Kamala College.Official

Kamala College.Official Kamala College, Kolhapur, affiliated with Shivaji University, is a premier women's institution offering various U.G and P.G. programs. Voc.

These include B.A., B,Com., B.C.A., B. (Food & Retail), M.A.,& Yoga Therapy aligned with NEP and AICTE norms.

शिवाजी विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल मा. डॉ. रजनीश कामत साहेब यांचा सत्कार व अभिनंदन करताना तारारा...
25/05/2026

शिवाजी विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल मा. डॉ. रजनीश कामत साहेब यांचा सत्कार व अभिनंदन करताना ताराराणी विद्यापीठ संस्थेचे सचिव मा. प्राजक्त क्रांतिकुमार पाटील साहेब. यावेळी कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर तसेच सहकारी उपस्थित होते.
Leadership Education

ताराराणी विद्यापीठाच्या उपाध्यक्षा, कै. सौ. सरोजिनी देवी विश्वनाथ पाटील तथा परमपूज्य काकीजी यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्...
28/04/2026

ताराराणी विद्यापीठाच्या उपाध्यक्षा, कै. सौ. सरोजिनी देवी विश्वनाथ पाटील तथा परमपूज्य काकीजी यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन संपन्न झाले. 🌸🙏

यावेळी उपस्थित मान्यवरांनी काकीजींच्या कार्याचा व आदर्शांचा गौरवपूर्वक उल्लेख केला. त्यांच्या प्रेरणादायी जीवनातून समाजकार्याची नवी ऊर्जा मिळत राहो, हीच विनम्र अभिवादन! ✨

कमला कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 🌸कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आ...
14/04/2026

कमला कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 🌸

कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला प्रा. डॉ. सुजय पाटील, उपप्राचार्य एम. एन. जाधव, ग्रंथपाल श्रीमती उर्मिला कदम, श्रीमती ज्योती लेंगरे, डॉ. सागर वाळवेकर, डॉ. तानाजी घागरे, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. पूजा पाटील, प्रा. महेंद्र जरळीकर, श्रीमती जे. एल. देशपांडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

क्रांतीसूर्य, महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कमला कॉलेजमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना ...
11/04/2026

क्रांतीसूर्य, महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कमला कॉलेजमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 🙏🌸

तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी प्रबोधनात्मक रॅलीचे आयोजन करण्यात आले. 🚩📚

समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या कार्यास त्रिवार प्रमाण! ✨
#महात्माफुले

कमला कॉलेज मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादनताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेज मध्...
12/03/2026

कमला कॉलेज मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेज मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील साहेब यांचे शुभहस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून ‍ अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या शिक्षण, कृषी, जलसिंचन, सरंक्षण, दळणवळण इ. क्षेत्रातील मुलभूत योगदानाचा वेध घेणाऱ्या भित्ती पत्रकाचे उद्घाटन देखील करण्यात आले.
याप्रसंगी कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य श्री.एम.एन.जाधव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र कमला कॉलेजचे केंद्रसंयोजक प्रा.डॉ.सुजय पाटील,विद्यार्थीनी कु. अनन्या जाधव, कु.मानसी कलागते, कु.भक्ती उत्तरंडे, कु.धनश्री माने, कु.प्राज्वल साळोखे, ग्रंथपाल श्रीमती यु.आर.कदम, शारिरीक शिक्षण संचालिका श्रीमती ज्योती लेंगरे, प्रा.डॉ. सुनिता काळे इ. उपस्थित होते.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालय व मेहता बुक्स सेलर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ग्रंथ...
27/02/2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालय व मेहता बुक्स सेलर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. 📚✨

नवनवीन कथा, कादंबऱ्या, चरित्रे, अवांतर वाचन, अनुवादित कथासंग्रह आदी पुस्तकांचा खजिना विद्यार्थिनी व प्राध्यापकांसाठी खुला करण्यात आला होता.

या उपक्रमासाठी माननीय प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील सर यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सर्व प्राध्यापकवर्ग, ज्युनिअर विभागातील शिक्षकवृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ग्रंथपाल व सर्व ग्रंथालय कर्मचारी यांच्या परिश्रमातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. 🙌📖

#मराठीभाषागौरवदिन #ग्रंथप्रदर्शन #वाचनसंस्कृती

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन 🏵️हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित...
19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन 🏵️

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कमला कॉलेज येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले व त्यांच्या कार्याचा स्मरण करून प्रेरणा घेण्यात आली. या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य एम.एन. जाधव, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सुजय पाटील यांच्यासह प्राध्यापक वर्ग, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Inspiration

🏆 अभिमानाचा क्षण 🏆श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथे इतिहास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३...
18/02/2026

🏆 अभिमानाचा क्षण 🏆
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथे इतिहास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये कमला कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. या स्पर्धेत सेजल सत्यवान गावडे व अनन्या आनंदा जाधव या दोन विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.या स्पर्धेत सेजल सत्यवान गावडे (बी. ए. २) हिने द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे. 🎉 तिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

Department of Sociology, Kamala College organised an insightful Wall Paper Display on Pandit Deendayal Upadhyay and Ekat...
13/02/2026

Department of Sociology, Kamala College organised an insightful Wall Paper Display on Pandit Deendayal Upadhyay and Ekatma Manav Darshan.

The exhibition aimed to familiarize students with Upadhyay’s life, philosophy, and his valuable contributions to Indian socio-political thought.

📚✨ Encouraging learning beyond classrooms and inspiring thoughtful citizenship.

AcademicEngagement Kolhapur LearningBeyondClassroom

कमला कॉलेज, कोल्हापूर येथील वरिष्ठ विभागातील खेळाडू 🏐 कु. अनुष्का रवींद्र पाटील (बी.कॉम. भाग १)हिची दि. 14 ते 18 फेब्रुव...
13/02/2026

कमला कॉलेज, कोल्हापूर येथील वरिष्ठ विभागातील खेळाडू 🏐 कु. अनुष्का रवींद्र पाटील (बी.कॉम. भाग १)
हिची दि. 14 ते 18 फेब्रुवारी 2026 रोजी कृष्णा विद्यापीठ, रुद्रवरम (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या 🏆 अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला नेटबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ महिला नेटबॉल संघामध्ये उल्लेखनीय निवड झाली आहे. तसेच, कमला कॉलेजमधील नेटबॉल प्रशिक्षक
श्रीमती पूजा ठाकूर यांची शिवाजी विद्यापीठ नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे.
महाविद्यालयाच्या वतीने दोघींनाही हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐💐💐
CollegeAchievements

Address

Rajarampuri 1st Lane
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 7:30am - 5:30pm
Tuesday 7:30am - 5:30pm
Wednesday 7:30am - 5:30am
Thursday 7:30am - 5:30pm
Friday 7:30am - 5:30pm
Saturday 7:30am - 5:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kamala College.Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share