Madrasa Islahul Atfal K.G And Primary School

Madrasa Islahul Atfal K.G And Primary School Education is one of the strong pillar to be a good human..

04/12/2025
13/05/2025

*एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर काॅलेजचा एस.एस.सी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
खेड-शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर काॅलेजचा एस.एस.सी फेब्रुवारी-2025 परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेतील विद्यार्थिनी अरसीन वहाब टेटवलकर-91.60%, मरयम जावेद चौगले आणि माहीन महमद पटेल -91.20%, अलफीया महमद चिपळूणकर-89.60%, सुरैया जमिरुल्लाह खान 89.20% तर शिफा उस्मान डावरे 89.00%गुणांसह अनुक्रमे एक ते पाच क्रमांकांनी उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थिनी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे मा.संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब सर, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका श्रीमती.रुबीना कडवईकर मॅडम, माजी मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

22/10/2024
21/10/2024

*एम.आय.ए.केजी एण्ड प्रायमरी स्कूलमध्ये नवीन पदभरती*
खेड-शहरातील ए.ई.कालसेकर कॅम्पसस्थित बज्म-ए-इमदादीयाच्या अल्पसंख्यांक विनाअनुदानित एम.आय.ए केजी एण्ड प्रायमरी स्कूलमध्ये एच.एस.सी डी.एड उर्दू माध्यमाची तीन पदे नव्याने भरण्यात येत आहेत.शासनमान्य संस्थेतून शिकलेले उमेदवार टी.ई.टी पेपर-1 उत्तीर्ण तसेच संगणकाच्या मूलभूत ज्ञानासह उर्दू, मराठी व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असणारे असावेत.अनुभवाला प्राधान्य देण्यात येईल. तरी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी आपला बायोडाटा 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत शाळेच्या पत्त्यावर किंवा [email protected] या ईमेलवर पाठवावेत असे मा.संस्थाध्यक्ष(९४२२३९१२६६) व मा.मुख्याध्यापक(९९२३५५४७१६) यांनी आवाहन केले आहे.

04/09/2024

*Vacancy for the Post of Principal*

M.I.B Girls High School, Khed
(Aided School)

Qualification: M.Sc., B.Ed. with Physics

Experience: Five years

Approval from EO is a must.

*मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सरांचा निरोप समारंभ 25 ऑगस्ट रोजी संपन्न*खेड-शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.ए केजी एण्...
25/08/2024

*मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सरांचा निरोप समारंभ 25 ऑगस्ट रोजी संपन्न*
खेड-शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.ए केजी एण्ड प्रायमरी व एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजचे मा.मुख्याध्यापक शहाबुद्दीन सईद परकार सर हे नियतवयोमानानुसार 31ऑगस्ट 2024 रोजी निवृत्त होत आहेत. संस्थेमार्फत त्यांच्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन ए.ई.कालसेकर कॅम्पस खेड येथे रविवार दि.25 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:00 वाजता मा.संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब सरांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक 'कोकण की आवाज' चे मा.संपादक दिलदार पुरकर सर आणि रोटरी प्रतिष्ठाणचे मा.अध्यक्ष बिपीन दादा पाटणे सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात खदीजा अंतुलेच्या कुरआन पठणाने करण्यात आली. मेहबुबी दुदुकेने नात-ए-पाकचे गायन केले. रहीमा बेबल एण्ड ग्रुपने स्वागत गीताचे सुरेख गायन केले. यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ तसेच सत्कारमूर्ती परकार सरांचे संस्था, शाळा व हितचिंतकांकडून भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थितांपैकी निसार खतीब, सिकंदर जस्नाईक, संभाजी देवकाते, दावर अंदलीब, जैनुद्दीन परकार, सिराज मोमीन, हलीमा परकार, तबस्सुम परकार, प्रशांत खेडेकर, बशीर सनगे आणि शौकत महाते इत्यादींनी शहाबुद्दीन सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यांचे कौतुक केले.
प्रमुख पाहुणे असलेल्या पाटणे सरांनी संस्थेच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेताना सत्कारमूर्ती परकार सरांच्या कार्यावर प्रकाश टाकताना त्यांच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी पुरकर सरांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख वाचताना परकार सरांचे कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक परकार सरांनी आपल्या मनोगतात सुरुतीच्या काळापासून आपल्या सेवेतील अनेक उदाहरणे देताना बज्म परिवारातील दिवंगत तसेच विद्यमान पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त सहकार्य, आपुलकी व प्रेमाबद्दल आदर व्यक्त करताना सर्वांना धन्यवाद दिले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात खतीब सरांनी उदाहरणांसह गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व लक्षात आणून देताना परकार सरांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्नेहल खेडेकर यांच्या आभारप्रदर्शनाने समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन झियाऊर रहमान खान आणि सनोबर काणेकर यांनी केले होते. यावेळी संस्थाचालक, शिक्षक, पालक, नातेवाईक, हितचिंतक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

*एम.आय.बी.गर्ल्सच्या अमल सिद्दीकीची रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघात निवड*
05/03/2024

*एम.आय.बी.गर्ल्सच्या अमल सिद्दीकीची रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघात निवड*

होय..मीच..किरण सामंत म्हणून लोकसभेच्या निवडणुकीचे काम करण्याचा रत्नागिरी माजी नगरसेवकांनी केला निर्धार

एम.आय.बी.गर्ल्सच्या अमल सिद्दीकीची रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघात निवडखेड-शहरातील एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर...
05/03/2024

एम.आय.बी.गर्ल्सच्या अमल सिद्दीकीची रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघात निवड
खेड-शहरातील एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमधील इ.६वी ची विद्यार्थिनी कुमारी.अमल सलीम सिद्दिकी ही खेड क्रिकेट अकॅडमीतून खेळाचे धडे घेत आहे. तिची १५ वर्षांखालील रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे. अभ्यासात हुशार असणारी अमल ही एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे तसेच प्रशिक्षक व पालकांचे मा.संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब सर, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.

Address

A. E Kalsekar Educational Campus, Near Government Rest House, Daak Bangla
Khed
415709

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madrasa Islahul Atfal K.G And Primary School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Madrasa Islahul Atfal K.G And Primary School:

Share