NCC UNIT GS College Khamgaon

NCC UNIT GS College Khamgaon It is a 13 Maharashtra Battalion NCC Unit Khmagaon official

Blood Donation Camp 2025
30/04/2026

Blood Donation Camp 2025

गो से एनसीसी महाविद्यालय एन.सी.सी कॅडेटची सैन्य व अर्धसैनिक दलात भरारी; महाविद्यालयाच्या मुलींचीही चमकदार कामगिरीखामगाव ...
07/03/2026

गो से एनसीसी महाविद्यालय एन.सी.सी कॅडेटची सैन्य व अर्धसैनिक दलात भरारी; महाविद्यालयाच्या मुलींचीही चमकदार कामगिरी

खामगाव येथील गो. से. महाविद्यालयाच्या एन.सी.सी युनिटमधील कॅडेटनी पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या एन.सी.सी युनिटमधील 10 कॅडेटची या २०२५ – २०२६ वर्षी भारतीय सैन्य व अर्धसैनिक दलामध्ये निवड झाली असून महाविद्यालयाची यशस्वी परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.

एन.सी.सी ए.एन.ओ. लेफ्टनंट सुहास पिढेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एन.सी.सी मधील कॅडेट संजय तुकाराम पाहूरकर, कॅडेट जयेश विजय यादगिरे, कॅडेट प्रशांत सुरेश मोरे व कॅडेट ज्योत्स्ना प्रकाश भिडे तसेच कॅडेट रवीना समाधान भिडे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. कॅडेट अजय चंद्रकांत देवताडू व कॅडेट स्नेहा गोपाल मनसुटे यांची बी.एस.एफ, कॅडेट प्रतीक शंकर क्षीरसागर व कॅडेट सुष्मिता सखाराम बाभुळकर यांची सी.आय.एस.एफ मध्ये तर कॅडेट विशाल यादव ची निवड हि आसाम रायफल मध्ये झाली आहे

27/02/2026
राष्ट्रीय स्तरावर गो. से. महाविद्यालयची दमदार कामगिरीकुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते व ब्रिगेडियर सचिन गवळी यांच्या हस्ते २६...
27/02/2026

राष्ट्रीय स्तरावर गो. से. महाविद्यालयची दमदार कामगिरी
कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते व ब्रिगेडियर सचिन गवळी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी अमरावती येथे सन्मान

खामगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) गट मुख्यालय, अमरावती यांच्या वतीने दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम विद्या भारती महाविद्यालय, अमरावती येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती चे कुलगुरू मा. डॉ. मिलिंद बारहाते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच एनसीसी अमरावती ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सचिन गवळी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावर्षी गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव यांनी एनसीसी क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करत “उत्कृष्ट एनसीसी महाविद्यालय” हा मान पटकावला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांची “उत्कृष्ट प्राचार्य” म्हणून तर लेफ्ट. सुहास पिढेकर यांची “उत्कृष्ट एएनओ” म्हणून निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयातील कॅडेट्सनी राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश संपादन केले आहे. एसयूओ हर्षल किरण पाटील आणि जेयूओ साक्षी विजय अहिरकर यांनी पीएम रॅली २०२६ तसेच पुणे ते दिल्ली सायकल मोहिमेत सहभाग नोंदवून दिल्ली येथे महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. तसेच थल सैनिक कॅम्प (टीएससी) २०२५ मध्ये जेयूओ विश्वजीत इंगळे यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला. रिपब्लिक डे कॅम्प (आरडीसी) २०२६ मध्ये जेयूओ राष्ट्रपाल जयपाल गवार गुरु यांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ या मानाच्या प्रकारात सहभाग घेत दिल्ली येथे महाविद्यालयाची पताका फडकावली. विशेष म्हणजे पीएम रॅली, टीएससी आणि आरडीसी या तिन्ही राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये महाविद्यालयातील कॅडेट्सचा सहभाग राहिला असून हा अभिमानास्पद त्रिवेणी यशाचा मान महाविद्यालयाने प्राप्त केला आहे.

आज रोजी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ व गो.से. महाविद्यालय खामगाव प्राचार्य डॉ. डी एस तळवणकर यांच्या हस्ते 26 जानेवारी 2026...
26/01/2026

आज रोजी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ व गो.से. महाविद्यालय खामगाव प्राचार्य डॉ. डी एस तळवणकर यांच्या हस्ते 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी मला उत्कृष्ट ANO याबद्दल सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाच्या एनसीसी युनिट मधून चार एनसीसी कॅडेट 1.अजय देवताडू 2.सुष्मिता बाभुळकर 3.स्नेहा मनसुटे आणि 4. प्रतीक क्षीरसागर हे एनसीसी कॅडेट भारतामधील अर्धसैनिक दलामध्ये यांची निवड करण्यात आली त्यानिमित्त यांचा सत्कार हा विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडून करण्यात आला त्याचबरोबर उत्कृष्ट कार्य करणारे एनसीसी कॅडेट यांच्या सुद्धा सत्कार आज सन्माननीय सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडून करण्यात आला.

महाराष्ट्र शासन, महसूल विभाग तर्फेखामगांव उपविभागीय अधिकारी माननिय डॉ.रामेश्वर पुरी यांचे हस्ते 26 जानेवारी 2026 रोजी प्...
26/01/2026

महाराष्ट्र शासन, महसूल विभाग तर्फे
खामगांव उपविभागीय अधिकारी माननिय डॉ.रामेश्वर पुरी यांचे हस्ते 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात NCC अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले..

30/12/2025

G.S.College NCC Cadet Participate in Cycle EXPIDITATION Pune to Delhi

Address

13 Maharashtra Battalion NCC Khamgaon Diast. Khamgaon
Khamgaon
444303

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCC UNIT GS College Khamgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to NCC UNIT GS College Khamgaon:

Share