोकले स्मृतीप्रीत्यर्थ पारितोषिके पटकावली.
तसेच महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक अशोक जटाळे यांचे वतीने कला व वाणिज्य शाखेतुन प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारे कै.गयाबाई जटाळे स्मृतीप्रीत्यर्थ पारितोषिके कु.गुहाडे ज्योतीका व डवरे पवन यांना तर कै.मुक्ताबाई जटाळे स्मृतीप्रीत्यर्थ पारितोषिक वानोळे देवानंद याला देण्यात आले.
तसेच ग्रंथपाल डी डी.कव्हर यांचे वतीने देण्यात येणारे कै नामदेवराव कव्हर स्मृतीप्रित्यर्थ पारितोषिक १२ वी कला शाखेत सर्वाधिक गुण घेऊन प्रथम वर्षात प्रवेशीत होणारा वायकोळे संकेत याला मिळाले.तसेच वाणिज्य द्वितीय वर्षात असलेली विद्यार्थ्यांनी कु निशा सोनवणे हीला डॉ सुरेखा शिंदे यांचे वतीने विशेष पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा प्रमोद इंगोले यांनी केले.यावेळी मंचावर प्रा डॉ सतिष तिवारी,प्रा.टी.जे.कदम यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा प्रमोद इंगोले यांचे समवेत डॉ.मारोती भोसले, डॉ.सतिष तिवारी, डॉ.सतिष पैठणकर, डॉ.डी.के.खोकले,प्रा.डी.बी.केद्रें प्रा.डी.डी.कव्हर,श्री.विजय पाटील श्री.अशोक जटाळे, नागोराव सुरोशे, कौशिक जटाळे व मांगीलाल चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी,पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

सातव महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा...कळमनुरी येथील कै डॉ शंकरराव सातव महाविद्यालयात राजमाता जिजाऊ मॉं साहेब व स...
12/01/2023

सातव महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा...

कळमनुरी येथील कै डॉ शंकरराव सातव महाविद्यालयात राजमाता जिजाऊ मॉं साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.बबन पवार यांचे हस्ते प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने
याप्रसंगी माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रिय कार्यालय नांदेड महाराष्ट्र आणि सुर्यप्रकाश बहुउद्देशीय सेवा संस्था खरवड ता कळमनुरी जिल्हा हिंगोली व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने
राष्ट्रीय युवा दिना निमित्त विशेष प्रचार कार्येक्रम घेण्यात आला. शाहिर प्रकाश दांडेकर , श्रीरंग दांडेकर,संजय दांडेकर व किरण दांडेकर यांचे संचाने राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती आदी विषयांवर गीत व पोवाडे सादर करीत प्रबोधनाचा कार्येक्रम संपन्न झाला.

विभागीय कबड्डी स्पर्धाना सातव महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रारंभ...स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व कै ड...
17/10/2022

विभागीय कबड्डी स्पर्धाना सातव महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रारंभ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व कै डॉ शंकरराव सातव महाविद्यालय कळमनुरी यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मुले व मुलींच्या विभागीय कबड्डी स्पर्धांचे उद्घघाटन बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडा संचालक हरिभाऊ रावळे यांचे हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. यु.डी.इंगळे,ड झोन चे सचिव डॉ मिनानाथ गोमचाळे, विद्यापीठ माजी संचालक मनोज रेड्डी,माजी संचालक माने कबड्डी चे खेळाडू खंडबाराव नाईक, निवृत्ती बांगर यांची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रारंभ झाला.नंतर मान्यवरांचा स्वागत समारोह पार पडला.विद्यापीठ निवड समितीचे डॉ चंद्रकांत सातपुते,डॉ.नवनाथ लोखंडे, डॉ ज्योतीराम चव्हाण
यांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ मनोज रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्येक्रमाचा तर अध्यक्षीय समारोप डॉ बबन पवार यांनी केला. कार्येक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा.प्रमोद इंगोले यांनी केले.
या स्पर्धेसाठी चार झोन चे विजेते मुली मुलांचे संघ यांच्यात हे सामने होणार आहेत.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत.विभागीय कबड्डी स्पर्धाना सातव महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रारंभ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व कै डॉ शंकरराव सातव महाविद्यालय कळमनुरी यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मुले व मुलींच्या विभागीय कबड्डी स्पर्धांचे उद्घघाटन बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडा संचालक हरिभाऊ रावळे यांचे हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. यु.डी.इंगळे,ड झोन चे सचिव डॉ मिनानाथ गोमचाळे, विद्यापीठ माजी संचालक मनोज रेड्डी,माजी संचालक माने कबड्डी चे खेळाडू खंडबाराव नाईक, निवृत्ती बांगर यांची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रारंभ झाला.नंतर मान्यवरांचा स्वागत समारोह पार पडला.विद्यापीठ निवड समितीचे डॉ चंद्रकांत सातपुते,डॉ.नवनाथ लोखंडे, डॉ ज्योतीराम चव्हाण
यांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ मनोज रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्येक्रमाचा तर अध्यक्षीय समारोप डॉ बबन पवार यांनी केला. कार्येक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा.प्रमोद इंगोले यांनी केले.
या स्पर्धेसाठी चार झोन चे विजेते मुली मुलांचे संघ यांच्यात हे सामने होणार आहेत.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आंतरमहाविद्यालयीन कब्बडी स्पर्धेसाठी महाविद्यालयाचा संघासमवेत प्राचार्य ड...
08/10/2022

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आंतरमहाविद्यालयीन कब्बडी स्पर्धेसाठी महाविद्यालयाचा संघासमवेत प्राचार्य डॉ बबन पवार,क्रीडा विभाग प्रमुख डॉ.एस.के.तिवारी.डॉ.आर.एम.कस्तुरे व प्रा.प्रमोद इंगोले.

Address

Hingoli Road
Kalamnuri
431702

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shankarrao Satav College, Kalamnuri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Shankarrao Satav College, Kalamnuri:

Share