12/08/2026
ज्ञानदीपाला विनम्र अभिवादन
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी डॉ. संजय डी. पाटील, डॉ. विजय पाटील, आमदार सतेज पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, डॉ. नंदिनी पालशेतकर, डॉ. प्रिया चोलेरा, डॉ. शिवानी विजय पाटील, सौ. पूजा अजिंक्य पाटील, डॉ. प्रदीप पालशेतकर, डॉ. रश्मित चोलेरा यांच्यासह डी. वाय. पाटील कुटुंबीय आणि संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते.
शिक्षण, समाजसेवा, क्रीडा आणि मानवतेच्या क्षेत्रात दादासाहेबांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कार्यातून प्रज्वलित झालेला ज्ञानाचा दीप असंख्य पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील.
राजकारण, शिक्षण, क्रीडा, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दादासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली व पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दादासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.