Sou S M Lohia Highschool & Jr. College स म लोहिया हायस्कूल

  • Home
  • India
  • Kolhapur
  • Sou S M Lohia Highschool & Jr. College स म लोहिया हायस्कूल

Sou S M Lohia Highschool & Jr. College स म लोहिया हायस्कूल Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sou S M Lohia Highschool & Jr. College स म लोहिया हायस्कूल, College & University, New Mahadwar Road, Petala, Kolhapur.

१ नोव्हेंबर १९६९ रोजी स्थापन झालेली 'एस. एम. लोहिया हायस्कूल' ही कोल्हापुरातील एक अग्रगण्य शाळा असून, ती 'न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर'च्या इतिहासाची शान वाढवणारी संस्था आहे. सध्या या शाळेत २२००+विद्यार्थी आणि ७५ शिक्षक आहेत.

🎤✨ *सौ. स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, कोल्हापूर* ✨🎤📖 *‘स्वरचित काव्यवाचन स्पर्धा’*📝🌟 महाविद्यालयात विद्यार्थ्या...
09/08/2026

🎤✨ *सौ. स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, कोल्हापूर* ✨🎤

📖 *‘स्वरचित काव्यवाचन स्पर्धा’*📝

🌟 महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ८ ऑगस्ट २०२६ रोजी सांस्कृतिक विभागामार्फत *‘स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे’* आयोजन करण्यात आले.
📖✨ या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या स्वतःच्या स्वरचित कवितांचे भावपूर्ण व प्रभावी सादरीकरण केले. 👏
🌸 विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना, भावना आणि सर्जनशीलतेला वाव मिळावा, त्यांच्या काव्यप्रतिभेला व्यासपीठ मिळावे आणि आत्मविश्वासाला नवी उंची मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
📝🌟 *“शब्दांना मिळाले भावनांचे पंख...*
*आणि कवितेला मिळाला स्वर!”*🌟
👨‍🏫 .
प्राचार्य *सौ. एस. बी. पाटील मॅडम* व उपप्राचार्य *सौ. जी. पी. नानिवडेकर* मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाच्या प्राध्यापक वृंदांनी स्पर्धेचे सुंदर नियोजन केले.या स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक *श्री. पी. बी. ढेरे सर* यांनी केले
🏆📖 स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन! 💐
🌟 तुमच्या सर्जनशील लेखणीला आणि काव्यप्रतिभेला अशीच नवी भरारी मिळत राहो! 🌟
📝❤️ *“शब्द होते स्वतःचे...भावना होत्या मनाच्या...आणि सादरीकरण होते मनमोहक!”* ❤️

08/08/2026

सौ. स. म. लोहिया हायस्कूलमध्ये 'नशा मुक्त भारत अभियान' कार्यक्रम उत्साहात संपन्न

८ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या सौ. स. म. लोहिया हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 'नशा मुक्त भारत अभियान' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्य सौ. एस. बी. पाटील मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. देसाई मॅडम, तसेच पर्यवेक्षक श्री. बी. एस. चोबदार सर व श्री. डी. एस. पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

याप्रसंगी माननीय श्री. रवींद्र कुलकर्णी सर व माननीय श्री. शर्मा सर यांनी विद्यार्थ्यांना नशा मुक्तीचे महत्त्व, व्यसनांचे दुष्परिणाम आणि निरोगी जीवनशैली कशी जगावी याविषयी अतिशय मोलाचे व मार्गदर्शनपर विचार मांडले.

विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाकावे, हा संकल्प या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.

🎶✨ *सौ. स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, कोल्हापूर*✨🎶🎤🎵 *‘कराओके’ गायन स्पर्धा'*🎵🎤🌟  महाविद्यालयात विदयार्थ्यांसाठ...
02/08/2026

🎶✨ *सौ. स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, कोल्हापूर*✨🎶

🎤🎵 *‘कराओके’ गायन स्पर्धा'*🎵🎤

🌟 महाविद्यालयात विदयार्थ्यांसाठी 1 ऑगस्ट 2026 रोजी सांस्कृतिक विभागामार्फत ‘कराओके’ गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

🎶 या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या गायनकलेचे सुंदर सादरीकरण केले. 👏

🌸 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उंची मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

प्राचार्य सौ.एस.बी.पाटील मॅडम, उपप्राचार्य सौ.जी.पी.नानिवडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाच्या प्राध्यापक वृंदांनी स्पर्धेचे सुंदर नियोजन केले.

🏆🎤 स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐
🌟 तुमच्या कलागुणांची अशीच सुंदर भरारी कायम राहो! 🌟
🎶 “कलेला द्या वाव… आत्मविश्वासाला द्या नवी झेप!” 🎶

30/07/2026



*सौ. स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनि. कॉलेज कोल्हापूर मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न.*

दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित, सौ.स.म. लोहिया हायस्कूल व ज्युनि कॉलेज कोल्हापूर मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष *श्री. विनोदकुमार लोहिया* सल्लागार गव्हर्निंग कौन्सिल दि न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मा. *सौ. प्रभावती कोळेकर* शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग या होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती *मा. निर्मलकुमार लोहिया* अध्यक्ष गव्हर्निंग कौन्सिल दि न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर तसेच संस्थेचे सचिव *मा. श्री. प्रभाकर हेरवाडे सर* आणि प्रशालेचे माजी प्राचार्य व संस्थेचे सहसचिव *मा. श्री. एस.एस. चव्हाण सर, मा.श्री. अशोक रोकडे* व्हाईट आर्मीचे संस्थापक हे होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच्या *प्राचार्या सौ. एस. बी. पाटील* यांनी केले. प्रास्ताविकामध्ये प्रशालेमध्ये राबवल्या जाणा-या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेवून शेर्भाणक क्षेत्रात सौ. स. म. लोहिया हायस्कूलने मिळविलेल्या उज्वल यशाचा त्यांनी आढावा घेतला, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या मा. सौ. प्रभावती कोळेकर यांनी सौ. स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनि कॉलेज कोल्हापूर यांनी राबवत असलेल्या विविध अभिनव शैक्षणिक प्रयोगांचे कौतुक करत विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. नेहमी सकारात्मक ऊर्जेचा वापर करून जिद्द, कष्ट आणि प्रामाणिक पणाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशिल रहावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी सौ.स.म.लोहिया हायस्कूलच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

यावेळी श्री. सागर बगाडे यांचा अटल बिहारी वाजपेयी सेवा सन्मान पुरस्कार मिळालेबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता १० वी १२ वी ९० टक्केच्या वरील विद्यार्थ्यांचा तसेच इ.५ वी ८ वी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, एन सी. सी., गणित प्रज्ञा, एन.एम.एम.एस. परीक्षेत उज्चल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे आभार ज्युनि. कॉलेजच्या उपप्राचार्या सौ. गौरी नानिवडेकर यांनी मांडले. बक्षिस पात्र विद्यार्थ्यांचे यादी वाचन श्री. सचिन शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. गोमटेश्वर माळी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सौ. स. म. लोहिया हायस्कूल च्या संगीत वाद्यवृंदाने गायलेल्या पसायदानाने झाली.

यावेळी उपमुख्याध्यापिका सौ. एस.ए.देसाई, ज्युनि कॉलेज चे एम. सी. व्ही. सी. विभाग प्रमुख श्री. र्शाशकुमार माने, पर्यवेक्षक श्री. बी. एस. चोपदार, श्री. डी एस. पाटील विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षिका,

**सौ. स. म. लोहिया हायस्कूल, कोल्हापूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी****सौ. स. म. लोहिया हायस्कूल व ज्यु...
29/07/2026

**सौ. स. म. लोहिया हायस्कूल, कोल्हापूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी**

**सौ. स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर** येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि क्षणचित्रे खालीलप्रमाणे:

*** प्रतिमा पूजन व वंदन:
कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास आणि संस्थेच्या पावन स्मृतींना पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.

*** विद्यार्थ्यांचे मनोगत व भाषणे:
विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरून गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगणारी भाषणे केली. गुरुंचे आयुष्यातील स्थान आणि त्यांचे मार्गदर्शन या विषयावर विद्यार्थ्यांनी सुंदर विचार मांडले.

***गीत व संगीत सादरीकरण:
विद्यार्थ्यांनी तबला, ढोलक आणि इतर वाद्यवृंदांच्या साथीने भक्तिगीते आणि समूहगीते सादर करून कार्यक्रमात रंग भरला.

***शिक्षकांचे मार्गदर्शन:
प्रमुख पाहुण्या - सौ ए एस चौगुले मॅडम यांनी जीवनात गुरूंचे महत्त्व स्पष्ट केले.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगून भावी आयुष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन व आशीर्वाद दिले. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. एस बी पाटील मॅडम यांनी चांगल्या गुरूच्या माध्यमातून एक आदर्श व जबाबदार यशस्वी शिष्य निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला.

25/07/2026



2026

Address

New Mahadwar Road, Petala
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sou S M Lohia Highschool & Jr. College स म लोहिया हायस्कूल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share