02/02/2022
प्रा.सचिन भोसले यांना पीएचडी
खेड,ता.२ः राजस्थान येथील जेजेटीयू विद्यापीठाची पीएचडी पदवी येथील आय.सी.एस.महाविद्यालयातील हिराचंद बुटाला माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन संकुलाचे समन्वयक प्रा.सचिन भोसले यांना प्राप्त झाली आहे. इसटीम्टीग द इफेक्ट ऑफ़ बिज़नेस इंटेलिजेंस ऑन एस एम एस अ केस स्टडी बेसड ऑपरोच ऑन मॉगो इंडस्ट्री कोंकण रीजन हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आणि आंबा फळापासून तयार केली जाणारी उत्पादने यामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाचा कसा उपयोग केला जावू शकतो या विषयावर त्यांनी प्रमुख्याने संशोधन केले आहे. याबाबत त्यांनी मुंबईचे डॉ.राजेन्द्र पाटील व पुण्य़ाच्या डॉ.अर्चना भीसे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासपूर्ण संशोधन केले. ते सादर केले आणि त्याला मान्यता मिळाली आहे. या संशोधनाचा सर्व स्तरातील सर्व संशोधक विद्यार्थी आणी कोकणातील व्यवसायिक तसेच व्यवस्थेला कॉलेज गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोग होईल याची खात्री वाटते असे प्रा.सचिन भोसले यांनी सकाळ ला सांगितले. त्यांनी मिळवलेल्या या पदवी बद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हीराभाई बुटाला, सेक्रेटरी मंगेशभाई बुटाला, आय सी एस कॉलेज चे चेअरमन अंनदराव भोसले संचालक उत्तमकूमार जैन व सर्व संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. जी बी सारंग यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर साळवी यांनी ही पत्रकार संघ वतीने पुष्पगुच्छ देवून अभीनंदन केले🌹👍
--------