19/05/2026
कारंजाची कन्या अनुष्का डोणगांवकर हिला बोस्टन युनिव्हर्सिटीतून 'मास्टर ऑफ सायन्स' पदवी प्रदान; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव!
कारंजा लाड (प्रतिनिधी):
स्थानिक कारंजा नगरीतील प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक डॉ. शार्दूल डोणगांवकर आणि डॉ. स्नेहल डोणगांवकर यांची सुकन्या कु. अनुष्का शार्दूल डोणगांवकर हिने जागतिक स्तरावर कारंजा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अनुष्काने अमेरिकेतील नामांकित बोस्टन युनिव्हर्सिटीमधून 'मास्टर ऑफ सायन्स इन बायोइन्फॉर्मेटिक्स' (Master of Science in Bioinformatics) ही पदवी अत्यंत घवघवीत यश मिळवून संपादन केली असून, विद्यापीठाच्या वतीने तिला नुकतेच विशेष सन्मानित करण्यात आले आहे.
अनुष्काचा शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण राहिलेला आहे. तिने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण (इयत्ता १ ली ते १० वी) कारंजा येथील नामांकित आर.जे. सी. हायस्कूल येथून पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच ती अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून परिचित होती. माध्यमिक शिक्षणानंतर तिने अकोला येथून आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर देशातील नामांकित वेल्लोर येथून उच्च शिक्षण घेतल्यानंतर, तिने थेट अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटी गाठली आणि तिथेही आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला व यूनिवर्सिटी मधे गुणवत्ता यादित द्वितीय आली आहे
तिला पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा