M.S.Bidve Engineering College LATUR

M.S.Bidve Engineering College LATUR Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from M.S.Bidve Engineering College LATUR, Community College, Harangul Road, Latur.

 #निःशब्दसर्वाचे आवडते व्यक्तिमत्त्व , स्वभाव असा की लगेच ओढ लावणारा, कॉलेज च्या गेट वर शेकोटी करून रात्री गप्पा मारणारे...
16/04/2021

#निःशब्द

सर्वाचे आवडते व्यक्तिमत्त्व , स्वभाव असा की लगेच ओढ लावणारा, कॉलेज च्या गेट वर शेकोटी करून रात्री गप्पा मारणारे झुंझे मामा नक्कीच आठवणीत राहतील ...
भावपूर्ण श्रद्धांजली

08/10/2020

प्रेरणा आणि प्रोत्साहन हे सक्षम यशाचे दोन पैलू आहेत -श्री शिवशंकर बिडवे
केबीसीमध्ये धडक मारणार्‍या कु. अस्मिता गोरेचा गौरव सोहळा

लातूर / प्रतिनिधी ः प्रेरणा आणि प्रोत्साहन हे सक्षम यशाचे दोन पैलू असतात. त्याच्याच जिवावर माणूस आपल्या जिवनात हवी ती ध्येय्य आणि उदिष्ट्ये साध्य करु शकतो. याचा साक्षात्कार लातूरकरांच्या गुणवत्तेचा झेंडा लोकप्रिय टिव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये रोवणारी विद्यार्थीनी कु. अस्मिता माधव गोरे हिने करुन दाखविला आहे असे गौरवोद्गार बसवेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे यांनी आज काढले.
शिवशंकरप्पा बिडवे हे आज बिडवे इंजिनीअरींग कॉलेजद्वारे आयोजित कु. अस्मिता गोरे गौरव सोहळ्यास संबोधीत करत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नचा संपूर्ण देशात गवगवा आहेच. परंतू त्याच गुणवत्तेच्या जोरावर लातूर येथील बिडवे इंजिनीअरींग महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. अस्मिता माधव गोरे हिने नुकताच टिव्हीवर सुरु झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्येही हॉटसिटवर बसून आपला दबादबा निर्माण केला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बसवेश्‍वर शिक्षण संस्थेचे संचालक मन्मथअप्पा येरटे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे आदींची उपस्थिती होती. सर्व उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य बस्वराज धरणे
कौल बनेगा करोडपती या टीव्ही शोच्या हॉटसिटवर बसून आपल्या बौध्दीक क्षमतेची चुणूक सर्व देशाला दाखवणारी अस्मिता गोरे ही लातूर येथील रहिवाशी असून तिचे वडील अंध असून तिची आई ही एका डोळ्याने अंध आहेत. वयाच्या केवळ 22 वर्षी आपल्या कुटूंबाची संपूर्ण जबाबदारी खोद्यावर पेलणार्‍या अस्मिताचा संपूर्ण देशातून गौरव केला जात आहे.
अस्मिता गोरेने आपली गुणवत्ता या शोमध्ये दाखवल्याने तिच्या हुषारीची सर्वत्र कौतुक होत आहेच परंतू इंजिनीअरींग परीक्षेनंतर तिला एमपीएससी, युपीएससीच्या परिक्षा देऊन प्रशासकिय सेवेतील मोठे अधिकारी व्हायचे स्वप्न आहे. तिच्या या धडपडीसाठी बसवेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. बिडवे यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. त्याशिवाय गौरव समारंभा प्रसंगी तिला स्पर्धा परीक्षांच्या काही निवडक व दर्जेदार पुस्तकांचा संचही भेट देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य खटोड सर, प्रा. धर्मराज बिरादार आणि अन्य कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. गौरव सोहळ्याच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. श्रीकांत तांदळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आणि गौरव सोहळ्याच्या आयोजकांचे आभार प्रदर्शन प्रा. खटोड सर यांनी केले.

05/10/2020
22/03/2020
19/02/2020

*प्रौढ प्रताप पुरंदर,*
*महापराक्रमी रणधुरंधर,*
*क्षत्रियकुलावतंस्,*
*सिंहासनाधीश्वर,*
*महाराजाधिराज महाराज*
*श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..*

*शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...*
🙏🙏🙏🙏🙏🙏

Address

Harangul Road
Latur
413531

Alerts

Be the first to know and let us send you an email when M.S.Bidve Engineering College LATUR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to M.S.Bidve Engineering College LATUR:

Share