07/01/2023
https://www.facebook.com/kokannow/photos/a.1729260190434127/6536870286339736/
" शिष्यवृत्ती परीक्षेत आयडियल स्कूल चे नेत्रदीपक यश" राष्टीय ग्रामीण गुणवत्ता यादीत कु.शार्दूल ठाकूर जिल्ह्यात सहावा तर ग्रामीण अनुसूचित जातीमध्ये कु.आदिती पवार जिल्ह्यात पहिली
कणकवली - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जुलै २०२२ ला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती (८ वी) परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेच्या विध्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
*परीक्षेतील गुणवत्ता धारक विध्यार्थी खालीलप्रमाणे
५ वी
१) कु.तनय सिद्धेश नातू (७९.८६) ग्रामीण सर्वसाधारण रँक - ४२
८ वी
१) कु.शार्दूल निलेश ठाकूर (७८.५२) राष्टीय ग्रामीण गुणवत्ता ,रँक - ६
२) कु.आदिती देऊ पवार (५३.२) ग्रामीण अनुसुचित जाती, रँक - १
३) कु.मयुरेश शाम सोनूरलेकर (६९.१३) ग्रामीण सर्वसाधारण ,रँक - ६
४) कु.विवेक रणजित पाटील ( ६९.१२) ग्रामीण सर्वसाधारण ,रँक - ७
५) कु.मैत्रेय निलेश पेंडूरकर ( ५९) ग्रामीण सर्वसाधारण ,रँक- ३५
६) कु.दिया जयराम प्रभूदेसाई ( ५५.२०) ग्रामीण सर्वसाधारण रँक - ६०
सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत ,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,सचिव श्री. हरिभाऊ भिसे, सहसचिव श्री.निलेश महेंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री.डी.पी.तानावडे, मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे
कणकवली/मयूर ठाकूर