BSC at RCSCollge Kolhapur

BSC at RCSCollge Kolhapur This is the page where u can be in touch with each other now and after completing ur BSC at shahu college....SO please be in touch with each other & US too

माजी विद्यार्थी मेळावा  ०५/१०/२०१८ १०० वर्ष रयतेची
01/10/2018

माजी विद्यार्थी मेळावा ०५/१०/२०१८
१०० वर्ष रयतेची

05/09/2017

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो
ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे
ज्ञानाची पानं
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या
अस्फुट चित्कांरांना
किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी
लटकेली असतात
कित्येक भावनांच्या डोहात भिजून
नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची
निरागस अक्षरे
शिक्षक नसतो कधीच बिचारा
तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा
त्याच्याच स्वमीत्वाने महत्व येत असते शाळेला
तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ
नखशिखान्त अंधर भरलेल्या चिमूकल्या गोळ्यातून
सूर्याचं तेज बाहेर काढणारा
तो समाज सुधारक क्रांती कारकही तोच
कित्येक चेतनांना पाठबळ असते
त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे
शिक्षकाला जपावी लागतात
कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड
आणि आकार द्यावा लागतो
एका मुक्त पणे बागडणाऱ्या
निराकार चैत्यनाला...
कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं
जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत
निर्ममपणे...
कधी अंधाअ ही प्यावा लागतो बोनबोभाट पणे
तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर
त्याच्या सोबतील असतेच की खडूची धारदार तलवार अन
फळ्याची ढाल असते पाठीशी
विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल.
अन तेंव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल

14/06/2017

*बीए, बीएस्सी बंद होणार*
================
*नवी दिल्ली*, दि. १ (वृत्तसंस्था) - देशातील विद्यापीठांतून शिकवले जाणारे बीए आणि बीएसस्सी पदवी अभ्यासक्रम सध्याच्या हायटेक युगात बेकाम ठरत असून, ते बंद करून त्या जागी प्रभावी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्याचा हायटेक प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आणला आहे. यापुढे देशभरात बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन (बी. व्होक) हा पदवी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. या नव्या डिग्री कोर्सचा अभ्यासक्रम उद्योगजगताच्या मागणीनुसार तयार केला जाणार आहे.
बीए आणि बीएस्सी हे विद्यापीठात शिकवले जाणारे पदवी अभ्यासक्रम सध्याच्या हायटेक युगात रोजगार मिळवून देण्यास सक्षम नसल्याचा दावा यूजीसीने केला आहे. त्यातून केवळ खर्डेघाशी करणारे कारकूनच तयार होत आहेत. त्याऐवजी संगणक युगाशी नाते जोडणारा आणि प्रचलित उद्योगधंद्यासाठी सक्षम कर्मचारी तयार करणारा बी.व्होक. हा अभ्यासक्रम येत्या काही वर्षांत बीए आणि बीएस्स्सी या अभ्यासक्रमांची जागा घेईल, असे प्रतिपादन यूजीसीचे व्हाइस चेअरमन एच. देवराज यांनी केले आहे.

*गुणवत्ता, पायाभूत सुविधा पाहूनच महाविद्यालयांना अनुदान*

भविष्यात देशातील महाविद्यालयांना ते राबविणारे अभ्यासक्रम पायाभूत सुविधा, शिकविल्या जाणार्या शिक्षणाचा दर्जा आणि संशोधनात्मक उपक्रम राबविण्याची क्षमता पाहूनच शैक्षणिक अनुदान दिले जाईल. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षण संस्थांना अधिकाधिक जबाबदार बनविण्याचा यूजीसीचा हेतू आहे, असेही देवराज यांनी सांगितले.

- बी. व्होक हा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम येत्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात देशातील २०० महाविद्यालयांत सुरू केला आहे. त्यानंतर पुढच्या १० वर्षांत तो देशभरातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांत शिकविण्यासाठी समाविष्ट करण्याची घोषणा यूजीसीने केली आहे.
सध्याच्या हायटेक युगात उद्योगक्षेत्राचा चेहरामोहराच बदलला आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाला बीए आणि बीएस्सी या केवळ कारकून घडविणार्या पदवी अभ्यासक्रमांबाबत फेरविचार करावाच लागेल. कारण या पदव्यांच्या बळावर नोकर्याच मिळत नाहीत हे भीषण वास्तव आहे.
- *एच. देवराज, व्हाइस चेअरमन, यूजीसी*

01/05/2017

गर्व आहे महाराष्ट्रीय असण्याचा😘🚩
अभिमान आहे ढोल ताशा च्या कलेचा😍🎶
जपतो आपली महाराष्ट्राची संस्कृती🙏
निष्ठा आहे आपल्या मराठी मातीशी🙌🏻!!
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा😇🙏
*।।जय महाराष्ट्र।।*
😘🎶🔔🔨💪😎🚩😍

10/03/2017

🌞🚩
■ *पेप्सी-कोक, होळी आणि मेणबत्ती गँगची पाणी बचाव मोहीम* ■

●एक लिटर पेप्सी / कोक साठी कंपन्यांना एकूण ४ लिटर पाणी खर्च करावे लागते.
●एकट्या पेप्सिको कंपनीच्याच देशात ५८ पेक्षा जास्त फॅक्टरी आहेत. प्रत्येक फॅक्टरीत जमिनीतून पाणी काढणारे पंप आहेत.
●प्रत्येक पंप जवळपास जमिनीत ११५ ते १४० मीटर इतका खोल असतो व सतत पाण्याचा उपसा करत असतो. प्रत्येक फॅक्टरीत कमीत कमी असे दोन पंप असतात.
●एक कंपनी वर्षाला कमीत कमी जवळपास एक लाख क्युबिक मीटर पेक्षा जास्त पाण्याचा उपसा करते. (आपल्या कडे साॅफ्ट ड्रिंक बनवणाऱ्या किती कंपन्या आहेत ते मोजा व हिशोब करा)
●पावसाळ्यात तर प्रत्येक कंपनी दर महिन्याला जवळपास १२००० क्युबिक मीटर पेक्षा जास्त पाण्याचा उपसा करते.
●आता तर वर्षाला २,५०,००० क्युबिक मीटर पाणी उपसा करण्याच्या फॅक्टरीचा प्रस्ताव आहे.
●पाण्याच्या या उपस्यामुळे आजूबाजूची खेडी, तलाव, विहिरी, नद्या, जलसाठे नष्ट होतात. परिणाम एक कळशी पाण्यासाठी मैलोमैल चालत जाऊन पाणी भरणे, टँकर साठी तासनतास वाट पाहणे, पाणी कपात, दुष्काळ पडणे, शेती नष्ट होणे, जमीन नापीक होणे, याचा शेवट शेतकऱ्यांच्या आत्महत्या.

तुम्हाला खरोखरच पाणी वाचवायचे असेल तर पेप्सी / कोक पिणे सर्वप्रथम बंद करा. या कंपन्या येथे काही तुमची तहान भागवण्याची "सेवा" करायला आलेल्या नाहीत तर या कंपन्या येथे पैसे कमवायला आल्या आहेत. येथुन पैसे घेऊन जातात व बदल्यात दुष्काळ देऊन जातात. या पेप्सी / कोक सारख्या कंपन्या आपल्या देशातून इतका पैसा कमावतात पण त्यांनी साधा एक "धर्मार्थ दवाखाना" तरी बांधलाय का हो?चला, येथे आपण पैसा किंवा दवाखाना हा प्रश्न थोडा बाजूला ठेवू या. पण या कंपन्या जे पेय आपल्याला विकतात ते आरोग्यास तरी लाभदायक आहे का?

आता हेच पहा पेप्सी / कोक मध्ये आरोग्यवर्धक असे काही आहे का? पेप्सी / कोक मध्ये असतं काय तर.... जवळपास २१ प्रकारचे विषारी पदार्थ?

▪सोडियम मोनो ग्लूटामेंट - वैज्ञानिकांच्या मतानुसार याने कॅन्सर होतो.
▪पोटॅशियम साॅरबेट, ब्राॅमिनेटेड वेजिटेबल ऑइल (BVO) - यांच्या मुळेही कॅन्सरच होतो.
▪मिथाइल बेन्जीन - याच्यामुळे किडनी खराब होते.
▪सोडियम बेन्जाॅईट - याच्यामुळे मुत्रनलिका व लिवरचा कॅन्सर होतो.
▪एंडोसल्फान - हे तर उत्तम कीटकनाशक आहे.

आता तुम्हीच ठरावा कि ही असली पेये आरोग्यासाठी आरोग्यवर्धक आहेत कि हानीकारक आहेत? व हे पेय बनवणाऱ्या कंपन्या देशाच्या वातावरणाला, पर्यावरणाला हितकारक आहेत कि हानिकारक आहेत? तेव्हा खरोखरच जर पाणी वाचवण्याची कळकळ असेल आणि आरोग्य तसेच पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर सर्वप्रथम ही पेये पिण्याचे बंद करा. मागणी घटली कि या कंपन्या हळू हळू बंद ही होऊ शकतात. एकदा का या कंपन्या बंद पडल्या कि आपण खऱ्या अर्थाने "पाणी वाचवलंय" असे म्हणू शकतो.

पाणी वाचवायचेच असेल तर आपल्या दैनंदिन सवयी सुधारायाला हव्यात. एका दिवसाच्या आणि ते ही हिंदूंच्याच सणांना "पाणी वाचवा" मोहीम राबवून काय साध्य होणार? आधी पेप्सी / कोक पिणे बंद करा व मगच होळीत होणाऱ्या पाण्याच्या अपव्ययावर टीका करा. अन्यथा आम्हा हिंदूना हिंदूंचे सण आमच्या पद्धतीने साजरे करू द्या.

पाणी वाचवायचे असेल तर दैनंदिन सवयी स्वतः बदला, पारंपरिक सण साजरे करणे सोडू नका..

|| होळीच्या शुभेच्छा ||

12/01/2017

The Latest Technology for Floor

10/08/2016

Dear Students,
Our college is organizing a Placement Drive For B.A/B.Com./B.Sc Passed out students of the year 2014-15 and 2015-16.
Company Name- ICICI Bank and KOTAK MAHINDRA BANK
Date:- 13 August 2016. Timing: 10 am
Venue:- Hall No. 101, Rajarshi Chhatrapati Shahu college, Kolhapur.
Contact- Prof. P.T. Bathe 9762342948, Dr. Gaikwad K. V. 9860401858
Note:- Student must carry an Updated Resume.

May you have all the joy your heart can hold,All the smiles a day can bring,All the blessings a life can unfold,May you ...
25/05/2016

May you have all the joy your heart can hold,
All the smiles a day can bring,
All the blessings a life can unfold,
May you have Gods best in everything.
Wishing u a Happy Birthday.

महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरती मातेच्या चरणी माथा...., महाराष्ट्र दिनाच्य...
01/05/2016

महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरती मातेच्या चरणी माथा...., महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

22/04/2016

राजर्षि छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर मध्ये रविवार दिनांक 24/04/2016 रोजी संध्याकाळी 4 वाजता आजी/ माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. तरी सर्व आजी/ माजी विद्यार्थ्यानी उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी.

10/11/2015

ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांनासुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा⭐⭐

happy teacher day
05/09/2015

happy teacher day

Address

Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when BSC at RCSCollge Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share