07/07/2012
जे शिक्षणासाठी वा कामासाठी अथवा घरापासून दूर आहेत त्यांच्या साठी हि कविता आहे.
घरापासून दूर .......................
मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला,
तरी मला आई थोपटल्याशिवाय कधीच झोपली नाही.
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित,
शांत झोप कधी लागलीच नाही.
कुणी वीचारते "तुला घरी जावस वाटत नाही"?
कशी सांगू त्यांना घरातून निघताना आईला मारलेली मीठी सोडवत नाही.
आई तू सांगायची गरज नाही,
तुला माझी आठवण येते,
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो,
तरीही तू सहा वाजताच उठतेस.
तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोळी,
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला आजही जीभ आसुसली.
घरापासून दूर आई जग खुप वेगळे आहे,
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होते,
आता रानागानात ऊन आहे.
तू आपल्या मुलांसाठी सगळ केलस एक दीवस मुलं म्हणाली,
आई आता आम्हाला जायच आहे आंणि तू त्यांना जाऊ दीलस.
आई तू इथे नाहीस,
बाकी माझ्याकडे सगळे आहे.
घरापासून दूर जग खुप वेगले आहे.
"तुलाच द्यावे, तुलाच गावे, तुला पूजावे आई,
जगात अवघ्या तुझासरखे, दुसरे दैवत नाही. "
"चंद्राचे चांदणे तर नित्य बदलत असते,
परंतु,
आईच्या वात्सल्याची अमावस्या कधीच होत नसते.
नदीच्या पात्रात पाणीही नेहमी वाढत - घटत राहते,
परंतु,
आईच्या प्रेमाचा प्रवाह कधीही घटत नाही, आटत नाही."
ती आई होती म्हणूनी,
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता,
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता.
ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडले,
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता.
अंगणात गवले मजला, संपले बालपण माझे,
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता.
आई फ़क्त तुझ्यासाठी.......
बांधून मनाशी खुणगाठी,
निघाले धावत स्वप्नांपाठी,
कचरते मन, अडखळते पाऊल,
आई फ़क्त तुझ्यासाठी.......
कशी राहशील सोडून मला,
सतावेल आठवण क्षणाक्षणा,
रडण्यासाठी तुला आता,
न लागेल कांद्याचा बहाणा.
एअरपोटवर तुझा हात सोडवताना,
माझं उसणं अवसाण...गळून गेलं होतं,
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं,
त्या विमानातलं एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं.
प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना,
गळा अगदी दाटून येतो,
थांबवून हुंदका कशीबशी मी,
ब्यालंस संपल्याचा बहाणा करते,
कळुन ही न कळल्यासारखी तू,
मग माझंच सांत्वन करतेस.
पण मलाही माहित आहे आई,
फोन ठेवताच तू पण रडतेस.
इथे रोज पीझ्झा आणि बरगर खाताना,
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते.
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग,
का कुणास ठावूक प्रत्येक गोष्ट खारटचं लागते.
ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर तोंडातून,
"आई चहा दे गं " अगदी सहज निघून जातं,
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच,
घर अगदी भकास भकास वाटू लागतं.
चहा पिण्याची इच्छा जाते मरून,
शरीर बोजड अन मन खिन्न खिन्न होतं,
थकलेलं माझं शरीर लगेचच,
स्वताःला निद्रेच्या ताबी देतं.
सताड जागं माझ मन मात्र तुझा केसांतून फिरणारा गोंजरणारा हात शोधत राहतं.
सकाळी उठल्यानंतर पुन्हा मगं,
माझी रोजचीच धावपळं सुरू होते.
आणि मग मनात विचार येतो,
तू असलीस की सर्व कसे सुरळीत होते.
अशा या माझ्या बीझी दिनचर्येत,
तुझी उणीव जाणवत राही क्षणोक्षणी,
धावत येईन परत तुझ्यापाशी आई,
पहिली संधी मला मिळताच क्षणी.
सरतील दिवस बघता बघता,
परत येईन मी तुझ्याचपाशी.
ठेवून पायावर डोई, मागेन तुझी माफ़ी,
सोडून तुला नाही जाणार पुन्हा कधीही मी परदेशी. ♥♥♥